Sunday, August 21, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस बरळला म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा - प्रभाकर शिरसाट

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस बरळला म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा - प्रभाकर शिरसाट



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ चा भ्रष्टाचारी राक्षस
भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अत्यंत गर्विष्ठ व पैश्याची हाव असलेला अत्यंत अहंकारीआणि लोकांना चिल्लर समजणारा 
चौवीस वर्ष सोनपेठ शहराला लुटल्यानंतर ही पुन्हा सोनपेठ शहर लुटू पाहणारा भ्रष्टाचारी राक्षस आहे
गेल्या चौवीस वर्षांमध्ये ज्या विविध रस्त्यांच्या योजनासाठी आणलेला निधी 
 नाली बांधकामासाठी आणलेला निधी 
 विविध समाजाचे  विविध सभागृहे या  साठी आणलेला निधी 
 विविध पाणी पुरवठा योजना साठी आणलेला निधी
 विविध घरकुल योजनासाठी आणलेला निधी
सोनपेठ शहराचे विद्युतीकरणसाठी आणलेला निधी  शॉपिंग कॉम्प्लेक्सबांधकामे करण्यासाठीं  आणलेला निधी विविधनागरी सुविधा  साठी आणलेला निधी  वतसेच मूलभूत सुख सोयी पुरविण्यासाठी आलेला निधी हे सर्व निधी केन्द्र सरकार व राज्य सरकार शहारातील जनतेसाठी देत असते हे नगर अध्यक्ष व नगर परिषद सदस्य यांचे साठी मिळत नाही हे पक्के लक्षात असू द्यावे व या सर्व नागरी सुविधा साठीच्या योजना ह्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकार सरकार च्या योजना असून या योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कडून भरघोस असा निधी मिळत असतो व मिळालेला ही आहे
या सर्व विकास कामासाठी भ्रष्टाचारी राक्षसाने स्वतःचे घरचा पैसा किंवा निधि खर्च केला नाही उलट गेल्या चौवीस वर्षा मध्ये भ्रष्टाचारी राक्षसाने या सर्व विकास कामामध्ये मोठ्यप्रमाणावर भ्रष्टाचार करून कोटयावधी रुपयांची मालमत्ता मिळविली आहे हे सर्वांना माहीत आहे असे असताना हा भ्रष्टाचारी राक्षसाने मोठ्याने ओरडून सांगतो की मी सोनपेठ शहराचा विकास केला आहे
आणि माझ्यामुळे हे सोनपेठ शहर दिसत आहे
भ्रष्टाचारी राक्षसाने कोटयावधी रूपयांचा अपहार करून चोरांच्या उलट्या बोंबा या उक्ती प्रमाणे मीच रस्ते बांधले मीच घरकुले दिलीत मीच विद्युतीकरण केले आहे मीच सर्व सभागृहे बांधली आहेत असे म्हणून मोठ्याने ओरडत आहेव स्वतःचा उर बडवून घेत आहे
गेल्या चोवीस वर्षात भ्रष्टाचारी राक्षसा शिवाय दुसऱ्या कोणत्याही नागरिकाला  ही नगर परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधीच मिळाली नाही मग दुसऱ्याने काही ही विकास कामे केली नाहीत असे कसे म्हणता येईल याचे भान भ्रष्टाचारी राक्षसाला अजूनही आले नाही
आणि म्हणून हा भ्रष्टाचारी राक्षसस्वतः हा भ्रष्टाचाराने बरबटलेला असताना माझ्या शिवाय दुसऱ्याने कोणीही विकास कामे केली नाहीत म्हणून दुसऱ्यावर बिनबुडाचे व खोटे आरोप करून सोनपेठ शहरातील जनतेची दिशाभूल करत आहे
या भ्रष्टाचारी राक्षसाला भारत देशाचे जे महामानव व महान स्वातंत्र्य सेनानीआहेत यांचे बदल कसलीही माहिती नाही जयंती व पुण्य तिथी या मधला फरक कळत नाही याला कार्यक्रम कोणता आहे कुणाचा आहे हे ही कळत नाही याचं आपल एकच पालू पद ते म्हणजे मी अमका तमका विकास केला मीअमूक ढमुक विकास केला आहे हे मोठ्याने ओरडून सांगताना त्याला कार्यक्रमाचे कसलेही भान राहत नाहीव स्वतःचा बडेजाव पना दाखवतोव स्वतःचे हसे करून घेतो
सोनपेठ शहराचा जो विकासझाला तो मीच  केलाआहे असे तो म्हणतो म्हणजे जणू काय राजा हरिश्चंद्र ने जसे स्वतःचेराज्य व संपत्तीचे दान दिले होते तसेच दान मी सोनपेठ शहरा साठी दिले आहे असे समजतो 
म्हणजे सोनपेठ शहरां तील जनतेसाठी केन्द्र सरकार व राज्य सरकार यांनी काहीही  निधी अथवा पैसा दिलेला नाही असे भ्रष्टाचारी राक्षस सांगून सोनपेठ शहरातील जनतेची चक्क  दिशाभूल करीत आहे व स्वतःचा बडेजाव पणा दाखवित आहे परंतू आपण पाहत आहोत या भ्रष्टाचारी राक्षसाने
गेल्या चौवीस वर्षांमध्ये एक तरी काम नीट केले आहे काय? हे भ्रष्टाचारी राक्षसाने स्वतःचे मनाला विचारावं
नगर परिषदेचे रोजंदारी कर्मचारी हे स्वतःचे शेतातकामाला होते पेट्रोल पंपावर कामावर होते नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर स्वतःची पक्की बांधकामे केलेली दुकानेआहेत
शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील नातलगांच्या नावावर किती तरी  दुकानेआहेत
व शहर विकास नियंत्रण नियमावली तोडून 
 नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागांवर केलेली स्वतःची बांधकामे 
या शिवाय शासनाच्या जागेत व खाजगी जागेत केलेलीविविध विकास बांधकामे
नगर परिषदेचे सेतू सुविधा केंद्र गेल्या दहा वर्षात का ?सुरू केले नाही व हे सेतू सुविधा केंद्र सुरू न केल्या मुळे किती कोटींचा भ्रष्टाचार केला व कोणती कोणती नियम बाह्य कामे केली आहेत हे भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ शहराला मोठ्याने जाहीर पणे ओरडून सांगावे आणि ही सर्व नियम बाह्य कामे गेल्या चौवीस वर्षात भ्रष्टाचारी राक्षसाचे आशीर्वादाने झालेली आहेत हे ही  मोठ्याने ओरडून भ्रष्टाचारी राक्षसाने सांगावे
मी गेल्या चौवीस वर्षांपासून सोनपेठ शहराला मीच कसा लुटीत आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे 
मी गेल्या चौवीस वर्षांमध्ये सोनपेठ नगर परिषद मध्ये कायदा नावाची गोष्ट शिल्लक ठेवली नव्हतीहा पराक्रम मीच केला आहे लोकांना हे मोठ्याने ओरडून सांगावे
 मी व्यापाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्व सामान्य नागरिकांना पत्रकारांना खूप छळले आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे 
मी सोनपेठ नगर परिषद म्हणजे स्वतःचे कुटुंबाचे मालकीचे आहे असे समजून मी तिचा मनमानी पद्धतीने वापर केला आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे 
मी रोजंदारी कर्मचारी यांचाकिती किती अतोनात छळ केला आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे 
मी नागरिकांशी वेळोवेळी कसा कसा जातीवाद केला आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे
 मी अनेकांची फसवणूक केली आहे हे मोठ्याने ओरडून सांगावे
मी गेल्या चौवीस वर्षांपासून सोनपेठ नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून मी केवळ आणि केवळ भ्रष्टाचार केला असल्यामुळे मला कोणत्याही पक्षाची ध्येय धोरणे मान्य नाहीत हे ही मोठ्याने ओरडून सांगावे मी गेल्या चौवीस वर्षांपासून सोनपेठ नगर परिषद मध्ये विविध विकास कामामध्ये भ्रष्टाचार केला असल्यामुळे तो भ्रष्टाचार दडपून टाकण्यासाठी मी कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये कधी ही व कूठे ही व कोणत्याही पक्षा मध्ये पक्षांतर करु शकतो हे ही मोठ्याने ओरडून सांगावे 
मी गेल्या चौवीस वर्षा मध्ये सोनपेठ नगर परिषद मध्ये अमर्यादित व बेकायदेशीर हुकूमशाही पध्दतीने कारभार केला आहे हे ही मोठ्याने ओरडून सांगावे
म्हणजे सोनपेठ शहारातील लोकांना कळेल की भ्रष्टाचारी राक्षस हा किती छदमी आहे
सोनपेठ शहराचा विकास केला म्हणजे सर्व लोक हे आपले  गुलाम आहेत असे समजून हा भ्रष्टाचारी राक्षस हा जयंतीचा पुण्यतिथीचा किंवा कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमा मध्ये स्वतःची टिमकी वाजवतोत्या कार्यक्रमाचा बोजवारा उडवीतो
भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार या शिवाय ज्यांनी काहीच केलेलं नाही तो सोनपेठ शहराचे जनतेवर उपकार केल्याचा आव आणतो हा किती ढोंगी पनाआहे 
धन्यवाद
आपला
प्रभाकर शिरसाट
सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.

No comments:

Post a Comment