Monday, August 22, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस हा कसा "रंग बदलनारा सर्ड्या" - प्रभाकर सिरसाट

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस हा कसा "रंग बदलनारा सर्ड्या" - प्रभाकर सिरसाट



सोनपेठ (दर्शन) :-

भ्रष्टाचारी राक्षस मोठ्याने ओरडून सांगतो की मी सोनपेठ शहराचा विकास केला आहे, हे अशा आविर्भावात सांगतोकी जणू कायएखाद्या स्वातंत्र्य सैनिका   पेक्षा मी महान कार्य केले आहे अशा थाटात व तोऱ्यात राहत आहे पण म्हणतात ना ज्याला तोंड आहे त्याने आरशात बघून घ्यावे,आपणास माहीत आहे की भ्रष्टाचारी राक्षस हा सोनपेठ शहरातील रहिवाशी आहे तो कसा लहानाचा मोठा झाला त्याची आर्थिक परिस्थिती काय होती तो कसा राहत होता कसा वागत होता हे सर्व सोनपेठ शहरातील लहान थोरा पासून सर्वांना माहित आहे,भ्रष्टाचारी राक्षसाला मदत करणारे कोण आहेत निवडून देणारे कोण आहेत हे ही सर्वांना माहित आहेत व तसेच भ्रष्टाचारी राक्षसाने कुणा कुणाला धोका दिला कुणा कुणाला फसविले हे ही सर्वांना माहीत आहे,भ्रष्टाचारी राक्षस हा कसा "रंग बदलनाऱ्या सर्ड्या सारखा" आहे हे सोनपेठ शहराला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही,भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ नगर परिषदेची सत्ता मिळविली व त्या सत्तेतून भ्रष्टाचार करुन करोडो रुपये मिळविले आहेत व त्या पैशाचे जोरावर तो आज सर्व सामान्य नागरिकांनाअगदीच चिल्लर समजत आहे,एके काळी हाच भ्रष्टाचारी राक्षस मोठ्याने ओरडून लोकांना म्हणत होता की एका शिक्षकाचा प्रामाणिक मुलगा आहे मी एक व्यापारी आहे,आज ह्या भ्रष्टाचारी राक्षसाने काय केले आहे तर पहिल्यांदा त्याने सोनपेठ नगर परिषदेच्या गुत्तेदाराना कायमचे नगर परिषदेतून हद्दपार करूनआता हाच भ्रष्टाचारी राक्षस स्वतः गुत्तेदारी करीत आहे, त्यामुळे त्याचे कडे स्वतः ची बांधकाम मशिनरी आहे बांधकाम मजूर आहेत,भ्रष्टाचारी राक्षसा कडे स्वतःचे बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे त्या दुकानातील सिमेंट व लोखंड हे नगर परिषदेच्या बांधकामासाठी विक्री केले जाते,निवडून येण्यासाठी प्रधान मंत्री घरकूल योजना लागू केली या योजने मध्ये जे अपात्र लाभार्थी आहेत अशा अपात्र लाभार्थीना नियम पायदळी तुडवून घरकुलचा लाभ दिला आहे या घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी लागणारे सिमेंट व लोखंड हे भ्रष्टाचारी राक्षसाचे दुकानातून खरेदी करावे अशी अशी अट घालून दिली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ शहारातील शेतकऱ्याच्या शेत जमिनीची जी गुंठे वारी मधील भूखंड नियमित केले त्यासाठी त्या शेतकऱ्याकडून पाचशे पेक्षा जास्त भूखंड हडप करून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता मिळविली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने निवडून येण्यासाठी सोनपेठ नगर परिषदेची मोकळी जागा ही ज्यांना घरे आहेत ज्यांना स्वताच्या जागा आहेत अशा नागरिकांना शासनाचा नियम डावलून केवळ सल्लागार अभियंत्याच्या सल्ल्यावरून खिरापत वाटावी तशा प्रकारे वाटली आहे हे सारे केवळ निवडून येण्यासाठी केले आहे भ्रष्टाचारी राक्षसाला एके काळी नकाशाला इंग्लिश मध्ये nab म्हणतात की map म्हणतात हे  सुद्धा कळत नव्हते,भ्रष्टाचारी राक्षस हा स्वतःला शिक्षकाचा मुलगा म्हणून घेत असला तरी याला हुशार माणसे अजिबात आवडत नाहीत याला व्यसनी असणारे होयबा म्हणणारे लोक आवडतात,भ्रष्टाचारी राक्षसाने अनेक युवकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतो म्हणून निवडणूकीत आश्वासन दिले व काही दिवस युवकांना कंत्राटी कामावर घेतले व निवडणूक संपताच कामावरून काढून टाकले व त्यांची फसवणूक केली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने गेल्या चौवीस वर्षात कोणताही म्हणावा असा सामाजिक उपक्रम राबविला तर नाही उलट सोनपेठ शहरातील युवकांना व्यसनाधीन बनवून त्यांना बर्बाद केले आहे,किंबहुना समाजासाठी चांगले काम करावे हे भ्रष्टाचारी राक्षसाचे कामच नव्हे हे वेगळं सांगायची गरज नाही उलट सोनपेठ नगर परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी सोनपेठ शहर व सोनपेठ शहरातील नागरीक कसा बर्बाद झाला पाहिजे हे भ्रष्टाचारी राक्षसाचे खरे स्वप्न आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ नगर परिषद मध्ये एवढी मनमानी केली की कायदा नियम हे सगळे पायदळी तुडवून टाकले मी सांगेल ती पूर्व दिशा असा हिटलर ला व मोगलांना ही लाज वाटेल असा जुलमी कारभार केला आहे सोनपेठ नगर परिषद ही सोनपेठ शहरातील नागरीकांच्या मालकीची आहे असे कधी कोणाला वाटत सुद्धा नव्हते,भ्रष्टाचारी राक्षसाने गेल्या चौवीस वर्षा मध्ये सोनपेठ नगर परिषद ही स्वतःचे कुटुंबाचे मालकीची असल्यासारखा अगदी बिनधास्त पने उपयोगात आणली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ नगर परिषद मध्ये कायदा व नियम धाब्यावर बसवून कामे केल्यामुळे अनेक नागरिकांना नगर परिषद मध्ये विविध कामासाठी खूप त्रास सोसावा लागला आहे याची जाणीव भ्रष्टाचारी राक्षसाला अद्याप ही आली नाही आणि म्हणून भ्रष्टाचारी राक्षस मोठ्याने ओरडून म्हणतो मी सोनपेठ शहराचा विकास केला आहे तर मग या पोस्ट मध्ये मी जे लिहिलेले आहे तेही भ्रष्टाचारी राक्षसाने केलेले आहे म्हणून हे सर्व केलेले आहे म्हणून भ्रष्टाचारी राक्षसाने मोठ्याने ओरडून सांगावे म्हणजे जनतेला कळेल की भ्रष्टाचारी राक्षसाने खरोखर सोनपेठ शहराचा विकास केला आहे की सोनपेठ शहर लुटले आहे हे कळेल.
धन्यवाद 
आपला
प्रभाकर शिरसाट
सामाजिक कार्यकर्ते 
तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.

No comments:

Post a Comment