Friday, August 5, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवा सारखा साजरा करण्यासाठी तमाम नागरिकांच्या सहभागाची गरज - जिल्हाधिकारी आंचल गोयल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवा सारखा साजरा करण्यासाठी तमाम नागरिकांच्या सहभागाची गरज - जिल्हाधिकारी आंचल गोयल 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णयान्वये स्वराज्य महोत्सव हा उपक्रम देखील राबविण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवा सारखा साजरा करण्यासाठी तमाम नागरिकांच्या सहभागाची गरज - जिल्हाधिकारी आंचल गोयल पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच जिल्हाभर पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन हि सांगितले,यामध्ये आज शुक्रवार दि.5 ऑगस्ट 2022 रोजी तरुण, युवक-युवती, विद्यार्थ्यांसाठी परभणी शहरात सायक्लोथॉन, मॅरेथॉन रॅली पासुन सुरुवात करण्यात आली. तर शनिवार दि.6 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारताचा स्वातंत्र्य लढा, भारत एक महासत्ता , हर घर तिरंगा या विषयावर तालुका स्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे तालुका पातळीवर आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.7 ऑगस्ट रोजी तालुका पातळीवर देशभक्तीपर गित गायन व सामुहीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.8 ऑगस्ट रोजी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेवून महापुरुष अवतरले ग्रामसभेला या विषयावर घेण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र लढ्यातील महापुरुषांच्या वेशभुषेत ग्रामसभे मध्ये विचार मांडता येतील. मंगळवार दि.9 ऑगस्ट रोजी तिरंगा मानव साखळी तसेच सामुहिक राष्ट्रगान यात जिल्हास्तरावर क्रिडा संकुलात ऑगस्ट क्रांती दिना बाबत कलात्मक सादरीकरण आणि सामुहीक राष्ट्रगानचे आयोजन तर तालुका स्तरावर भारताच्या आकारात तीन रंगात विद्यार्थ्यांना उभे करुन सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगान आयोजित करुन हा प्रसंग ड्रोन कॅमेऱ्याने छायाचित्रात कैद करण्यात येणार आहे. बुधवार दि.10 ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर तालुका स्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.11 ऑगस्ट रोजी तालुका स्तरावरील महिला बचत गटांसाठी मुख्य ठिकाणी विविध स्पर्धा व प्रदर्षनीचे आयोजन करणे यामध्ये तिरंगा रंगामध्ये खाद्यपदार्थाचे प्रदर्शन, महिलांचे रांगोळी, मेहंदी स्पर्धा इत्यादीच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी हे भेट देवून विविध स्पर्धांचे विजेते घोषित करणार आहेत.  दि.12 ऑगस्ट रोजी तालुका स्तरावरील पहिल्या दोन विजेत्यांची जिल्हा स्तरीय गायन व सांस्कृतिक स्पर्धा तसेच निवडक रांगोळीचे प्रदर्शन परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता  घेण्यात येणार आहे. शनिवार दि.13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता सर्व शालेय विद्यार्थ्यांची एकाच वेळी हर घर तिरंगा व देशभक्तीच्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.आणि रविवार दि.14 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय सर्व कार्यालयात, शाळा, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहभागातून स्वच्छता व प्लास्टीक कचरा संकलन करणे याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच हर घर तिरंगा या साठि 4 लाख तिरंगा ध्वजाचे नियोजन केले आहे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.यावेळी सर्व पत्रकारांनाही निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या,महापालिका आयुक्त देवीदास पवार यांना पत्रकारांनी परभणीच्या रस्त्याच्या प्रश्नांनी हैराण परेशान करुन सोडले यावेळी मा.जिल्हाधिकारी यांनी सुचना देऊन विषय संपवला,खड्डे व धुळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तिरंगा सन्मान करण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतून सर्वच विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे, तसेच सर्व धर्मीय गुरुंना हि आपल्या आपल्या धार्मिक स्थळांवर हि तिरंगा ध्वज फडकावा असे आवाहन केले आहे, पत्रकारांनी शालेय गणवेश वाटप झाले नाही या प्रश्नावर 15 आॕगष्ट पर्यंत वाटप होतील असे सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक मिना व सर्व पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment