Monday, August 29, 2022

जातीवाचक शिवीगाळ,केल्याप्रकरणी, योगेश मुरलीधर जाधववर गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ,केल्याप्रकरणी, योगेश मुरलीधर जाधववर गुन्हा दाखल



सोनपेठ (दर्शन) :-


सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील घटना दलित समाजातील पिडीत फिर्यादार महिला लता संजय गायकवाड रा. डिघोळ ता सोनपेठ जि.परभणी असुन त्यांना दोन मुलं आहेत ,१ ऋषिकेश वय २४ वर्षे ,२ कमलेश वय(२२) वर्षे,व त्यांना दोन मुली आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत व पती संजय शिवाजी गायकवाड डिघोळ येथे राहतात.त्यातला एक मुलगा पुण्यात कामानिमित्ताने राहतो तर दुसरा मुलगा त्यांना शेतीकामात मदत करत असतो.त्यांना डिघोळ शिवारात गट क्रमांक ८४ मध्ये तीन एकर शेतजमीन आहे,त्यांनी त्यामध्ये कापसांचे पिक घेतले. दरऱोज प्रमाणे दि २८/८/२२ रविवारी त्या शेतात गेल्या होत्या,त्यांनी शेतातील धुऱ्यालगत गावातील योगेश मुरलीधर जाधव यांची बिर्याणी( हाऊस) हॉटेल आहे, फिर्यादी महिलेच्या शेतातील झाड हॉटेलच्या जवळ उपटलेली दिसली त्यांनी त्यांच्या शेतातील कापसाच्या बोंडाची भरलेल्या झाड उपटून कोणी तोंडली त्यामुळे त्यांनी कोणत्या कडूने झाड उपटली असे उद्गार त्यांच्या तोंडून शब्द निघाले.तेवढ्यात हॉटेल मध्ये असलेले योगेश जाधव यांनीही हे उद्गार ऐकले त्यांनी त्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तुला काय करायचे ते कर, करायचे ते बघून घेईन तु जर पोलीसांना तक्रार दिली तर जिवंत मारीन अशी जीवे मारण्याची धमकी, जातिवाचक शिवीगाळ केली.त्या बद्दल दिनांक २९ /८/२२ सोमवार रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी योगेश मुरलीधर जाधव राहणार डिघोळ यांच्या विरोधात कलम ५०४,५०६,३(१)(r),३(१)(s), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment