Tuesday, August 23, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षसा "क्या हुवा तेरा वादा", शुध्द व स्वच्छ पाणी स्वप्नात - प्रभाकर शिरसाट

सोनपेठच्या भ्रष्टाचारी राक्षसा "क्या हुवा तेरा वादा", शुध्द व स्वच्छ पाणी स्वप्नात - प्रभाकर शिरसाट
 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठच्या भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ शहारातील नागरिकांना आश्वासन दिले होते की मी "गंगेचे फिल्टर पाणी पुरविणार" आहे आज तब्बल बारा वर्ष झाली आहेत अजून ही शहराला "शुध्द आणि स्वच्छ पाणी" पुरवठा भ्रष्टाचारी राक्षसाने केलेला नाही जनतेला शुध्द व स्वच्छ पाणी स्वप्नातच.अत्यंत अशुध्द अतिशय घाण पाणी पुरवठा सध्या सोनपेठ शहराला होत आहे याला एकमेव जबाबदार भ्रष्टाचारी राक्षस आहे,गोदावरी नदी वरुन जी पाणी पुरवठा योजना आखली आहे या योजने मध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आहे परिणामी व सोनपेठ शहर वासियाना अशुध्द व घाण पाणी केवळ भ्रष्टाचारी राक्षसाचे तुघलकी कारभारामुळे प्यावे लागत आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ चे नागरिकांवर मी फारच उपकार करीत आहे हे दाखवून देण्यासाठी मित्र मंडळाचे नावाने टँकरने पाणी पुरवठा करीत होता हे पुरवठा केले जाणारे पाणी हे नगर परिषदेच्या गोदावरी नदी वरील विंधन विहीरीचे होते व या टँकर वर कामगार कोण तर सोनपेठ नगर परिषदेचे कंत्राटी कामगार म्हणजे पाणीही नगर परिषदेचेव कर्मचारी ही नगर परिषदेचे जनतेच्या डोक्यावर उपकार मात्र भ्रष्टाचारी राक्षसाचे.

"नाल्याच्या घान पाण्याचा त्रास मात्र जनसामान्यांच्या माथी" ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा रोड सारडा कॉम्प्लेक्स पर्यन्त रस्त्याच्या पूर्व व पश्चिम बाजूने आर सी सी नाली बांधकाम झालेले आहे या दोन्ही बाजूच्या नाल्यावर भ्रष्टाचारी राक्षसाने मुरूम टाकून भराव टाकून नालीचा भाग उंच केल्यामुळे या रस्त्यावर पाणी साचून वाहनांना पायी चालणाऱ्या नागरिकांना सध्या खूप त्रास सोसावा लागत आहे या साठी भ्रष्टाचारी राक्षस हाच जबाबदार आहे याला म्हणतात खरा सोनपेठ शहराचा विकास भ्रष्टाचारी राक्षसाने निवडून येण्यासाठी सोनपेठ शहरामध्ये जाणीव पूर्वक बाहेर गावचे मतदार आणून स्वतःची व स्वतःचे कुटुंबातील सदस्याची मरे पर्यंत निवडून येण्याची सोय केली आहे पहा सोनपेठ शहरातील मतदारांवर त्याचा किती विश्र्वास आहे ते
भ्रष्टाचारी राक्षसाने आपले प्रस्थ कायम राहावे यासाठी युवकांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकून आसुरी आनंद लुटला आहे आपले वर्चस्व अबाधित राहावे यासाठी भ्रष्टाचारी राक्षसाने भाडोत्री कार्यकर्ते हाताशी धरुन अनेकांना आपल्या राक्षसी प्रवृत्तीने त्रास दिला आहे व छळ केला आहे , भ्रष्टाचारी राक्षसाने स्वतःला निवडून येण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरकुल योजनाचा लाभ दिला आहे अनेक कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेच्या  कर्ज योजनाचा लाभ दिला आहे इतका मनमानी कारभार केला आहे व खऱ्यागरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे,
भ्रष्टाचारी राक्षसाने निवडून येण्यासाठी नियम बाह्य नळ जोडणी करून नगर परिषदेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे व अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने आपण भ्रष्टाचार केल्याचा पुरावा कुणाच्याही हाती लागू नयेम्हणून नगर परिषदेतील  एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्याला मनमर्जी प्रमाणे पगार देवूनअनेक कागद पत्रे गहाळ करण्यास किंवा जाळून टाकण्यास सांगून स्वतःचा तात्पुरता बचाव केला आहे
भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे खोटारडे लोकाचा कैवारी व सर्व सामान्य लोकांचा वैरी भ्रष्टाचारी राक्षसाचे वागणे म्हणजे वरच्यास माथा व खालच्यास लाथा असे दुट्टपीपणाचे आहे
केंद्र सरकार व राज्य सरकार हे त्यांचे खात्याच्या नागरी विकासाच्या योजना ह्या महानगर पालिका नगर पालिका व नगर परिषदा.नगर पंचायत यांचे मार्फत राबवीत असतात व त्यासाठी ती सरकारे निधी ही देतात असे असताना भ्रष्टाचारी राक्षस हा मोठ्याने ओरडून सांगतो की या योजना माझ्या आहेत मी त्याचा लाभ तुम्हाला दिला आहे अशी ताफ मारून लोकाची दिशाभूल करीत आहे
भ्रष्टाचारी राक्षस हा स्वतःचे खिशातून एक पैसा ही खर्च करीत नाही सर्व योजनेसाठी सर्व पैसा हा सरकार कडून मिळत असतो व सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे हे नगर अध्यक्षाचे कामच आहे ते काही जनतेवर उपकार  नाहीतआणि म्हणून जनतेने भ्रष्टाचारी राक्षसाचे उपकार मानावेत व परत परत त्यालाच मते द्यावीत असे थोडेच आहे 
धन्यवाद 
आपला
प्रभाकर शिरसाट
सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.

No comments:

Post a Comment