कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात दि.१० रोजी देशभक्तीपर पुस्तक प्रदर्शन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त व भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभक्तीपर पुस्तकांचे प्रदर्शन दिनांक 10 ऑगस्ट 2022 सकाळी 10.30 वाजता आयोजित केले आहे. तरी या ग्रंथप्रदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे प्राचार्य वसंत सातपुते, ग्रंथपाल डॉ.अनंत सरकाळे व ग्रंथालय समिती सदस्य डॉ. मोहन मिसाळ, डॉ.सुनिता टेंगसे, डॉ.संतोष रणखांब, डॉ. बळीराम शिंदे यांनी कळविले आहे.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन आपल्या बातम्या व जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.९८२३५४७७५२.


No comments:
Post a Comment