Tuesday, August 30, 2022
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादीन साजरा
Monday, August 29, 2022
जातीवाचक शिवीगाळ,केल्याप्रकरणी, योगेश मुरलीधर जाधववर गुन्हा दाखल
जातीवाचक शिवीगाळ,केल्याप्रकरणी, योगेश मुरलीधर जाधववर गुन्हा दाखल
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील घटना दलित समाजातील पिडीत फिर्यादार महिला लता संजय गायकवाड रा. डिघोळ ता सोनपेठ जि.परभणी असुन त्यांना दोन मुलं आहेत ,१ ऋषिकेश वय २४ वर्षे ,२ कमलेश वय(२२) वर्षे,व त्यांना दोन मुली आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत व पती संजय शिवाजी गायकवाड डिघोळ येथे राहतात.त्यातला एक मुलगा पुण्यात कामानिमित्ताने राहतो तर दुसरा मुलगा त्यांना शेतीकामात मदत करत असतो.त्यांना डिघोळ शिवारात गट क्रमांक ८४ मध्ये तीन एकर शेतजमीन आहे,त्यांनी त्यामध्ये कापसांचे पिक घेतले. दरऱोज प्रमाणे दि २८/८/२२ रविवारी त्या शेतात गेल्या होत्या,त्यांनी शेतातील धुऱ्यालगत गावातील योगेश मुरलीधर जाधव यांची बिर्याणी( हाऊस) हॉटेल आहे, फिर्यादी महिलेच्या शेतातील झाड हॉटेलच्या जवळ उपटलेली दिसली त्यांनी त्यांच्या शेतातील कापसाच्या बोंडाची भरलेल्या झाड उपटून कोणी तोंडली त्यामुळे त्यांनी कोणत्या कडूने झाड उपटली असे उद्गार त्यांच्या तोंडून शब्द निघाले.तेवढ्यात हॉटेल मध्ये असलेले योगेश जाधव यांनीही हे उद्गार ऐकले त्यांनी त्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तुला काय करायचे ते कर, करायचे ते बघून घेईन तु जर पोलीसांना तक्रार दिली तर जिवंत मारीन अशी जीवे मारण्याची धमकी, जातिवाचक शिवीगाळ केली.त्या बद्दल दिनांक २९ /८/२२ सोमवार रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात आरोपी योगेश मुरलीधर जाधव राहणार डिघोळ यांच्या विरोधात कलम ५०४,५०६,३(१)(r),३(१)(s), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कमलापूर शाळेचा अनोखा उपक्रम ;शाळेतील वृक्षांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
श्री अष्टविनायक प्रतिष्ठाण श्री गणेश उत्सव २०२२
Thursday, August 25, 2022
सोनपेठच्या भ्रष्टाचारी राक्षसाला सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक जान नाही ; एकदाच केवळ नट्या नाचवल्या - प्रभाकर शिरसाट
Tuesday, August 23, 2022
सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षसा "क्या हुवा तेरा वादा", शुध्द व स्वच्छ पाणी स्वप्नात - प्रभाकर शिरसाट
Monday, August 22, 2022
सोनपेठ शहरातील दहा गाढव वॉटर फिल्टर येथे जेरबंद ; कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांची कारवाई
सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस हा कसा "रंग बदलनारा सर्ड्या" - प्रभाकर सिरसाट
सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते
सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते
सोनपेठ (दर्शन) :-
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले. जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.


































