Saturday, November 30, 2019

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

औरंगाबाद विभाग पदवीधर  मतदारसंघाची 
प्रारुप मतदार यादी प्रसिध्द 
                                                                 
 परभणी, दि. 30 :- पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत दि.1 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत अर्ज स्विकारण्यात आले होते. त्यांची प्रारुप मतदार यादी दि.23 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी मतदार यादी  परभणी तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात उपलब्ध आहे. तसेच यादीतील नावामध्ये दुरुस्ती, लिंग, वय, वास्तव्य इत्यादीबाबत आक्षेप असल्यास पुराव्यासह दि.9 डिसेंबर 2019 पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावेत. तसेच अद्यापही आपले नाव मतदार यादीत समाविष्ट नसल्यास फॉर्म नं 18 भरुन त्यासोबत पदवी प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, रंगीत छायाचित्रासह नोंदणी दि.9 डिसेंबर 2019 पर्यंत करावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.सुचिता शिंदे यांनी केले आहे.
-*-*-*-*-

गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव प्रथम वर्धापन दिन वत्कृत्व स्पर्धा घेऊन साजरा स्पर्धेत प्रथम स्नेहल कदम व सानिया शेख

गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव प्रथम वर्धापन दिन  वत्कृत्व स्पर्धा घेऊन साजरा स्पर्धेत प्रथम स्नेहल कदम व सानिया शेख
सोनपेठ (दर्शन)  :- 

गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव प्रथम वर्धापन दिन व म.फुले  यांच्या १२९व्या स्मृती दिनानिमित्त गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव च्या वतीने भव्य दिव्य खुल्या  वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन २८नोव्हेंबर२०१९ गुरुवार रोजी, जि.प.प्रा.शा. थडीउक्कडगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
लहान गट ४थी ते ७वी  व मोठा गट ८वी ते १०वी अशा गटामध्ये स्पर्धा होती.लहान गटा मध्ये प्रथम पारितोषिक थडी पिपंळगाव येथील कु.स्नेहल कदम L.R.K स्कुल सोनपेठ हिने पटकावले तर व्दितीय पारितोषिक  विटा(खु)  येथील संघप्रिया तुपसमिंद्रे व्हिजन स्कुल सोनपेठ हिने, तर तृतीय पारितोषिक लासीना येथील प्रथमेश कदम लाल बहादुर शास्ञी विद्यालय लासीना यांनी पटकावले. मोठ्या गटामध्ये प्रथम पारितोषिक शेळगाव येथील सानिया शेख -व्हिजन स्कुल सोनपेठ,  व्दितीय पारितोषिक थडीउक्कडगाव येथील हर्षदा धोपटे (पोहंडुळ) जि.प.प्रा.शा.थडीउक्कडगाव तर, तृतीय पारितोषिक थडीउक्कडगाव येथील रुपाली भंडारे हिने पटकावले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.महेश चांदवडे हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.नागेश पाचांळ सर व पांडुरंग धोपटे हे होते.स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणुन श्री.कोलते सर यांनी कामकाज पाहिले तर सर्व विजेताचे  शालेय साहित्य व रोख रक्कम व बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव च्या  वतिने पौळ सर,गुरव सर सोनपेठ , नरहरी जाधव सर, मुन्ना रोडे, सुभाष कदम थडी पिपंळगाव या सर्व पाहुण्यांचे व तसेच  शालेय समिती अध्यक्ष श्री. महेश चांदवडे व उपअध्यक्ष श्री.पांडुरंग धोपटे यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.शशिकांत बिराजदार सर यानीं केले तर,  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव चे श्री. रणजीत भंडारे यांनी केले .व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. कुभांर सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव चे श्री. रणजीत भंडारे,गोविंद चांदवडे, परमेश्वर वासुंबे, हानुमान कारकर, अशोक सोपान चांदवडे, राजेश तेलभरे,  ऋषिकेश कारकर, सचिन कारकर, अशोक गव्हाणे इ.कार्यकर्ते व पदाधिकारी  तसेच मुलांचे पालक व विद्यार्थी व विद्यार्थीनिंची कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती होती.

Friday, November 29, 2019

सोनपेठ येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या दि.1 डिसेंबर किर्तनसेवेची वेळ सांयकाळी 6 ते 9 साप्ताहिक सोनपेठ दर्शन आयोजक यांच्या वतिने माहिती

सोनपेठ येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या दि.1 डिसेंबर किर्तनसेवेची वेळ सांयकाळी 6 ते 9 साप्ताहिक सोनपेठ दर्शन आयोजक यांच्या वतिने माहिती 


Tuesday, November 26, 2019

फडनवीसांचा होणार यद्दियुरपा,बहुमत चाचणी आदिच देणार राजीनामा ?

फडनवीसांचा होणार यद्दियुरपा,बहुमत चाचणी आदिच देणार राजीनामा ?

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. अवघ्या 30 तासांत बहुमतासाठी लागणाऱ्या 145 आमदारांची जुळवाजुळ झाली नाही आणि विधानसभा अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला नाही तर बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या येद्दियुरपांनीही असेच केले होते.

संविधान दिनाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे घोडेबाजाराला फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे 30 तासांत बहुमतासाठी लागणारा 145 आकडा जुळवणे भाजपला म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी आधी होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडीवरच भाजपची पुढील रणनीती अवलंबून राहाणार आहे. भाजपचा विधानसभा अध्यक्ष झाला तरच बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि तसे झाले नाही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाताच राजीनामा द्यायचा, अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे.

Monday, November 25, 2019

अजित पवारांना मोठा धक्का,जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार ; अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड

अजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार ; अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. आमच्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. अजित पवार हे गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनाच पक्षाचा व्हिप बजवाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार अजित पवारांच्या बाजुने आपला हक्क बजावतील. मात्र, नव्या माहितीनुसार अजित पवार हे विधीमंडळ नेते नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भाजपकडून करण्यात येणारा दावा फोल ठरला आहे. तसेच अजित पवार यांना आता कोणतेही अधिकार नसल्याने ते व्हिप बजावू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अधिकृत विधिमंडळ नेते हे जयंत पाटील आहेत, हे विधिमंडळाच्या सचिवालयात लेखी नोंद असल्याने त्यांनाच व्हिपचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज सकाळी १०.३० वाजता निकाल देणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळ द्यायचा यासंदर्भात न्यायालय आदेश देईल. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांनी ऐकला. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला. आता आज त्यावर निर्णय देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले. तिकडे महाविकासआघाडीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर आमदारांना संध्याकाळी मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली. दरम्यान अजित पवारांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील रेकॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे आता नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडणार याबद्दल उत्सुकता लागली.

जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते अधिकृत.

विधिमंडळाच्या दृष्टीने जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते आहेत.

त्यामुळे व्हिप काढण्याचा अधिकार जयंत पाटील यांना राहतो.

अजित पवारांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची माहिती राष्ट्रवादीने विधिमंडळाला दिली नव्हती.

तर जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची माहिती राष्ट्रवादीने काल विधिमंडळाला दिली आहे.

 त्यामुळे विधिमंडळाच्या दृष्टीने जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते असून विधिमंडळ कामकाजाबाबत पक्षाच्या आमदारांना व्हिप काढण्याचे अधिकार जयंत पाटील यांनाच आहेत.

कवी प्रमोद जाधव यांच्या 'मुक्या भावना ' चारोळीसंग्रहाचे प्रकाशन

कवी प्रमोद जाधव यांच्या 'मुक्या भावना ' चारोळीसंग्रहाचे प्रकाशन 

केज / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यस्तरीय प्रेम काव्यमहोत्सव व एकता सेवाभावी संस्था, परभणी आयोजित काव्यमहोत्सव केज येथे दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी मा.अनिल मोरे  कवी व अभिनेते, प्रा. डॉ. अशोक जोंधळे कवी व संगीतकार, डॉ. राजेश गायकवाड ज्येष्ठ साहित्यिक , अजमत खान संस्थापक अध्यक्ष एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र,  संगीता जामगे समाजसेविका गंगाखेड,  प्रा. सत्येंद्र राऊत  कवी,  अभिनेते व मुख्य  संयोजक  यांच्या हस्ते डाॅ.पं.दे.रा.शिक्षक परिषदेचे सोनपेठ तालुका उपाध्यक्ष कवी प्रमोद जाधव यांच्या 'मुक्या भावना ' चारोळीसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. व काव्य सादरीकरणाबद्दल सन्मानित करण्यात आले.

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला 45.93 कोटींचा निधी

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला 45.93 कोटींचा निधी
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देवून उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

 केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी 2017 मध्ये ‘खेलो इंडिया’ ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

   महाराष्ट्रात ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 

 केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजु यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.25 नोव्हेंबर 2019 सोमवार रोजी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.
श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार

भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

 राज्यातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आज आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही असे सांगून, त्यानंतर राज्यात आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू,असे स्पष्ट केले आहे.

राज्यातील राजकीय उलथापालथी नंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी राष्ट्रवादीचे ११ आमदार असल्याची माहिती मिळाली होती.मात्र त्यापैकी काही आमदार परत आमच्याकडे आले आहेत. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्यांचे पत्र सरकारच्या पाठिंब्यासाठी नव्हते. आम्ही पक्षांतर्गत घेतलेल्या त्या सह्या होत्या. त्या राज्यपालांना सादर करून आकडा दाखवण्यात आला असावा, असा माझा अंदाज आहे, असे सांगत, राज्यपालांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांनी केलेला प्रकार हा शिस्तभंगाचा आहे. प्रामाणिक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपाबरोबर जाणार नाही. जे कोण त्यांच्यासोबत गेले त्यांना याबाबत माहिती होती. पक्षांतर्गत बंदी कायदा असल्याने जो कोणी वेगळा विचार करेल. त्यांच्याविरोधात आम्ही तिन्ही पक्ष योग्य ती भूमिका घेवू असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.जे जाणार असतील त्यांच्याविरोधात कारवाई होईल. सर्वसामान्य माणूस हे अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही.  अजित पवारांसोबत १० ते १२ जण जे गेले त्यातले काही परत येत असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनी आम्हाला फोन करून राजभवनात जायचे असा निरोप दिला.आम्हाला राजभवनात का नेले हे माहित नव्हते. सकाळी सात वाजता आम्ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पोहचलो. ज्यावेळी राजभवनात शपथविधी सुरू झाला तेव्हा आम्हाला याची कल्पना आली. आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्या ठिकाणी नेण्यात आले असल्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, संदिप क्षिरसागर यांनी सांगितले .सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा आमच्याकडे होता. आमच्याकडे १७० च्या आसपास बहुमत होते.या घडामोडीनंतर राज्याच्या आम्ही सरकार स्थापन करणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

आमची लढाई भाजपाच्या ‘मी’पणाविरोधाच सुरूच राहणार असून, आम्ही तिन्ही पक्ष सर्व चर्चा दिवसाढवळ्या करतो, ते समोरचे लोक फोडून करतात. आम्हाला विरोधीपक्ष नको, प्रतिस्पर्धी नको असे सध्या सुरू आहे. कोणी पाठित वार करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Friday, November 22, 2019

सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ; प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड

सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ; प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड 
सोनपेठ (दर्शन) :-


सोनपेठ तालुक्यात एकुण ६० गांवे वाडी तांडे आहेत. तालुक्यातील अजारी रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर शेळगांव, वडगांव, डिघोळ ई , शिर्शी बु, लासीना, कानेगांव, खडका, नरवाडी, आवलगाव, ऊखळी बु, धामोनी असे तालुक्यातील विविध गांवामध्ये दहा उपकेंद्र आहेत.या ठिकाणी सामान्य रूग्णांना प्राथमिक उपचार मिळतो तर गंभीर रूग्णांना मात्र आपल्या उपचारासाठी परळी, अंबेजोगाई व परभणी सारख्या ठिकाणी जावे लागले. तालुक्यासाठी शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत.यामुळे रुग्णाना उपचार वेळेत मिळत नाही.आरोग्य अधिकारी हे येथील प्रा. आरोग्य केंद्रात सातत्याने उपस्थित नसतात यामुळे यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहिले नाही यामुळे येथील कर्मचारी रुग्णांना तुच्छ दर्जाची वागणूक देत असल्याचे रुग्णांकडून बोलल्या जात आहे.तर सोनपेठला ग्रामीण रूग्णालय मंजुर झाले आज मितीला रुग्णालय ईमारतीचे बांधकामही पुर्ण झाले आहे. आता सोनपेठकरांना प्रतीक्षा आहे ती नविन ईमारतीमध्ये रूग्णालय सुरु होण्याची.  या ईमारतीच्या उदघाटणाचा मुहूर्त प्रशासनाला मिळत नाही. संपुर्ण बांधकाम पुर्ण होऊनही तिथे रुग्णसेवा सुरु होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. या नविन ईमारतीमध्ये लवकर रूग्णालय सुरु केले नाही तर शहराचे बाहेर अडवळणीस असलेल्या या सुंदर ईमारतीची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
चौकट:-
-------------------------------------------------------------------
:- औषधाचा तुटवडा व कर्मचाऱ्यांची मनमानी
उपकेंद्राची २४ तास सेवा असतांना येथे नेहमीच औषधांचा तुटवडा जानवतो.तालुक्यातील गावातील पुरवठा करणा-या विहीर, विंधन विहीरीच्या इत्यादी पाण्याचे नमूने जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठविले जातात. सद्ध्या आरोग्य विभागाला दक्ष रहाण्याची आवश्यक्ता असुन नागरीकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तालुक्यात रिक्त पदासह औषधांचा साठा पुरवण्याची संबंधितानी या अपु-या औषधी साठी त्वरित पाऊल उचलने महत्त्वाचे आहे.सद्या डेंग्यू, मलेरिया या सारख्या गंभीर आजाराची साथ सर्वदूर असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे औषधी साठा उपलब्ध नसल्याचे बोलल्याजात आहे.एकंदरीत तालुक्यासाठी एकमेव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदासह अपु-या औषधी साठा उपलब्ध करण्याची मागणी नागरीकातून होतं आहे.
-------------------------------------------------------------------

चौकट
-------------------------------------------------------------------
सोनपेठची ग्रामीण रुग्नालयाची भव्य ईमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत 

सोनपेठ तालुक्यातील सर्व प्रकारच्या अजारी रूग्णांसाठी तालुक्याचे ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे या मागणीसाठी येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व नागरीकांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीले. अनेक अंदोलने व सततच्या पाठपुराव्यामूळे येथील जनतेची मागणी पुर्ण करुन शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजुर केले. यासाठी तब्बल तीन कोटी सत्तर लाख रुपयेे खर्च करुन एक भव्य ईमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत उभी आहे. आता येथील नागरीकांना प्रतिक्षा लागलीय ती नव्या ईमारतीमध्ये ग्रामीण रुग्नालय सुरु होण्याची.

-------------------------------------------------------------------

चौकट
-------------------------------------------------------------------
ग्रामीण रूग्णालयातील २५ पदांना मान्याता

      येथील ग्रामीण रूग्णालयासाठी २५ पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये नियमित दहा पदांना मंजुरी देण्यात आली असुन वैद्यकीय अधिक्षक एक, वैद्यकीय अधिकारी तीन , अधिपरिचारीका तीन , भांडारपाल, मिश्रक व कनिष्ठ लिपीक यांची प्रत्येकी एक पद तसेच काल्पनिक कुशल पदामध्ये अधिपरिचारिकांची चार पदे , क्ष किरण तंञज्ञ एक, प्रयोगशाळा सहाय्यक एक, प्रयोगशाळा तंञज्ञ एक, कनिष्ठ लिपीक एक, शिपाई एक व कक्ष सेवक चार व काल्पनिक अकुशल पदामध्ये सफाई कामगाराची दोन पदांना मान्यता देण्यात आली असून येथील ग्रामीण रूग्णालयासाठी २५ पदे मंजुर करण्यात आली आहेत. ग्रामीण रूग्णालयासाठी पदांना मान्यता दिली तरीही ही पदे लवकरात लवकर भरती करून व रूग्णालयासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करून ग्रामीण रूग्णालय चालू करण्याची मागणी नागरिका मधून करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया:- 

1) 
तालुक्यात तापीची खबरदारी घेत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहे तसेच प्रत्येक घरी जाऊन रुग्णांवर उपचार, तपासण्या करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांना मुख्यालायस राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय संदर्भात वरिष्ठांशी पाठपुरावा चालू आहे. 

डॉ. सुभाष पवार
तालुका आरोग्य अधिकारी,सोनपेठ.

2)
वेळेवर उपचार मिळत नाही डॉक्टर वेळेत येत नाहीत सकाळी अकरा च्या नंतर दवाखान्यात कर्मचारी उपस्थित असतात सिस्टरला रुग्णांनाच्या उपचारासाठी विचारल्यानंतर त्या म्हणतात मी एकटी आहे. काय करू आणि कुठे कुठे पाहू प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणाचेच नियंत्रण नाही. 

दीपक मोटे
नागरीक सोनपेठ.

केंद्रीय पथकाव्दारे पिक नुकसानीची पाहणी

केंद्रीय पथकाव्दारे पिक नुकसानीची पाहणी
औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन): –
राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पिक हातचे गेले. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी  केंद्रीय कृषी विभागाच्या पाहणी पथकाव्दारे आज 22 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड या तालुक्यातील गावांमधील पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद  साधून नुकसानीचा आढावा घेतला. 
या पाहणी पथकाचे  प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल  व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा कृषी अधिक्षक तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे(फुलंब्री) , ब्रिजेश पाटील (सिल्लोड), जनार्दन विधाते (कन्नड) यांच्यासह इतर संबधिंत अधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. 
यावेळी फुलंब्री तालुक्यातील चौका येथून नुकसानग्रस्त  भागाच्या पाहणीस पथकाने सुरवात केली. येथील कांचनबाई नाना वाघ यांच्या दिड एकर शेतातील  मका पिकाचे पूर्णत:  नुकसान झालेले असून पथक प्रमुखांनी त्या शेतात अजूनही साचून असलेले पाणी, अवकाळी पावसामुळे काढता न आलेला मका याची पाहणी केली. श्रीमती कांचन वाघ यांच्याशी संवाद साधून पथकाने त्यांच्या समस्या , झालेले एकंदरीत नुकसान याबाबत माहिती जाणून घेतली.  पुढे पाल गावातील  पिकाची पाहणी करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. या गावातील कृष्णा जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, अवकाळी पावसामुळे एका एकरातील  उभे पिक हातचे गेले असून ज्या  कपाशीला 50 रु कि. भाव मिळतो तिथे आज नाईलाजाने आम्हाला 10 ते 15 रुपये किलो भावात विकावी लागत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक अडचण कोसळली आहे,अशा भावना यावेळी शेतकरी जाधव यांनी व्यक्त केल्या. पाथ्री येथील मंदाकीनी पाथ्रीकर यांच्यासह या भागातील शेतीतील कपाशी पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी पथक पाहणीत दिसून आले. 
 पथकाने सिल्लोड तालुक्याचीही पाहणी केली. तालुक्यातील गेवराई शेमी येथील कडुबा ताठे, माणिकराव ताठे, साहेबराव ताठे, मुरलीधर कापडे, या शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने त्यांचे म्हणणे जाणून घेतले. निल्लोड येथील पांडुरंग आहेर यांच्या मका, सोयाबीन, कापूस,पिकांचे अवेळीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. वंजोळा गावातील विष्णू पंडित या शेतकऱ्याच्या सहा एकर शेतातील मका, कापूस ही दोन्ही पिके शंभर टक्के वाया गेली. मका दुबार पेराही रोग पडल्याने खराब झाल्याचे श्री. पंडित यांनी यावेळी सांगितले.  धानोरा गावातील सुभाष बमनावत यांच्या दिड एकरातील दोन लाख खर्च करुन लागवड केलेल्या अद्रक पिकावर रोग पडल्याने संपूर्ण अद्रकीचे पिक खराब झाले असून संपूर्ण गावात हीच परिस्थिती आहे. भराडी गावातील शिवाजी खोमणे या शेतकऱ्याने सांगितले की, 22 दिवस सतत पाऊस झाल्याने दोन एकरातील मका पूर्णत: पाण्यात भिजून खराब झाली ,सडली आणि जनावराने ती खाल्याने ती मृत  झाल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले. या पाहणी दौऱ्यात पुढे  पुढे कन्नड तालुक्यातील आडगाव पिशोर येथील गेनुबाई भिवान भोसले यांच्या बत्तीस गुंठे शेतात मका आणि कपाशी होती पण एक महिन्यापासून पाणी साचले आहे. पाणी आटण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. शेतातील पूर्ण पिक हातचे गेले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. नाचनवेल येथील राधाबाई राजपूत यांनी आपल्या दोन एकर शेतातील कापूस पूर्ण वाया गेला असून किमान बि-बियाणांचा आणि खताचा खर्च सरकारने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर  नाचनवेल शिवारातील कोपरवेल येथील शिवाजी धुमाळ यांनी आपल्या एक एकर मक्याचे पूर्ण नुकसान झाले असून दहा दिवस पाऊस होता आता आम्ही काय करावं, काही सुचत नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
 पाहणी दौऱ्यापुर्वी आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पथकासमोर विभागातील नुकसानीचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.
 
******

जिल्हा प्रशासनाकडून सैन्य भरतीचे आयोजन ; उमेदवारांनी सैन्य भरतीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी - कर्नल तरुण जमवाल

जिल्हा प्रशासनाकडून सैन्य भरतीचे आयोजन ; उमेदवारांनी सैन्य भरतीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी - कर्नल तरुण जमवाल  
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  औरंगाबाद येथील सैन्य भरती कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातीलउमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर गुरुवार दि. 19 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करावी. असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्यानिमित्त आयोजित पुर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विद्यापीठ, आरोग्य, महापालिका, पोलिस, सैनिक कल्याण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
            पुढे बोलतांना कर्नल श्री.जमवाल म्हणाले की, या वर्षी भारतीय सैन्य दलाकडून परभणी जिल्ह्यात दि.4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे. आवेदनपत्र भरण्यास दि.21 नोव्हेंबर 2019 रोजी संकेतस्थळावर  चालु झाले असून त्याचा अंतिम दि.19 डिसेंबर 2019 असा आहे. ऑनलाईन नोंदणी करुन प्राप्त केलेल्या प्रवेशपत्राशिवाय या सैन्य भरतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी ऑनलाईन संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक असून याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सैन्य भरतीच्या काळात शहरात व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परिसरात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेवून सैन्य भरती काळात विविध ठिकाणाहुन येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या   विविध विभाग प्रमुखांना सुचना दिल्या तसेच सैन्य भरतीच्या काळात जिल्‍हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी सैन्य भरती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले.                                                          -*-*-*-*-

Thursday, November 21, 2019

नारायणराव खेडकर यांचे दुःखद निधन

नारायणराव खेडकर यांचे दुःखद निधन
सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळी चे अध्यक्ष तथा श्री महालिंगेश्वर विद्दालयाचे ग्रंथपाल तसेच दैनिक मराठवाडा साथी तालुका प्रतिनीधी राजेश्वर खेडकर यांचे चुलते नारायणराव मारोतराव खेडकर (सोनपेठकर) यांचे आज दि.२२ नोव्हेंबर २०१९ शुक्रवार रोजी दुपारी १२:०० वा. अल्पशा आजाराने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर आजच सायंकाळी ०६:०० वा. सोनपेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.नारायणराव खेडकर यांना सर्वस्तरातुन तसेच सा.सोनपेठ दर्शन परिवाराच्या वतिने भावपुर्ण श्रदांजली वाहण्यात आली.

सोनपेठ न.प.कार्यालय स्थलांतरास सर्वपक्षीय विरोध


सोनपेठ न.प.कार्यालय स्थलांतरास सर्वपक्षीय विरोध 

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील सर्व पक्षीय व सर्व व्यापारी असोसिएशन तसेच सर्व नागरिकांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना दिनांक 20 नोव्हेंबर 2019 बुधवार रोजी एका निवेदना द्वारे खालील प्रमाणे मागणी करण्यात आली निवेदनात सोनपेठ न.प.चे कार्यालय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे स्थलांतरित होत आहे, वास्तविक पाहता पर्यायी जागा जुने तहसील कार्यालय, जुने वरपुडकर कॉलेज इमारत तसेच कै. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुलातील वरच्या मजल्यावरील रिकामी गाळे जेकी सांस्कृतिक सभाग्रह पेक्षा न.प.ला वार्षिक उत्पन्न अत्यल्प किंवा गाळे रिकामेच आहेत. सांस्कृतिक सभागृह येथे स्थलांतर हे आर्थिक नुकसान जास्त व सर्व व्यापारी असोसिएशन धारकांना व्यवसायावर परिणामकारक ठरणार आहे. सर्वसाधारण वर्गाच्या लोकांना महाग मंगल कार्यालय पैशांनी व अंतराने परवडणारे नाही हे मध्यवर्ती ठिकाण असून हे जाणून-बुजून कार्यालय पूर्व ग्रहदूषित एक षड्यंत्र आहे. या शहरातील सर्वपक्षीय व सर्व व्यापारी तसेच सर्व नागरिक तीव्र विरोध करत असून या स्थलांतरात स्थगिती देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेवटी दिलेला आहे या निवेदनावर काय कारवाई होते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

Wednesday, November 20, 2019

ग्राहकांनी तक्रारी न्याय मंचाकडे दाखल कराव्यात - श्रीमती अनुराधा सातपुते

ग्राहकांनी तक्रारी न्याय मंचाकडे दाखल कराव्यात - श्रीमती अनुराधा सातपुते                                      
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

डिजीटल युगात प्रत्येक ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून ग्राहक तक्रार न्याय मंचाकडे जास्तीत जास्त  तक्रार दाखल करुन न्याय मिळवावा. असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार न्याय मंचाच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते यांनी केले.

            परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जागो ग्राहक जागो या मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील अधिकारी -कर्मचारी आणि अशासकीय सदस्यांना एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती ज्योत्स्ना धुळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, पुरवठा विभागाचे श्री. पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे डॉ.विलास मोरे, धाराजी भुसारे, अब्दुल रहिम आदि प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीस  मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.

            याप्रसंगी अन्नभेसळ सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी अन्नभेसळ कायदा व ग्राहकांमधे जागरुकता निर्माण करण्यासाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच वैधमापन प्रशासनाचे सहाय्यक नियंत्रक प्र.र.परदेशी यांनी वैधमापन प्रशासनाचे कायदे व अधिकाराची माहिती दिली. तर जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.  अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास मोरे यांनी ग्राहक परीषदेच्या शासकिय व अशासकिय सदस्यांच्या समन्वय ठेवून प्रत्येक शंकेचे निरसन करावे याबाबत व इतर सर्व विषयांवर  मार्गदर्शन करुन कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी ग्राहक परिषदेचे  किरण स्वामी, के.बी.शिंदे  आदिसह इतर सदस्य, सदस्या व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                        -*-*-*-*

Monday, November 18, 2019

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत परभणी खुला (महिला) !

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत परभणी खुला (महिला) !
मुंबई / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्रात सर्व जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष पदासाठि आरक्षन सोडत नुकतीच जाहिर झाली ति खालील प्रमाणे आहे.खास सा.सोनपेठ दर्शन वाचकांसाठि
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी विटभट्टीवर जाऊन मजुरांना केले रेशनकार्ड वाटप

तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी विटभट्टीवर जाऊन मजुरांना केले रेशनकार्ड वाटप
सेलु / सोनपेठ (दर्शन) :-

सेलु तालुक्यातील वालुर येथिल प्रतेक तहसीलदारांनी अनुकरण करण्यासारखी घटना अतिवृष्टी चे संकट शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतानाच शेतकऱ्यांना धीर देऊन,शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट व कृतीतून आधार देण्याचे काम करीत असतानाच , विटभट्टीवर अतिश्रमाचे काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबाना रेशनकार्ड वितरित करून, त्यांना हक्काचे रेशनवरील धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वालूर शिवारातील चार-पाच विटभट्टीवर स्वतः तहसीलदार बालाजी शेवाळे पोहंचले, विटभट्टीवर च रेशनकार्ड तयार करून घेतली व त्या ठिकाणी वाटपही केले, याप्रसंगी मजुरांना आनंदाश्रू अनावर झाले होते,त्यांच्या स्वप्नात ही माहित नव्हते की या प्रकारे मजूरांना तहसीलदार लाभ मिळवून देतील.
यावेळी वाळूर तलाठी हनुमान बोरकर,चिखलथानाचे तलाठी सचिन नवगिरे, ड्रायवर लक्ष्मण पानझडे यांनी मजुरांची यादी करणे, रेशनकार्ड वर माहिती भरणे करिता सहाय्य केले.

Saturday, November 16, 2019

वै.उत्तमराव आबाजी विटेकर यांचा पाचव्या पुण्यस्मरण व पुरस्कार सोहळा

वै.उत्तमराव आबाजी विटेकर यांचा पाचव्या पुण्यस्मरण व पुरस्कार सोहळा
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ तालुक्यातील विटा (खु) येथिल वै.उत्तमराव आबाजी विटेकर यांचा पाचव्या पुण्यस्मरण व पुरस्कार सोहळा मिती कार्तिक कृ.८शके १९४१ दि २०/११/२०१९ वार बुधवार रोजी करण्याचे योजिले आहे,तरी त्या निमित्त श्री.ह.भ.प.भागवताचार्य बाळु महाराज गिरगावकर यांचे सकाळी ११ ते १ या वेळेत किर्तन होईल व या कार्यक्रमात वारकरी सांप्रदायातील नेत्रदिपक योगदाना बद्दल मान्यवरांचा व शेतीनिष्ठ आदर्श शेतकऱ्यांचा माजी आमदार वै उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.

************ सन्मानित मान्यवर **************
१)ह भ प न्याय वेदांताचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री दाठणकर.
(पुरस्कार _न्याय ,साहीत्य,वेदांताचार्य)
२)ह भ प विनोदाचार्य बाबासाहेब हंगळे महाराज बीड. 
(पुरस्कार_ किर्तन रत्न)
३)ह भ प राम महाराज काजळे,ताडबोरगाव ता मानवत.
(पुरस्कार_ मृदंग महामेरु)
४)श्री मारुती रामराव घनवटे ता गंगाखेड.
(पुरस्कार_ प्रगतशील शेतकरी)

विनित 
मा.राजेश उत्तमराव विटेकर
अँड.श्रीकांत उत्तमराव विटेकर

*********** कार्यस्थळ *********
श्री चिंतामणी कृषी तंत्र विद्यालय,विटा(खु),ता.सोनपेठ.जि.परभणी. 

बाल दिनानिमित्त बालकामगार विरोधी जनजागृतीपर रॅली संपन्न

बाल दिनानिमित्त बालकामगार विरोधी जनजागृतीपर रॅली संपन्न 
                                                               
परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 
14 नोव्हेंबर बाल दिनाच्या निमित्ताने जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार विरोधी जनजागृती रॅली उत्साहात संपन्न झाली.
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर व जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आर.टी.रुमाले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. रॅलीस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरुवात होवून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत समारोप करण्यात आला. यावेळी सरकारी कामगार अधिकारी श्री.रुमाले यांनी लहान वयात काम केल्याने बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होत असतो त्यामुळे बालकांनी शिकावे व कोणत्याही कामावर जाऊ नये असा अमुल्य संदेश यावेळी दिला. कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.घुले, श्रीपाद देशपांडे, बाल हक्क समितीचे अध्यक्ष ॲङ केकान, चाईल्ड लाईनचे समन्वयक  संदिप बेंडसुरे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालकन कार्यक्रम व्यवस्थापक जयश्री पत्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प संचालक आर.एस.पठाण, अफसर पठाण, संतोष पवार, जावेद इनामदार, किशोर बहिरट आदिंनी प्रयत्न केले.
-*-*-*-*-

परभणी शासकीय अध्यापक महाविद्यालयात विविध पदासाठी थेट मुलाखती

परभणी शासकीय अध्यापक महाविद्यालयात विविध पदासाठी थेट मुलाखती
                                                               
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी येथील जिंतूर रोडवरील शासकीय अध्यापक महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी थेट मुलाखतीकरीता महाविद्यालयात शुक्रवार दि.22 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उर्मिला धुत यांनी केले आहे.
अनुक्रमे विज्ञान, इंग्रजी, फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, शारीरिक शिक्षक निर्देशक आणि ग्रंथपाल आदि विषयातील पदे भरण्यात येणार असून संबंधित विषयातील उच्च शैक्षणिक पात्रता धारकांनी  मुलाखतीस हजर रहावे. तासिका तत्वावरील मानधन शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या दराप्रमाणे देण्यात येणार असून मुळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीच्या दोन संचासह मुलाखतीस उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय, परभणी येथे संपर्क साधावा. असे प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, परभणी यांनी कळविले आहे.   
-*-*-*-*-

Friday, November 15, 2019

सिंदखेडराजा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारी 2020 च्या भव्य विचारमंच बांधकामाचा भुमीपुजन समारंभ शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचे हस्ते शिवधर्मपीठ जिजाऊ स्रुष्टी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे दि.15 नोव्हेंबर 2019 शुक्रवार रोजी संपन्न झाला याप्रसंगी ईंजी.अंगद काळे साहेब, सा बां उपविभागीय अभियंता काळवाघे साहेब,अभियंता म्हस्के साहेब,राजु मंडवाले व शिवसेवक ऊपस्थीत होते.

सिंदखेडराजा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारी 2020 च्या भव्य विचारमंच बांधकामाचा भुमीपुजन समारंभ शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचे हस्ते शिवधर्मपीठ जिजाऊ स्रुष्टी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे दि.15 नोव्हेंबर 2019 शुक्रवार रोजी संपन्न झाला याप्रसंगी ईंजी.अंगद काळे साहेब, सा बां उपविभागीय अभियंता काळवाघे साहेब,अभियंता म्हस्के साहेब,राजु मंडवाले व शिवसेवक ऊपस्थीत होते.

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात ; पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूदएस.एम.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात ; पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूद
एस.एम.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

बीड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून गुन्हा सिध्द झाल्यास हल्लेखोरास तीन वर्षांची शिक्षा, आणि ५० हजार रूपयांपर्यत दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आल्याची माहिती पत्रकार संरक्षण कायद्यासाठी गेली बारा वर्षे सातत्यानं लढा देणारे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम देशमुख यांनी दिली..पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यासाठी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.. प़ारभी पत्रकारांच्या वतीने अध्यक्ष सुभाष चौरे यांनी देशमुख यांनी पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
नव्या कायद्यातील तरतुदींची माहिती देताना एस.एम.देशमुख म्हणाले, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल होणारया गुन्ह्याची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांमार्फतच केली जाईल  आणि याचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोरच चालेल. या शिवाय हल्लेखोरांनी पत्रकारावर किंवा मिडियाच्या कार्यालयांवर हल्ला करताना तेथील साहित्याची मोडतोड केली तर त्याची नुकसानभरपाई संबंधित हललेखोरांकडून जमिन महसुलाची थकबाकी होती असे समजून वसूल केली जाईल.. हललेखोरांकडून वैद्यकीय उपचाराचा खर्च देखील वसूल करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
मात्र खोटी तक़ार देणारया पत्रकारास देखील या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आल्याने कायद्याचा दुरूपयोग होण्याची भिती निराधार असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले..
महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अस्तित्वात आला आहे अशी माहितीही एसेम यांनी दिली.
तत्पुर्वी बारा वर्षे कायद्यासाठी राज्यातील पत्रकारांनी कसा लढा दिला याची सविस्तर माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली..यावेळी पत्रकार पेन्शन योजना , आरोग्य योजनेची देखील सविस्तर माहिती देशमुख यांनी  दिली. पत्रकारांची भक्कम एकजूट, माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि आमच्या हाकेला ओ देत राज्यातील पत्रकारांनी आम्हाला खंबीर साथ दिल्याने हा कायदा होऊ शकल्याने लढ्याच्या यशाचे सर्वस्वी श्रेय हे राज्यातील पत्रकारांचेच असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, कार्याध्यक्ष डोळसे, परिषदेचे माजी सरचिटणीस अनिल महाजन, कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे आदि उपस्थित होते.

श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे शिवनाम साप्ताह व शिवकथेचे आयोजन


श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे शिवनाम साप्ताह व शिवकथेचे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तमाम शिवभक्तांना कळविण्यात आनंद होतो कि श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्री नंदिकेश्वर शिवयोगी महाराज सोनपेठकर यांच्या पुण्यतिथी महोत्सव निमित्य व चरपठ्ठाधिकारी श्री.ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 19 व्या पठ्ठाभिषेक वर्धापन दिन सोहळ्या निमित्य अखंड शिवनाम साप्ताह, परमरहस्य पारायण, शिवदीक्षा संस्कार, दीपोत्सव व संगीतमय शिवकथा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.ष.ब्र.108 गुरु शिवाचार्य रत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (खासदार सोलापुर), श्री.ष.ब्र.108 गुरु श्रीकंठ शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु शंभूलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु सिद्धद्याल शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु शांतलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108
गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु विजयलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु धर्मरत्न डॉ.मलीक्कार्जुन शिवाचार्य महाराज,
श्री.ष.ब्र.108 गुरु विरुपक्ष शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु निर्वानरूप पशुपती शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु गुरुसिद्ध मनिकंठ शिवाचार्य महाराज, श्री.ह.भ.प.भागवताचार्य केशव महाराज, श्री.ह.भ.प.भागवताचार्य हनुमान महाराज आदींची राहणार असून, प्रारंभ दि.20 नोव्हेंबर  2019 बुधवार रोजी तर सांगता दि.26 नोव्हेंबर 2019 मंगळवार रोजी होणार आहे, दि.24 नोव्हेंबर 2019 रवीवार रोजी सायंकाळी 5 ते 7 श्री.ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा 19 वा पठ्ठाभिषेक वर्धापन दिन सोहळा तर दि.25 नोव्हेंबर 2019 सोमवार रोजी सकाळी 8 ते 10 आद्य गुरु नंदिकेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस महाअभिषेक धर्मोलिंगार्चनात्मक माहेश्वर वैदिक मंडळ, परभणी तर 10 ते 12 शिवदीक्षा तसेच संजीवन समाधी स्थळी सायंकाळी दीपोत्सव सोहळा संपन्न होणार आहे, दिनचर्या सकाळी 6 ते 7  नंदिकेश्वर संजीवन समाधीस रुद्रअभिषेक, 8 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 महाप्रसाद, 2 ते 5 संगीतमय शिवकथा शिवकथाकार शि.भ.प. मनिषाताई ज्ञानेश्वर बिडाईत प्रदेश उपाध्यक्षा अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र, 5 ते 7 शिवपाठ, 7 ते 9 शिवकिर्तन शिवकिर्तनकार शि.भ.प. राजेभाऊ खरबड, शि.भ.प. जगन्नाथ क्षिरसागर, शि.भ.प. धनंजय बुलबुले, शि.भ.प. विवेकानंद स्वामी, शि.भ.प. महादेविताई महाजन, शि.भ.प.दयानंद नागापल्ले देवर्जनकर तर 9 ते 10 प्रसाद, 11 ते 4 शिवजागर, पाहटे 4 ते 6 शिवपाठ व काकडा आरती होणार आहे तसेच दि.26 नोव्हेंबर 2019 मंगळवार रोजी सकाळी 8 ते 11 श्री ग्रंथराज परमरहस्य भव्य शोभा यात्रा मिरवणूक तर दुपारी 12 ते 2 प्रसादाचे किर्तन शि.भ.प. मानिकाप्पा धुमाळ नंतर समस्थ पोपडे परिवार यांच्या तर्फे महाप्रसाद होईल.या प्रसंगी सर्व सोनपेठ तालुका मराठी पत्रकार परिषद पत्रकार बांधव आपली उपस्थिती देणार आहेत, तमाम शिव भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर भक्त मंडळी, समस्त वीरशैव समाज बांधव व श्री नंदिकेश्वर विचार मंच आणि श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ आदींनी केले आहे.

सोनपेठ येथे विधी सेवा पंधरवडा दिनानिमित्त पायी व मोटारसायकल रॅली संपन्न


सोनपेठ येथे विधी सेवा पंधरवडा दिनानिमित्त पायी व मोटारसायकल रॅली संपन्न 
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ तालुक्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये कायदेविषयक जनजागृती करण्याकरिता जनसामान्यांना कायदेविषयक कोण कोणत्या विधी सेवा पुरविल्या जातात आणि विधी सेवा समिती द्वारे विविध कायदे योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येऊ शकतो याबाबत गावोगावी जाऊन प्रसार व प्रचार करून लोकांपर्यंत विविध कायद्यांच्या योजनांची माहिती दिनांक 9 नोव्हेंबर 2019 दिनांक 23 नोव्हेंबर 2019 या पंधरवाडा कालावधीमध्ये " विधी सेवा पंधरवडा दिन" कार्यक्रम यशस्वी करणे हेतू येथील मा. दिवाणी न्यायालय क स्तर तथा तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 नोव्हेंबर 2019 गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजता न्यायालय परिसरातून पायी व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करून विटा रोड मार्गे, तहसील समोरून, स्व.वसंतराव नाईक चौक, छत्रपती शाहू महाराज चौक येथे समारोप करण्यात आला व या जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा.एस.एस.खिरापते.(दिवाणी न्यायाधीश क स्तर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अँड.डी.आर.मोकाशे (अध्यक्ष वकील संघ) व सरकारी वकील अँड.बी.एम.लोमटे हे होते तर पायी व मोटरसायकल रॕली मध्ये अँड.डि.टी.यादव, अँड.आर.पी.भिसे, अँड.एस.एस.भिसे, अँड.आर.पी.राठोड, अँड.ए.पी.तिरमले, अँड.के.डी.मोकाशे, अँड.व्हि.आर.धबडे तसेच न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी के.जी.चव्हाण.(सहाय्यक अधिक्षक), तालुका विधी सेवा समितीचे कार्यवाहक रा.ना.अंबोरे, एस.एस.जायभाये, एस.बी.नंब, आर.आर.डोगरे, डि.आर.थिगळे, पी.ए.राऊत, एस.पी.भंर्गोदेव, पि.एम.धोंगडे, कालीदास खडके यांच्यासह कै.र.व.महाविद्यालयाचे " राष्ट्रिय सेवा योजना या विभागाचे सय्यद जफर, शेख अकबर, अमोल टेकनूर, रोहीत चौधरी, गणेश केंद्रे, रजनीकांत वाघमारे, अर्जुन मोरे व योगेश ठाकर आदि स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून सदर रँली शहरात संपन्न करण्यात आली.

Thursday, November 14, 2019

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळावा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळावा    
                                                            
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण तसेच शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दि.15 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे ॲप्रेन्टिशिप पखवाडा अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अप्रेन्टिशिप या पोर्टलवर आस्थापनाची नोंदणी करणे, प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी करणे तसेच एनएपीएस संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व स्थानिक शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनाचे मालक, प्रतिनिधी तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित रहावे. असे परभणी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे. 
-*-*-*-*-

व्हिजन पब्लिक स्कूलची कु.आश्र्लेशा कोस्केवाडची कॕरम स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

व्हिजन पब्लिक स्कूलची कु.आश्र्लेशा कोस्केवाडची कॕरम स्पर्धेत राज्यस्तरावर निवड
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील व्हिजन पब्लिक स्कुलची कु. आश्र्लेशा कोस्केवाडची कॕरम स्पर्धेत राज्यस्तरावर निवड सविस्तर वृत असेकी औरंगाबाद येथे पारपडलेल्या दिनांक 23 आक्टोंबर 2019 रोजी क्रीडा संकुल येथे विभागीय कॅरम स्पर्धा मध्ये व्हिजन पब्लिक स्कूलच्या तीन मुली व एका मुलाची निवड झाली होती यात खूप चांगला खेळ दाखवत कु.आश्लेषा गोविंद कोस्केवाड या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय निवड झाली आहे ती दिनांक 15,16,17 नोव्हेबर 2019 रोजी चिपळूण, रत्नागिरी येथे शाळेचे प्रतिनिधीत्व करणार आहे.त्या निमित्त व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे व उपप्राचार्य भगवान घाटूळ यांनी तिला शुभेच्छा पर अभिनंदन केले व खेळासाठी रवाना केले या तिच्या सफलतेत तिला शाळेचे क्रीडा शिक्षक रविकुमार स्वामी, विठ्ठल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्यामुळे या सर्वांचे अभिनंदन केले व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व सर्व कर्मचारी यांनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या वर्षी विभागावर व आता राज्यस्तरीय स्पर्धेत व्हिजन पब्लिक स्कूलने गगन भरारी घेतली आहे असे सर्व पालकातून बोलले जात आहे.

Wednesday, November 13, 2019

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावेत ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आवाहन

शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावेत ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आवाहन

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांनी  सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षातील  शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर  भरावयाची अंतिम  तारिख १५ नोव्हेंबर २०१९ असून मुदतीत अर्ज करावेत.असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

 सन २०१८ - १९ पासुन महाराष्ट्र शासनतर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in  हे एकत्रित संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र  शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विभागाच्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क व परीक्षा शल्क / विद्या वेतन / निर्वाह भत्ता व इतर योजनाचा लाभ  वितरीत करण्यात येतो . 

 तरी ज्या विद्याथ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाचे राहिलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी दिनाक १५ नोव्हेंबर २०१९ अखेर ऑनलाईन अर्ज भरुन महाविद्यालयाकडे सादर करावेत . विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास लाभापासुन पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास समाज कल्याण कार्यालय जबाबदार राहणार नाही . 
तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयाचे लॉगिनवरील पात्र अर्ज  दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पडताळणी करुन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी यांच्या लॉग इनला पाठविण्यात यावे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

Monday, November 11, 2019

स्व.अरुन टेकाळे यांच्या कुटुंबास नैसर्गिक आपत्तीची शासनाची आठ लाखाची मदत सुपूर्द

स्व.अरुन टेकाळे यांच्या कुटुंबास नैसर्गिक आपत्तीची शासनाची आठ लाखाची मदत सुपूर्द
सोनपेठ (दर्शन) :- 

पाथरी तालुक्यातील विटा बुद्रुक येथील रहिवासी असणारे व्यवसाया साठी सोनपेठ शहरात राहुन मोटार रिवायडींगचे काम करत आपला उदरनिर्वाह भागवणारे स्व.अरुण टेकाळे व त्यांचा मुलगा स्व.मंदार टेकाळे यांचा परतीच्या अवकाळी पावसाने भिंत अंगावर पडून दुर्दैवी अंत झाला होता.या दुर्घटनेमुळे टेकाळे कुटुंबीय उघड्यावर पडले होते.त्यांना आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे असल्याने सोनपेठ येथील तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांनी सर्व गोष्टीची माहिती घेऊन मा.जिल्हाधिकारी पि.शिव शंकर यांच्या कडे शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतुन मदत मिळावी या साठि पाठपुरावा केला या कुटुंबातील सदस्यांंना आठ लाख रुपयाच्या नैसर्गिक आपत्तीची मदत शासनाच्या वतीने दि.11 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात दिली.ही घटना दीवाळीच्या सणात ही घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली होती.स्व.अरुन टेकाळे यांच्या पत्नी कस्तूर टेकाळे ह्या अजूनही गंभीर असून त्या लातूर येथील एमआयटी रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर त्यांची मुलगी अभियांंत्रीकीचे शिक्षण घेत असून ती चंद्रपूर येथे असते.यावेळी या मदतीच्या धनादेशाचे वितरण कांचन टेकाळे व दीपक टेकाळे यांना करण्यात आले.यावेळी तालुक्यातील सर्वस्तरांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ग्रामीण डाकसेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामीण डाकसेवक पदासाठी 
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
                                                                  


परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 
भारतीय डाक विभागाअंतर्गत ग्रामीण डाकसेवक पदासाठी ऑनलाईन पध्दतीने भरती  होणार असून महाराष्ट्रासाठी एकुण 3 हजार 650 जागा आहेत. यामध्ये परभणी विभागातील परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी एकुण 96 ग्रामीण डाक सेवकांची पदे रिक्त आहेत. यासाठी इच्छुकांनी अर्ज दि.30 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन परभणी विभागाचे डाकघर अधिक्षक  यांनी केले आहे.
परभणी डाक विभागातील एकुण 96 जागेपैकी खुल्या प्रवर्गासाठी 43, एससी 8, एसटी9 आणि ओबीसीसाठी 27 तर ईडब्ल्युएससाठी 9 जागा आरक्षीत आहेत. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी http://appost.in/gdsonline अथवा http://indiapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
-*-*-*-*-

परभणी जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

परभणी जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर     
                                                             
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्य निवडणूक आयोगाने दि.4 नोव्हेंबर 2019 रोजी परभणी जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमधील एक थेट सरपंच आणि 47 रिक्त पदांच्या पोट निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमानूसार बुधवार दि.6 नोव्हेंबर 2019 रोजी निवडणूक नोटीस प्रसिध्द करण्यात आली. शनिवार दि.16 नोव्हेंबर ते गुरुवार दि.21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत रविवार वगळुन नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी राहील. शुक्रवार दि.22 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. सोमवार दि.25 नोव्हेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. सोमवार दि.25 नोव्हेंबर 2019 रोजी निवडणूक चिन्ह नेमुन देणे व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. रविवार दि.8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी मतदान घेण्यात येईल. सोमवार दि.9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी करण्यात येईल. तर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल गुरुवार दि.12 डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

Friday, November 8, 2019

राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या ऐतिहासिक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी

राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या ऐतिहासिक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर  देशभरात हायअलर्ट जारी

नवी दिल्ली  / मुंबई  / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या वादग्रस्त राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या शनिवारी सकाळी ऐतिहासिक निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यासाठी देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचे पाच सदस्यीय घटनापीठ शनिवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर करायला सुरूवात करतील, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 16 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे 6 ऑगस्टपासून सलग 40 दिवस सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वादग्रस्त रामजन्म भूमी- बाबरी मशिदीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद 106 वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्टकचेर्‍या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्ट या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.


पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी लवकरच कायदा लागू होणार !

पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी लवकरच कायदा लागू होणार !
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.जवळपास अडीच वर्षे राष्ट्रपतींकडं स्वाक्षरीसाठी पडून असलेले पत्रकार संरक्षण कायद्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी अखेर 28 ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली असून ते विधेयक आता राज्यपालांमार्फत मंत्रालयात आलं आहे. त्यामुळं आता पत्रकार संरक्षण कायद्याच्या मार्गाातील सर्व अडथले दूर झाले असून येत्या दोन-चार दिवसात यासंबंधीचे नोटिफिकेशन निघेल आणि हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.
पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या  नेतृत्वाखाली दीर्घकालिन लढा दिला होता.त्यानंतर 7 एप्रिल 2017 रोजी राज्याच्या दोन्ही सभागृहानं कोणतीही चर्चा न करता पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक पारित केलं होतं.त्यानंतर स्वाक्षरीसाठी ते राष्ट्रपतींकडं पाठविण्यात आलं होतं.त्यावर आता स्वाक्षरी झाल्यानं या विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालेलं आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यव विश्‍वस्त एस.एम.देशमुख आणि विश्‍वस्त किरण नाईक यांनी पत्रकारांच्या लढयास मिळालेल्या यशाबद्दल राज्यातील तमाम पत्रकारांचे अभिनंंदन केले आहे.तसेच सरकारला देखील धन्यवाद दिले आहेत.

वसमत ते कपिलधार पदयात्रेचे सोनपेठ येथे स्वागत

वसमत ते कपिलधार पदयात्रेचे सोनपेठ येथे स्वागत
 
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरात प्रतिवर्षी प्रमाणे वर्ष 28 वे दिनांक 6 नोव्हेंबर बुधवार रोजी श्री गुरु 108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज वसमत यांच्या पवित्र सानिध्यात सिद्धेश्वर मंदिर लासीन मठ वसमत ते कपिलधार पदयात्रा हजारो भक्तगणांनी पाऊल खेळत "गुरुराज माऊली" च्या जयघोषात शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात आगमन झाले या ठिकाणी शैलेश महाजन यांच्या निवासस्थानी प्रथम चहापाणी घेत पदयात्रा संपूर्ण शहरभर भव्य मिरवणूक काढत श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे श्री गुरु 108 ष.ब्र. करबसव शिवाचार्य महाराजांचे स्वागत श्री गुरु 108 ष.ब्र. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी करून या ठिकाणी दोन्ही गुरुवर्य यांच्या शुभहस्ते सा.सोनपेठ दर्शन दिपावली अंकाचे विमोचन करण्यात आले याप्रसंगी प्रथम गुरूंची आरती व दर्शन संपन्न झाले व गुरुंनी विश्रांती घेतली तर पदयात्रा वाजत गाजत श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात समस्त विरशैव समाज बांधवांनी पदयात्रेचे स्वागत करून प्रसादाची सोय करण्यात आली यावेळी या ठिकाणी विरशैव  समाज बांधवांनी पदयात्रे करुना "आरोग्य सुविधा" माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेशदादा विटेकर  यांनी मंजूर केलेले मोफत आरोग्य शिबिराचा लाभ हजारो गरजु पदयात्रेकरुंनी घेतला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल जवंजाळ, डॉ.मन्मथ महाजन, आजेगावकर, आशुतोष दुबे, बडेकर, धीरज गोदाम व रमेश आण्णा आदींनी सहभाग घेऊन सहकार्य केले तर पोलिस प्रशासनाच्या वतीने तीन कर्मचारी संरक्षणासाठी रात्रपाळी वर ठेवण्यात आली होती या पदयात्रेचे प्रस्थान दिनांक 7 नोव्हेंबर गुरुवार रोजी पहाटे 5 वाजता तपोवन, तेलगाव, ढेकनमोहा, बिड मुक्काम घेत कपिलधार येथे दिनांक 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य मार्गदर्शक शिराळे गुरुजी, नाईकवाडे हनुमंत व बाळू मोटे यांच्या मार्गदर्शनात पदयात्रा पुढे चालत आहे.

सोनपेठ (दर्शन) :- श्री गुरु 108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज वसमत यांना साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिपावली विशेषांक 2019 भेट देताना संपादक किरण स्वामी दिसत आहेत.

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

स्ट्रॉगरुमच्या 100 मीटर परीसरात प्रवेशास निर्बंध ; 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी मतमोजणी

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असुन दिनांक , 21 सप्टेंबर 2019 पासुन आदर्श आचारसंहीता लागु केली आहे . परभणी जिल्हयात खालील ठिकाणी विधानसभा मतदार संघ निहाय सुरक्षा कक्ष ( Strong room ) स्थापन करण्यात आले आहेत , दिनांक . 21  ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रीया पार पडल्या नंतर सर्व मतदान यंत्र ( इव्ही एम ) सुरक्षित ठेवण्यासाठी 1 ) 95 - जिंतूर , शासकीय तंत्र निकेतन ( ITI )  औंढा रोड जिंतूर , 2 ) 96 -परभणी , कृषि अभियांत्रीकी महाविदयालय , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , 3 ) 97- गंगाखेड , संत जनाबाई महाविद्यालय , कोद्री रोड गंगाखेड 4 ) 98 - पाथरी शासकीय तंत्र निकेतन ( ITI ) , विटा रोड पाथरी या ठिकाणी दिनांक , 24 ऑक्टोबर , 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे . त्यामुळे सदरील स्ट्रॉगरुमचे 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर निबंध घालणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे . त्याअर्थी परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी फौजदारी व्यवहार प्रक्रिया 1973 चे कलम 144 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन उपरोक्त नमुद ठिकाणी स्थापन केलेल्या स्ट्रॉगरुमच्या 100 मिटरचे परीसरात कोणत्याही व्यक्तीस / वाहनास / फेरीवाल्यास प्रवेश करण्यास , तसेच तात्पुरती किरकोळ मालाची दुकाने / खादयगृह थाटण्यावर  तसेच सर्व सार्वजनिक टेलीफोन / एसटीडी / आयएसडी । भ्रमणध्वनी ( मोबाईल ) , फॅक्स केंद्र , झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत . आदेश दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 8  वाजेपासुन ते दिनांक 24  ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 12 वाजेपावेतो लागु राहतील तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने या आदेशाची प्रसिध्दी दंवडीव्दारे / ध्वनीक्षेपकाव्दारे तसेच इतर सर्व प्रसिध्दी माध्यमाव्दारे पोलिसांनी करावी, असेही आदेशात नमूद आहे .
-