Monday, August 29, 2022

कमलापूर शाळेचा अनोखा उपक्रम ;शाळेतील वृक्षांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कमलापूर शाळेचा अनोखा उपक्रम ;शाळेतील वृक्षांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



पुर्णा / सोनपेठ (दर्शन) :-

पुर्णा तालुक्यातील जि.प.प्रा.शा. कमलापूर,केंद्र-फुलकळस शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व समजावे, विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड करून संगोपन करावे या उद्देशाने चार वर्षांपूर्वी लावलेल्या वड, पिंपळ,उंबर आणि करंजी या वृक्षांचा तसेच शाळेतील विद्यार्थी वामन प्रल्हाद कोळेकर(वर्ग पाचवा) आणि योगेश जोंधळे (वर्ग सहावा) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक श्री.देसाईकाका सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद कोळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाळासाहेब सूर्यवंशी, श्री.सुभाषराव वानखेडे, श्री.बाबुराव सोनूले,श्री.दिनकर सूर्यवंशी,श्री.सखाराम गव्हाणे,श्री.राजू वानखेडे यांची उपस्थिती होती.
   शाळेतील चिमूकल्यानी वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती.आंब्याच्या पानांचे तोरण,फुलांचे हार,फुगे,रांगोळी साहाय्याने शालेय परिसर सजवला होता. शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा होतो,परंतु वृक्षांचा वाढदिवस ही वेगळी संकल्पना पाहून विद्यार्थीही भारावून गेले यावेळी वृक्षलागवड व संगोपन यांवर आधारित 'एक झाड लावू मित्रा,त्याला पाणी घालू'.
          "झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया"या कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यामार्फत करण्यात आले.शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना उपस्थित सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व नंतर वृक्षांची पूजा करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील मुलींनी वृक्षांना राख्या बांधल्या, वृक्षसांगोपन  करण्याची जबाबदारी स्वीकारली.दरवर्षी प्रत्येक वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला.यावेळी  श्री.संतोष रत्नपारखे यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व या विषयांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमानंतर  शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.संतोष रत्नपारखे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.नितीन चौकवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख कलीम,श्री.रवी जाधव,श्री.सचिन राठोड,श्री.दत्ता आबुज यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment