कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादीन साजरा
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कैरमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.डी एन मोरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वसंत सातपुते प्रमुख उपस्थितीत हशिप्रमंचे संचालक रामेश्वर कदम, प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, प्राचार्य शेख शकीला या होते, दिनांक 29/8/2022 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दीन हाँकीचे जादुगार मेजर ध्यानचंद सिंग यांची जंयतीजन्मदिवस म्हणून आज साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत सातपुते,प्राचार्या शेख शकिला डॉ.डी एन मोरे सरांनी पुप्षहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकनकर,डॉ.मुकुंद पाटील,डॉ.श्री रामेश्वर कदम,डॉ टेगंसे मॅडम,प्रा सखाराम कदम, डॉ अंनत सरकाळे व इतर स्टाफ आणि विद्यार्थी याच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजिन क्रीडा विभागाचे वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गोविंद वाकनकर यांनी केले तर आभार डॉ संतोष रनखांब यांनी व्यक्त केले.



No comments:
Post a Comment