Saturday, August 13, 2022

रोहिणी उत्तमराव भाग्यवंत यांना पीएच.डी. प्रदान

रोहिणी उत्तमराव भाग्यवंत यांना पीएच.डी. प्रदान
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. एम. बी. पाटील  यांच्या मार्गदर्शनात संशोधन पूर्ण करणाऱ्या रोहिणी उत्तमराव भाग्यवंत यांना  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने  वनस्पतीशास्त्र विषयात आज माैखिकी नंतर पीएच.डी. प्रदान करण्यात आली. या मौखिकीसाठी बहि:स्थ परीक्षक डाॅ.अशोक चव्हाण होते. रोहिणी भाग्यवंत ह्या कै.र.व.महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी आहेत. सोबतच आज त्यांनी ही सर्वोच्च संशोधन पदवी प्राप्त केल्याबद्दल  संस्थाध्यक्ष मा.परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, डॉ. संतोष रणखांब, प्रा. विकास रागोले, प्रा संदीपकुमार देवराये, प्रा महालिंग मेहत्रे सह सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने अभिनंदन केले.तसेच मित्र परिवारासह सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment