Thursday, December 21, 2023

सोनपेठ शहरात उद्या मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष, भव्य फेरी द्वारे सभेसाठी आवाहन...

सोनपेठ शहरात उद्या मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष, भव्य फेरी द्वारे सभेसाठी आवाहन...


सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरात दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री गणेश जिनिंग मैदान येथे होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य दिव्य जाहीर सभेत उद्या मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोनपेठ येथील भव्य दिव्य महासभेत लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याच्या करिता सोनपेठ तालुक्यातील गाव गावाचे स्वयंसेवक 500 नियुक्त केले आहेत, तसेच समाज बांधवांना खिचडीची सोय खपाट पिंपरी येथील सकल मराठा समाज बांधवांनी उचलली असून सोनपेठ शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ही खिचडी व पिण्याच्या पाण्याची सोय हाती घेतलेली दिसून येत आहे, सोनपेठ नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या पुढाकारांने मानवत नगर परिषद चे फिरते शौचालय 2 सकल मराठा समाज बाधवांच्या सोईसाठी शहरात दाखल झालेले आहेत. दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता सोनपेठ शहरातील प्रमुख मार्गाने सकल मराठा समाज बांधव स्वयंसेवकांची फेरी द्वारे सर्वांना सहकुटुंब सहपरिवार सभेसाठी उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले आहे. सोनपेठ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी सोनपेठ शहर भगवेमय व डिजिटल करून टाकले आहे, भगव्या पताकांनी लोकांचे लक्ष वेधले असून डिजिटल वर केवळ मनोज जरांगे पाटील शिवाय दुसरा कोणीही दिसून येत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर हलगी यांनी दोन ॲम्बुलन्स डॉक्टर व सिस्टर सहित प्राथमिक औषधोपचारासह सज्ज ठेवल्या आहेत.

Monday, December 18, 2023

सोनपेठ गणेश जिनिंग मैदानावर 22 डिसेंबरच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जोरदार तयारी....

सोनपेठ गणेश जिनिंग मैदानावर 22 डिसेंबरच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जोरदार तयारी....



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथे मराठा समाजा चा आरक्षण मुद्दा राज्यभर पेटला असताना संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या पाचव्या टप्प्यातील सोनपेठ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या प्रयत्नांना सभा मिळविण्यात यश मिळाले आहे सोनपेठ येथे 22 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन परळी रोड लगत असलेल्या गणेश जिनिंग मैदानावर करण्यात आलेले आहे या सभेसाठी सोनपेठ परळी माजलगाव पाथरी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला आपली उपस्थिती लावणार आहे.सभेसाठीच्या मैदानाची अवघ्या काही दिवसात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मराठा समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेऊन सभा स्थळ स्वच्छ तयार करून घेतलेले आहे. सभेसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांची नाश्ता, पाणी , वाहनतळ व्यवस्था वेगवेगळ्या 5 ठिकाणी केलेली आहे.सभेसाठी सकल मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने, शिस्तीत, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने, महिला भगिनीं ना सोबत आणून उपस्थित राहून तालुक्याची शान वाढवावी असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा सोनपेठ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

श्री बजरंगबली वेताळ मंदिरात 25 डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन ;भाविकांनी धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे-प.पू.श्री विलासानंदजी महाराज

श्री बजरंगबली वेताळ मंदिरात 25 डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन ;भाविकांनी धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे-प.पू.श्री विलासानंदजी महाराज


परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन) :- 

श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ येथे श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे सोमवार दि.25 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.शहरातील ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त  दि.25 डिसेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.18 डिसेंबरपासून श्री दत्त पारायणास उत्साहात सुरुवात झाली असून 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. महाआरती होणार असून यानंतर दुपारी 1 ते 5 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिर च्य वतीने संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.

Thursday, December 7, 2023

सर्व शिवाचार्यांनी विरशैव सर्व पोट जातीच्या लिंगायत समाजाला शिवदिक्षा द्यावी - प्रा.मनोहरजी धोंडे सर धोंडे सरांना "विरशैव धर्मरक्षक विर" तर "सोनपेठ भुषण" पुरस्काराचे वितरण

सर्व शिवाचार्यांनी विरशैव सर्व पोट जातीच्या लिंगायत समाजाला शिवदिक्षा द्यावी - प्रा.मनोहरजी धोंडे सर 
धोंडे सरांना "विरशैव धर्मरक्षक विर" तर "सोनपेठ भुषण" पुरस्काराचे वितरण 

सोनपेठ (दर्शन) :- 

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्री गुरु नंदिकेश्वर शिवयोगी महाराज सोनपेठकर यांच्या पुण्यतिथी महोत्सव व चरपट्टाधिकारी श्री.ष.ब्र.108 श्री गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज यांच्या 23 व्या पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त आयोजित दिनांक 10 डिसेंबर 2023 रविवार रोजी "राज्यस्तरीय वीरशैव रत्न" पुरस्कार - 2023 तसेच 2 "विषेश सन्मान 2023" सोनपेठ ची कु.रेणुका प्रकाश शास्त्री शास्त्रज्ञ म्हणून तर डिघोळ च्या सौ.कावेरी दशरथ जाधव (शिंदे) कर निरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल विषेश गौरव उपस्थित सर्व गुरुवर्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते येथोचित सन्मान करण्यात आला.समारोप दिनांक 12 डिसेंबर 2023 मंगळवार रोजी प्रमुख पाहुणे प्रा.मनोहरजी धोंडे सर, उमाकांत शेटे, धन्यकुमार शिवणकर, रामेश्वर कुबडे, माधव सोनटक्के, महादेव खेडेकर, सुभाषआप्पा नित्रुडकर आदिंच्या प्रमुख उपस्थितत तसेच गुरुवर्य श्री 108 ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, गुरूवर्य श्री 108 ष.ब्र.डॉ.शिवयोगी शिवाचार्य महाराज म्हैशाळकर, गुरूवर्य श्री 108 ष.ब्र.शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाईकर, गुरूवर्य श्री 108 ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसुरकर, गुरुवर्य श्री 108 ष.ब्र.अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुरकर, गुरुवर्य श्री 108 ष.ब्र.निळकंठ शिवाचार्य महाराज मैंदर्गीकर यांच्या हस्ते मा.प्रा.मनोहरजी धोंडे सर यांना 'वीरशैव धर्मरक्षक विर' पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे व सर्व गुरुवर्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते "सोनपेठ भूषण 2023" पुरस्कार श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सोनपेठ, श्री व सौ.प्रदिप गायकवाड, विश्वंभर गोरवे यांच्यासह संपादक किरण रमेश स्वामी यांना भारतातील पहिले पत्रकार मित्र संघटन ऑल जर्नालिस्ट ॲड फ्रेंडस् सर्कल यांच्या वतीने "राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 2023" जाहीर झाल्याबद्दल "विषेश सन्मान 2023" वितरण सोहळा संपन्न झाला सर्व पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ , पुष्पहार, मेहसुरी फेटा व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला, याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मा.प्रा.मनोहर धोंडे सरांनी बोलताना सर्व शिवाचार्यांनी विरशैव सर्व पोट जातीच्या लिंगायत समाजाला शिवदिक्षा द्यावी हि महत्वाची सुचना करून पुढे कधीही आमंत्रित करा उपस्थित राहिल, आजही चार दौरे रद्द करुन येथे आलोय, सर्व शिवाचार्य महाराज यांच्या वतीने गुरूवर्य. श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसुरकर यांनी आशिर्वचन दिले तर आभार गुरुवर्य श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी मानले या कार्यक्रमाचे अप्रतिम असे सूत्रसंचालन प्रा.महालिंग मेहत्रे यांनी केले.या कार्यक्रमासाठी परिश्रम विनोद चिमनगुंडे, उमाकांत मेहत्रे, नागनाथ कोटुळे, एन.व्हि.स्वामी, ओमप्रकाश स्वामी, नागेश स्वामी, रतीकांत स्वामी सह सर्व श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज विचार मंच सोनपेठ सदस्यांनी घेतले.

Monday, December 4, 2023

वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण व विशेष कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन

वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण व विशेष कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन 


परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

अथक परिश्रमाने प्रतिकूल परिस्थितीत कर्तबगारी सिध्द केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याकरीता दरवर्षी दिल्या जाणार्‍या माजी आमदार वै. उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ विटा (खु.) येथील श्री. चिंतामणी कृषी तंत्र विद्यालयात (ता.सोनपेठ) मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
             सामान्य घरातल्या वै. उत्तमराव विटेकर यांनी संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक केला. सर्वसामान्य लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून ते सुपरिचित होते. या जिल्ह्यातील राजकारणाला विटेकर यांनीच समाजकारणाची जोड दिली. म्हणून ते सामान्यांना आपले आमदार नव्हे तर पाठीराखे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींचे स्मरण व्हावे म्हणून कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात येतो आहे.यंदाचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून हभप भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे रसाळपूर्ण कीर्तन सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
             मधल्या काळात कोरोनामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र, त्याही वर्षीचे पुरस्कार यंदा वितरीत केले जाणार आहेत. त्या माध्यमातून वडीलांची शिकवण आणि संस्कार जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिलासाशी बोलतांना व्यक्त केले.
       दरम्यान २०२१ चे पुरस्कार मानकरी पंजाबराव डक, हभप भगवान महाराज इसादकर, जनार्धन आवरगंड, शिवाजीराव गयाळ, हभप पंढरीनाथ कदम, २०२२ चे मानकरी कृष्णा भोसले, पंडीतराव थोरात, हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप तुकाराम महाराज यादव, हभप भारत महाराज कानसूरकर, २०२३ चे मानकरी हभप नरहरी महाराज निश्‍चळ, वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, हभप साहेबराव महाराज कोठाळकर दादा, प्रतापराव काळे आणि मेघाताई देशमुख यांचा पुरस्कारार्थी मध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी आपण सर्व हिच निमंत्रण पत्रिका समजून तमाम नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह नारायण भोसले विटेकर, मदनराव भोसले विटेकर, भागवतराव भोसले विटेकर, आबासाहेब भोसले विटेकर आणि अ‍ॅड. श्रीकांत भोसले विटेकर यांनी केले आहे.

Saturday, December 2, 2023

गोदकाठच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहावे - सचिन रणखांबे

गोदकाठच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहावे - सचिन रणखांबे


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गांवात गेली ७५ वर्षा पासून  लोकांना बस सेवा सुरू नाही मागील काही दिवसांमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला होता त्यामध्ये गावा गावात बस सेवा पाठवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी येथील शासन आपल्या दारी उपक्रमात प्रशासनाने बस गावोगावी पाठवल्या होत्या त्यांच प्रमाणे वंचित बहुजन आघाडी सोनपेठ तालुक्यांच्या वतीने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात यावी व विविध मागण्यां जनत पर्यंत पोहोचवल्या जाव्यात  त्यामध्ये तालुक्यातील नागरिकांना शिधापत्रिका देण्यात याव्यात, महात्मा फुले आरोग्य कार्ड, प्रत्येकाला उपलब्ध करून द्या ,सगल दोन तीन दिवसांनी अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, सोनपेठहुन ते गंगापिंपरी पर्यंत तात्काळ बससेवा सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी सचिन सर रणखाबें यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि 4/12/2023 , सोमवार रोजी 12.30 वाजता रास्ता रोको आंदोलन या आंदोलनासाठी सोनपेठ तालुक्यातील सर्व जनतेने जास्तीत जास्त बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी सोनपेठ तालुका अध्यक्ष सचिन सर रणखाबें यांनी केले.

Saturday, November 25, 2023

परळीत 7 जानेवारीला होणार राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजाचा वधू - वर परिचय मेळावा

परळीत 7 जानेवारीला होणार राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजाचा वधू - वर परिचय मेळावा



परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्याचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधु वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री महादेवआप्पा इटके यांची निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून, शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे  व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.याच अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताआप्पा ईटके गुरुजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वीरशैव विकास प्रतिष्ठान अध्यक्ष श्यामभाऊ बुद्रे, सचिव फुलारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत,यावर्षीही 7 जानेवारी 2024 रविवारी सकाळी 10 वाजता गुरूलिंग स्वामी मंदिरात मेळावा संपन्न होणार असून त्यासाठी वीरशैव वधू वर पालक मेळावा कार्यकारिणी घोशीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष तथा वीरशैव सामुदायिक विवाह अध्यक्ष महादेव ईटके यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष शिवकुमार चौंडे, सचिन स्वामी, सौ उज्वला आलदे, गजानन हालगे तर सचिव म्हणून चंद्रकांत उदगीरकर, सहसचिव प्रकाश खोत, उमाकांत पोपडे, सौ कोमल बेलुरे, कोषाध्यक्ष सुशील हरंगुळे, सह कोषाध्यक्ष सतिश रेवडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी नागेश हालगे, शिवकुमार केदारी, विकास हालगे , योगेश मेनकुदळे, संजय स्वामी मठपती, महेश निर्मळेसर , नरेश साखरे सर ,दत्ता गोपनपाळे, सोमनाथ गोपनपाळे सर, यांच्या सह ईतर समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. राज्यस्तरीय वीरशैव वधू वर पालक परिचय मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करणार असल्याचे सविस्तर कार्यकारणी व विविध समित्या लवकरात मिटिंग घेऊन जाहीर करण्यात संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्यास तमाम विरशैव लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
______________________________


संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन सोनपेठ तालुक्यातील एकमेव वृत्तपत्र बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा मो.9823547752.
______________________________

Friday, November 24, 2023

कार्तिक पोर्णिमा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार यात्रे करिता बीड एस.टी विभागाद्वारे ७५ बसेस चे नियोजन'

'कार्तिक पोर्णिमा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार यात्रे करिता बीड एस.टी विभागाद्वारे ७५ बसेस चे नियोजन'


बिड / परळी / सोनपेठ (दर्शन) :-

कार्तिक पौर्णिमा निमित्त कपिलधार यात्रेकरिता बिड एसटी विभागाने 75 बस फेरीचे नियोजन केले असल्याची माहिती संतोष नागनाथ महाजन आगार प्रमुख परळी वैजनाथ यांनी दिली.
दि. २५ नोव्हेबर ते २७ नोव्हेबर या कालावधीत कार्तिक पोर्णिमा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार ता. जि. बीड येथे यात्रा भरणार आहे. त्या अनुषंगाने मोठया प्रमाणात भावीक भक्त महाराष्ट्रातील विविध जिल्हयातुन तसेच इंतर राज्यातुन श्री क्षेत्र कपीलधार येथे असतात. त्या करीता बीड विभागाद्वारे ७५ बसेसचे आगार निहाय नियोजन खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे.
बिड 10, परळी 18धारूर 10, माजलगाव 07, गेवराई 07, पाटोदा 07, आष्टी 07, अंबाजोगाई 11 अशा एकुण 75 वरील प्रमाणे 75 बसेस कपीलधार, मांजरसुंबा ते अंबाजोगाई-परळी, लातुर, अहमदपुर या मार्गावर धावणार असुन प्रवाशांनी / भावीकांनी रा.प. बसने प्रवास करावा.असे आवाहन संतोष नागनाथ महाजन आगार प्रमुख परळी वैजनाथ यांनी केले आहे.

Wednesday, November 22, 2023

श्रीक्षेत्र महाविष्णू यात्रा महोत्सव निमित्त राज्यस्तरीय मॅटवरील निमंत्रित भव्य महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन

श्रीक्षेत्र महाविष्णू यात्रा महोत्सव निमित्त राज्यस्तरीय मॅटवरील निमंत्रित भव्य महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व महाविष्णू यात्रा कमिटी शेळगाव व आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित राज्यस्तरीय मॅटवरील निमंत्रित भव्य महिला कबड्डी स्पर्धा प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री महाविष्णू यात्रा महोत्सव शेळगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 21/11/2023 मंगळवार पासून सुरुवात झाली आहे दिनांक 26/11/2023 सोमवार पर्यंत श्री ची महापूजा आरती तसेच 9 ते 11 हरीकिर्तन व भजनाचा कार्यक्रम होईल, दिनांक 25/11/2023 शनिवार रोजी 12 वाजता हरिहर दर्शन व विष्णू चरणी बेलफुल वाहणे, कार्तिक वैद्य प्रतिपदा दिनांक 27/11/2023 सोमवार रोजी श्रींची पालखी मिरवणूक व गवळण बरुडाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रा महोत्सवात सहभागी होऊन या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा त्याच प्रमाणे श्रींच्या उत्सवात राज्यस्तरीय मॅटवरील निमंत्रित महिला कबड्डी सामन्याचे आयोजन केले आहे.उद्घाटन समारंभ 26 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी दुपारी 12 वाजता प्रमुख उपस्थिती मा.रागसुधा आर.पोलीस अधीक्षक परभणी, मा.डॉ.दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड, मा.सुनील कावरखे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सोनपेठ, मा.सुनील अंधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनपेठ आदिंच्या प्रमुख उपस्थितीत भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे तसेच दिनांक 27 नोव्हेंबर 2023 सोमवार रोजी अंतिम सामना झाल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. उपरोक्त सर्व कार्यक्रमासह राज्यस्तरीय मॅटवरील निमंत्रित भव्य महिला कबड्डी स्पर्धेचा आनंद पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाविष्णू यात्रा कमिटी शेळगाव अध्यक्ष रामेश्वर आळसे, उपाध्यक्ष नागनाथ गड्डीमे, कोषाध्यक्ष भास्कर क्षीरसागर, कोषाध्यक्ष तुराब पठाण, कोषाध्यक्ष नारायण आळसे, सचिव सागर काळे, सहसचिव दशरथ राठोड आदीसह सर्व ग्रामस्थ शेळगाव यांनी केले आहे.

Saturday, November 18, 2023

सोनपेठ नांदेड बसला प्रतिसाद द्यावा - सतप्रीतसिंग शाहू

सोनपेठ नांदेड बसला प्रतिसाद द्यावा - सतप्रीतसिंग शाहू 


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतप्रीतसिंग शाहू यांच्या प्रयत्नातून दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सोनपेठ नांदेड बस सेवा गंगाखेड आगारातून सुरू करण्यात आलेली आहे, सतप्रीतसिंग शाहू यांनी परभणी विभागीय नियंत्रण तसेच गंगाखेड आगार प्रमुख यांच्याशी सतत संपर्कात राहून सोनपेठ नांदेड बस सेवा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पाठपुरावा केलेला आहे, यांच्या पाठपुराव्याला दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुर्त स्वरूप येऊन अखेर गंगाखेड आगाराची सोनपेठ नांदेड बस सेवा सुरू करण्यात आली सोनपेठ येथून ही बस दुपारी 3.30 वाजता निघून गंगाखेड पालम लोहा मार्गे नांदेड मुक्कामी तर सकाळी 7 वाजता नांदेड येथून परत लोहा पालम गंगाखेड मार्गे सोनपेठ चालणार आहे तरी प्रवासी बांधवांनी या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त फायदा घेतल्यास या बस सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात येतील व आपणासाठी सकाळ दुपार व संध्याकाळ अशा तीन फेऱ्या सुरू करण्यात येतील अशी ग्वाही परभणी विभागीय नियंत्रण तसेच गंगाखेड आगार प्रमुख यांनी दिलेली आहे तरी प्रवासी बांधवांना शहीद भगतसिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सतप्रीतसिंग शाहू यांनी आवाहन केलेले आहे की नांदेड सोनपेठ बस सेवेला प्रतिसाद द्यावा.

Sunday, October 29, 2023

अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीला घातले साकडे

अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीला घातले साकडे 


पंढरपूर / परभणी / सोनपेठ (दर्शन):-

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश दे असे साकडे महाराष्ट्रातील कीर्तनकार ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी शनिवारी (दि. 28) पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून घातले. 
आज महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या त्यांच्या मागणीसाठी बऱ्याच मराठा बांधवांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं आहे. सर्व मराठा बांधवांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये आपण एकोप्यानं आरक्षण घेण्यासाठी रस्त्यावर उतरु असे  ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी सांगितले आहे.
त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सदाशिव ढोणे पाटील, भागवत शिंदे हे उपस्थित होते.

सोनपेठ तालुक्यातील दुधगाव वाणीसंगम येथे अनोखे आंदोलन बस वरील नेत्यांच्या फोटो ला डांबर फासुन निषेध

सोनपेठ तालुक्यातील दुधगाव वाणीसंगम येथे अनोखे आंदोलन बस वरील नेत्यांच्या फोटो ला डांबर फासुन निषेध 




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे दुधगाव वाणिसंगम येथे मराठा समाजाने आदर्श ऊपक्रम राबवला आहे.सर्व ठिकानी बस महामंडळाच्या गाड्याची जाळपोळ मोडतोड चालत असतांनी पण दुधगाव वानिसंगमकर या गावकर्यानी बस महामंडळाची गाडी आडऊन निषेध व्यक्त केला आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या गाडिवरील फोटोला डांबर फासुन निषेध व्यक्त केला आणि गाडी आहे त्या स्थितीत व्यवस्थित सोडुन देण्यात आली.मानलराव दुधगाव वाणिसंगम करांना निषेध व्यक्त करावा तर असा गाड्यांचे नुकसान करुन काहिच फायदा नाही ती आपलीच मालमत्ता आहे ज्यांनी आपल्याला हे करायला भाग पाडले त्यांचाच निषेध करावा हे यांच्या कडुन शिकायला पाहिजे.

Saturday, October 28, 2023

दुष्काळ जाहीर करण्यास त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे वेळ लागणार ! - वसंत मुंडे

दुष्काळ जाहीर करण्यास त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे वेळ लागणार ! - वसंत मुंडे 


परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसात खंड पडल्यामुळे गाव पातळीपासून शहरापर्यंत पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार असला तरी त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे शासकीय उपाययोजना करण्यासाठी शासन अपयशी ठरणार असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. त्रिमूर्ती सरकारकडून राज्यातील विभाग ,जिल्हा, तालुका निहाय सर्व स्तरावर गांभीर्याने अभ्यास समिती कडून उपाययोजना करण्यासंदर्भात चौकशी अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु शासनाकडून दुष्काळजन्य परिस्थिती संदर्भात हालचाली झालेल्या दिसत नाहीत, त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न राज्यात उपस्थित होणार आहेत. त्यापैकी पाणीटंचाई, जनावराचा चारा छावण्या, अन्नधान्य, भाजीपाला, दुधाची टंचाई, रोजगार हमीची कामे,शैक्षणिक सवलती, शासकीय योजनेचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. नैसर्गिक संकट हाताळण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. तरीही त्रिमूर्ती शासनाकडून कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. राज्यातील १६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यांपैकी १९४ तालुक्यात ६० टक्के कमी पाऊस झालेला आहे अशी शासकीय नोंद असून मराठवाडा, विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरात वरील समस्या दुष्काळा संदर्भात उपस्थित होणार आहेत ,मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश या ही परिसरात कमी पावसामुळे शेतकरी हातबल झालेला आहे. राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती व कारखानदार , अनधिकृतपणे पाणी चोरून उपसा करणारा वर्गामुळे पाणीटंचाई हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून शासनाकडून पाणी आरक्षित ठेवण्यासंदर्भात महसूल विभाग व पाटबंधारे विभागाने पथके नेमून कारवाई करण्याचे आदेश तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

Friday, October 27, 2023

रोटरी सॅटॅलाइट क्लब ऑफ सोनपेठ सिटी पदग्रहण सोहळा ; गणेशोत्सव,गुरुगौरव व गुणगौरव पुरस्काराचे वितरण

रोटरी सॅटॅलाइट क्लब ऑफ सोनपेठ सिटी पदग्रहण सोहळा ; गणेशोत्सव,गुरुगौरव व गुणगौरव पुरस्काराचे वितरण


नुतन अध्यक्ष रो.घनशामदासजी झंवर.


नुतन सचिव रो.प्रमोद गावरस्कर.

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील रोटरी सॅटॅलाइट क्लब ऑफ सोनपेठ सिटी डिस्ट्रिक्ट-3132 वर्ष 2023-2024 नूतन अध्यक्ष रो.घनश्यामदासजी झंवर व नूतन सचिव रो.प्रमोद गावरस्कर यांचा पदग्रहण सोहळा तसेच गणेशोत्सव, गुरुगौरव व गुणगौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा दिनांक 31 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजी दुपारी ठीक 2 वाजता श्री बालाजी मंदिर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.सुधीर लातूरे प्रांतपाल 2025-2026, प्रमुख उपस्थिती रो.गणेश वाघ सहाय्यक प्रांतपाल 2023-24, रो.स्वप्निल परदेशी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी 2023-2024,रो.गणेश राऊत सचिव रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी 2023-24,आदि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तरी या मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी गुणगौरव पुरस्काराचे मानकरी उद्योजक पुरस्कार बळीराम गोपीनाथ पवार चेअरमन पवार ॲग्रोटेक, सेंद्रिय शेती पुरस्कार मोहनराव अण्णासाहेब देशमुख व धनंजय सुधाकरराव कुलकर्णी (डि.एस.कुलकर्णी), नाविन्यपूर्ण शेती प्रयोग पुरस्कार भगवान नामदेव मोहिते, गुरुगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती कुमठेकर मीनाक्षी अशोकराव प्राथमिक शाळा सोनपेठ, प्रकाश रावसाहेब राठोड मुख्याध्यापक यशोधरा आश्रम शाळा सोनपेठ,आरती शिवाजीराव बोबडे कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ, प्रा.डॉ.विकास दत्तराव रागोले के.र.व.वरिष्ठ महाविद्यालय सोनपेठ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी. साठी निवड झालेले डॉ.सौरभ संतोषआप्पा निर्मळे व डॉ.कृतिका कालिदास कुलकर्णी यांच्यासह गणेशोत्सवात प्रथम सोमेश्वर गणेश मंडळ सोनपेठ, द्वितीय मोरया गणेश मंडळ शारदानगर सोनपेठ तर तृतीय मोरया गणेश मंडळ गरुड चौक सोनपेठ तसेच उत्तेजनार्थ जगदंबा प्रासादिक गणेश मंडळ देवी मंदिर सोनपेठ व अष्टविनायक प्रतिष्ठान गणेश मंडळ सोनपेठ आदींना सन्मानित करण्यात येणार आहे तरी निमंत्रितांसाठी आयोजित या भव्यदिव्य कार्यक्रमात वेळेच्या आधी 15 मिनिटे उपस्थित राहुन आसन ग्रहण करावे अशी विनंती रोटरी सॅटॅलाइट क्लब ऑफ सोनपेठ सिटी माजी अध्यक्ष रो.लिंबाजी कागदे व माजी सचिव रो.संतोष रणखांब तसेच सर्व सन्माननीय रोटरीयन सदस्य बांधवांनी केली आहे.

Thursday, October 19, 2023

ट्वेन्टीवन शुगर्स लि.युनिट 2 कारखान्याच्या वतीने आडसाली,पुर्व तसेच सुरु हंगामी ऊस लागवड आणि खोडावा व्यवस्थापनाबाबत परिसंवाद

ट्वेन्टीवन शुगर्स लि.युनिट 2 कारखान्याच्या वतीने आडसाली,पुर्व तसेच सुरु हंगामी ऊस लागवड आणि खोडावा व्यवस्थापनाबाबत परिसंवाद


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल होण्यास मदत होणारा ट्वेन्टीवन साखर कारखाना 2020 पासून चालू झालेला आहे.माजी मंत्री मा.आ.अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती चालू आहे.
ट्वेन्टीवन साखर कारखन्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरीता पद्मिनी मंगल कार्यालय,पाथरी रोड, सोनपेठ येथे दि. 21 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजी आडसाली, पुर्व तसेच सुरु हंगामी ऊस लागवड आणि खोडावा व्यवस्थापनाबाबत परिसंवाद आयोजित केलेला आहे.या परिसंवादात श्री.सुरेश बी.माने पाटील शास्त्रज्ञ व्ही. एस.आय.पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.श्री.सुरेश माने पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे चे माजी शास्त्रज्ञ आहेत.सुरेश माने पाटील यांनी या विषयावर हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हा.चेअरमन श्री.विजयराव देशमुख यांनी केले आहे.सोबत सभेची निमंत्रण पत्रिका दिलेली आहे.या परिसंवादाचा जास्तीत जास्त उस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच इतर उस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती देऊन उपस्थित रहावे अशी विनंती स्वप्नील कुंभार ऊस विकास अधिकारी, तुकाराम गडदे मुख्य शेतकी अधिकारी,सुभाष पाटील कार्यकारी संचालक, अजित देशमुख पि.आर.वो.आदींनी केली आहे.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन मो.9823547752...…

Tuesday, October 17, 2023

मराठी वाङ्मय मंडळ भाषा समृद्ध करते - प्रो. डॉ.एम.बी धोंडगे

मराठी वाङ्मय मंडळ भाषा समृद्ध करते - प्रो.डॉ.एम.बी.धोंडगे
लातुर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर व श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा सामंजस्य करारांतर्गत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ.एम.बी.धोंडगे हे होते. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे होते.याप्रसंगी बोलताना प्रोफेसर मुंजा धोंडगे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनापासून मराठी साहित्यातील विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे कारण एक पुस्तक हे शंभर मित्राप्रमाणे असते. मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होते.असे मत व्यक्त केले.
        लातूर येथे राजश्री शाहू महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली.या ग्रंथ प्रदर्शनाचे व वाङ्मय यउद्घाटन प्रो.डॉ. एम.बी.धोंडगे( मराठी विभाग प्रमुख तथा आधिसभा सदस्य डॉ. बाबासाहेब विद्यापीठात विद्यापीठ औरंगाबाद) यावेळी शब्दवेध या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी भारताचे राष्ट्रपती ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला.कलाम यांचे कार्य  आजच्या युवकासाठी प्रेरणादायी असून त्यांची संपत्ती म्हणजे फक्त दोन सुटकेस एवढीच होती असे मत व्यक्त करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी  ग्रंथालय 24 तास उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी वाचनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री शाहू महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.संभाजी पाटील यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद करून महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी कवी स्वप्नाली भराटे, वैष्णवी खलसे, रीजा पटेल,मंथन सूर्यवंशी, प्रतीक्षा माने, दीक्षा जावळे,श्रावणी नागटिळक इ. विद्यार्थ्यांनी विविध कविता सादर केल्या.यावेळी व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ.सतीश शिंदे मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कु.विशाखा सोमवंशी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी यादव हिने केले.तर आभार प्रदर्शन डॉ.विजयकुमार करंजकर यांनी मांडले ऑनलाईन कार्यक्रमास पंडित गुरु पारडीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील, डॉ.आर. एम.अहिरे व पारडीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.संभाजी पाटील,डॉ गोविंद उफाडे, प्रा.बापूसाहेब जवळेकर डॉ.शिवराज काचे प्रा.भीम यादव डॉ.तुकाराम देवकर यांनी केले. यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर पंडितगुरु पारडीकर महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

Friday, October 13, 2023

सोनपेठ नगर परिषद विरोधात कंत्राटी कामगार बेमुदत उपोषणाला जिल्हाधिकारी कचेरीवर बसले

सोनपेठ नगर परिषद विरोधात कंत्राटी कामगार बेमुदत उपोषणाला जिल्हाधिकारी कचेरीवर बसले

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कंत्राटी कामगारांचे सुमारे 5 महिन्या पासुनचे वेतन थकीत आहे. यामुळे कामगारावर आर्थिक संकट ओढवले असुन उपासमारीची वेळ आली आहे.याप्रकरणा बद्दल कामगारांनी रीतसर परभणी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे दाद मागितली यासंदर्भात आयोजित सुनावणीत स्पष्ट झाले कि कंत्राटदार हे कोणतीही जबाबदार घेण्यास तयार नसताना कंत्राटदाराच्या  खात्यावर वेतनाची रक्कम पाठवण्यात आली आणि त्याने सदर रक्कम प्रशासनास परत केली आहे.तर एका कंत्राटदाराने 2 महिन्याचे वेतन दिलेलेच नाही, सोनपेठ नगर परिषद प्रशासनातील या प्रकारच्या अनागोंदीमुळे कामगारांना वेतन दिले जात नाही याबद्दल परभणी सरकारी कामगार अधिकारी यांनी कायदेशीर बाबी आणि तरतुदी स्पष्ट केल्यानंतर तात्काळ वेतन अदा करण्यास सुचविल्यानंतर देखील मुख्याधिकारी यांनी कोणतीही पूर्तता केली नाही नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांत असंतोष निर्माण झाला आहे, आपल्या खालील मागण्याबद्दल दाद मागण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी पासून परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.1) सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणारा पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांचे सुमारे 5 महिन्यापासूनचे थकीत येतन तत्काळ अदा करा.2) सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांना किमान २ वर्षापासूनची किमान वेतनाची फरक बिले, प्रा फंड, ईएसआय ई कायदेशीर तरतुदींचा लाभ द्यावा.3) सोनपेठ नगर पालिका मधील कंत्राटी व रोजदारी तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करा सर्व क्षेत्रामध्ये तासाच्या कामासाठी दरमहा रुपये 25000 किमान वेतन निश्चित करा, सोनपेठ नगर परिषदामधील सफाई कामगारांना श्रम साफल्य योजने अंतर्गत घरासाठी जागा प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, तसेच घरकूल बांधकामासाठी अनुदान यावे.4) म.न.पा.व न.प. मध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा.5) सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केल्यानुसार किमान वेतन अदा करण्याचे आदेश संबंधितांना द्या स्त्री व पुरुषांना समान वेतन या.तसेच आजतागायत पर्यतचे किमान वेतनाचे एरिअर्स अदा करा.सफाई कामगारांना कायम तसेच कंत्राटी गमबूट, गणवेश, स्वच्छतेचे साहित्य, चपला उपलब्ध करा.आदि मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे, या निवेदनावर कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड देविदास खरात, सोनपेठ नगर परिषद कंत्राटी पाणीपुरवठा व सफाई कर्मचारी विकी रंजवे, बाळू गरुड, नरेंद्र मुंढे, कांता रंजवे, परमेश्वर साळुंके, किशन गोड, सुनील गाडे, रहीम शेख, बाबा शेख, मोसीन शेख, नेहाल अंन्सारी, अभिजीत धबडे व सिकंदर शेख आदींच्या स्वाक्षरी असून आदिजन परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषणाला बसलेले असून यांच्या या उपोषणाला महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा शेख सलमान, शेख छोटन, साबिर शेख व फिरोज शेख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पत्राद्वारे दिलेला आहे, याप्रकरणी तमाम सोनपेठकरांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.

Sunday, October 8, 2023

टपाल सप्ताह निमित्त टपाल योजनेच्या मेळाव्याचे आयोजन, सर्व जनतेनी लाभ घ्यावा

टपाल सप्ताह निमित्त टपाल योजनेच्या मेळाव्याचे आयोजन, सर्व जनतेनी लाभ घ्यावा

सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ डाक घर आयोजित टपाल सप्ताह निमित्त टपाल योजनेच्या मेळाव्याचे आयोजन दि.10 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजी नगर परिषद सोनपेठ यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे दुपारी 11 वाजता परभणी डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रमुख अतिथी तहसीलदार सुनील कावरखे,गट विकास अधिकारी मधुकरराव कदम, वैद्यकीय अधीक्षक सिध्देश्वर हालगे, मुख्याधिकारी कोमल सावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या टपाल योजनेच्या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, टपाल कार्यालय मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे, तसेच नागरीकांना व महिला विद्यार्थ्यांनाही पोस्ट ऑनलाईन बँकिंग सेवा माहिती, खाते उघडणे, सुकन्या योजना माहिती, महीला सन्मान योजना माहिती व विविध आकर्षक ठेव महिला, वयोवृद्ध व्यक्तींच्या नावे ठेव माहिती आणि आधार कॅपचे आयोजन करण्यात येणार आहे तरी सोनपेठ शहरातील व तालुक्यातील तमाम जनतेला मा.यु.व्हि.कुलकर्णी साहेब सहाय्यक डाक अधिक्षक परभणी उपविभाग यांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त संख्येने महिला, पुरुष व नोकरदार, कर्मचारी, शेतकरी व व्यापारी बांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी.

Saturday, September 30, 2023

सोनपेठ शहरात श्री सोमेश्वर गणेश मंडळ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक तृतीय

सोनपेठ शहरात श्री सोमेश्वर गणेश मंडळ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक तृतीय

श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ  (प्रथम)
श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ (द्वितीय).
श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक सोनपेठ (तृतीय).


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील सर्व परवाना धारक श्री गणेश मंडळ स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणूक पर्यंत विविध निकषाद्वारे प्रथमच सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या माध्यमातून निवड समितीतील रोटरीयन इंजि.चंद्रकांत लोमटे, नागनाथ सातभाई, संजय आढे, लिंबाजी कागदे व रामेश्वर कदम आदिंच्या मार्गदर्शनात परीक्षणानुसार श्री सोमेश्वर गणेश मंडळ श्री सोमेश्वर नगर दहिखेड सोनपेठ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक सोनपेठ तृतीय असे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत,प्रथमच सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या माध्यमातून शहरातील सर्व परवाना धारक श्री गणेश मंडळ सोनपेठ प्रत्येकाला भेट देऊन तसेच विसर्जन मिरवणूक पाहुण हे पुरस्कार जाहीर केले आहेत, लवकरात लवकर या श्री सोमेश्वर गणेश मंडळ पदाधिकारी, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर पदाधिकारी तसेच श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक पदाधिकारी यांना निमंत्रित करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, पुरस्कार स्वरुपात सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या वतीने आकर्षक प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या शहरातील श्री सोमेश्वर गणेश मंडळ पदाधिकारी, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर पदाधिकारी तसेच श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक पदाधिकारी यासर्वांचे सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी अध्यक्ष, सचिव व सर्व रोटरीयन बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शहरातुन सर्व स्तरातून तिन्ही श्री गणेश मंडळांचे अभिनंदन होताना दिसत आहे.

Friday, September 29, 2023

स्वच्छतेसह श्रमदान’ उपक्रम रविवारी नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

‘स्वच्छतेसह श्रमदान’ उपक्रम रविवारी नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून, रविवार, (दि. १) रोजी सकाळी १० वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  केले आहे.
देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे.  स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले आहे.  

Wednesday, September 20, 2023

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच! सोनपेठ शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित कदम घराण्यातील दुसऱ्या पिढीतील उभारतं व्यक्तिमत्व म्हणजे श्री परमेश्वर राजभाऊ कदम! माजी आमदार मा. व्यंकटराव कदम साहेब, सोनपेठ न.प.चे माजी उप-नगराध्यक्ष मा.दत्तराव कदम काका या दोन जेष्ठ कदम घराण्यातील धुरीणांच्या मार्गदर्शनात आणि वडील, माजी नगरसेवक कै.राजाभाऊ कदम साहेबांचा वारसा लाभलेले श्री परमेश्वर कदम यांनी मागील 15 वर्षात आपल्या संस्थेच्या अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे! विशेषत: वरिष्ठ महाविद्यालयाने NAAC यशस्वीपणे सामोरे जाऊन B दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणपत्र मिळवण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे!  श्री परमेश्वर कदम साहेबांनी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा हाती घेतल्यापासून संस्थेने कात टाकली असून संस्थेने KG ते PG अशी यशस्वी, दैदिप्यमान वाटचाल केली असून या संस्थेअंतर्गत जवळपास तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आजघडीला ज्ञानार्जन करत आहेत आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचारी अध्ययन-अध्यापन करत आहेत! अत्यंत कमी वयात खांद्यावर पडलेले संस्थेचे हे शिवधनुष्य श्री परमेश्वर कदम यांनी लीलया पेलले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय दमदारपणे वाटचाल करत आहे याचा मनस्वी अभिमान वाटतो! स्व.राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या रोपट्याला योग्य सिंचन करून या संस्थेचे छान संगोपन त्यांच्याकडून होत आहे! या संस्थेच्या माध्यमातून सोनपेठ सारख्या दुर्गम, शिक्षणापासून वंचित भागात खेड्यापाड्यात,  वाडी-तांड्यावर विशेषतः मुलींसाठी उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर जाऊन पोहोचली आहे, त्याद्वारे *ज्ञानात धर्म तत् सुखम* हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरते आहे ! संस्थेच्या खांद्याला खांदा लावून वरिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ, उच्च-विद्याभूषित, अनुभवी प्राचार्य-प्राध्यापक मंडळींच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळेतील शिक्षक इथे एकनिष्ठ भावनेने काम करत असून या सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन श्री कदम साहेब हे सर्वांना सोबत घेऊन संस्थेची ही नाव मोठ्या सन्मानाने पुढे नेत आहेत! याचाच परिपाक म्हणजे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी NET/SET/PhD सारख्या परीक्षा/पदव्या संपादन करत असून अनेक विद्यार्थी प्राचार्य-प्राध्यापक-शिक्षक-CA-बँकेत अधिकारी आदी सन्मानीय पदावर रुजू झाले आहेत! मागील काही वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी NEET/JEE/MH-CET आणि इतर परीक्षेच्या माध्यमातून MBBS/BAMS/BHMS/Pharmacy/Engineering सारख्या सन्मानाच्या कोर्सेसला प्रवेश नोंदवून संस्थेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे खोवले आहेत! नक्कीच ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे! तेंव्हा, आज मा.अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व शिक्षक-प्राध्यापक सोनपेठ पंचक्रोशीतील तमाम नागरिक-पालक यांना अभिवचन देतो की, आपण आपला पाल्य (मुलगा-मुलगी) बिनधास्त आमच्या कॅम्पस मध्ये शिक्षणासाठी प्रवेशित करा! त्याला आम्ही मनोभावे मार्गदर्शन करू, त्याबरोबरच आपणही आपल्या पाल्याचे दप्तर, नोटबुक आणि इतर गोष्टी तपासून त्याला अभ्यास करण्यास प्रवृत्त करून आमच्या ज्ञानार्जनाचे सार्थक करावे ही माफक अपेक्षा! तसेच, आम्ही इथे याहीपेक्षा जोमाने ज्ञानदानाचे काम करत राहू ही ग्वाही देतो आणि संस्था अध्यक्ष मा.श्री परमेश्वर कदम साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन तूर्तास हा शब्दप्रपंच इथे थांबवतो ! 
जय हिंद! जय भारत !
प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये सर यांच्या लेखणीतून...

Monday, September 18, 2023

कै.र.व.महाविद्यालयाचा जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शिवमल्हार वाघे यांची हॅट्रिक.....

कै.र.व.महाविद्यालयाचा जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शिवमल्हार वाघे यांची हॅट्रिक.....


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश शिवमल्हार वाघे याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे .क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, परभणी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील कल्याण मंडप येथे शनिवार दि. 15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथमेश वाघे याने विजयाची हॅट्रिक करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, सन 2019 ,22 23 मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करून तीन वेळा विजय प्राप्त केला आहे ,यापूर्वी सलग चार वेळा तालुकास्तरीय स्पर्धेत विजेता ठरला आहे.सोनपेठ तालुक्यातील कानाकोपऱ्यात बुद्धिबळ खेळाचे खेळाडू निर्माण करण्याचा त्याचा मानस असून तो असंख्य विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देत आहे, त्याच्या यशाबद्दल जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष प्रशिक्षक संभाजी बिल्पे, अंकुशराव चट्टे,  प्रशिक्षक चंद्रशेखर पोटेकर, कमलनयन देशमुख, अभिजीत बिल्पे, नांदेड येथील प्रशिक्षक प्रा.डॉ.दिनकर हंबर्डे, ह.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य शेख शकीला, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी तळेकर, क्रीडा शिक्षक प्रा.कैलास आरबाड, प्रा.गोविंद वाकणकर, मंगेश तांबट,आकाश रोकडे,उमेश मुळे, मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या सर्व सदस्यांनी व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Sunday, September 17, 2023

पोहंडूळ जिल्हा परिषद शाळेत राजेश विटेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप

पोहंडूळ जिल्हा परिषद शाळेत राजेश विटेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप


सोनपेठ (दर्शन) :-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष 2023 विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहंडुळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहंडुळ येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 निमित्य व तालुकास्तरीय विज्ञान नाट्यउत्सव या उपक्रमांतर्गत शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या नाटिकेचे सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या क्रमांकासाठीचे बक्षीसे गावातील पालक मा.श्री.माऊली बळीराम कानडे आणि मा.श्री.मुंजाभाऊ विठ्ठल जगतकर यांच्या तर्फे देण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.राजेश दादा विटेकर (मा.जि.प.अध्यक्ष),मा.श्री.दशरथराव सूर्यवंशी पाटील (सभापती कृ.उ.बा.स.सो.),मा.श्री.उत्तमराव जाधव (उपसभापती कृ.उ.बा.स.सो.),मा.बालाजी जोगदंड (संचालक कृ.उ.बा.स.सो.),मा.श्री.रामेश्वर मोकाशे (संचालक कृ.उ.बा.स.सो.) गावच्या सरपंचा सौ.संगिताई कापसे,शा.व्य.स.अध्यक्ष मा.श्री.गजानन कापसे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप करण्यात आली, यावेळी शाळेचे उ.श्रे.मु.अ.श्री.आश्रोबा सावंत, शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील नागरिक, पालक उपस्थित होते.

Tuesday, September 12, 2023

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरात पोलीस स्टेशन येथे दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता विविध सण उत्सव पोळा, मराठवाडा मुक्ती संग्राम, श्री गणेश चतुर्थी, जेष्ठागौरी आवाहन, अनंत चतुर्दशी व ईद- ए- मिलाद आदि सन उत्सवा निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार माननीय सुनील कावरखे तर प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे, पीएसआय फड व म्हात्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती,याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे यांनी बोलताना सांगितले की सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा असे आवाहन त्यांनी केले, तसेच श्री गणेश उत्सव पट्टी वसुली समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार करावी,डी.जे.च्या खर्चा ऐवजी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शाळेला आवश्यक गोष्टी भेट स्वरूपात मदत करावी, विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात यावे, रक्तदान, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, सामाजिक संघटना, मित्र मंडळ आदिंनी मिरवणुकी दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी सुचना देण्यात आल्या, यावेळी मनोगत जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सिरसाट, जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार परिषद जिल्हा उपाध्यक्ष शिवमल्हार वाघे, अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे सचिव आश्रोबा खरात आदिंनी व्यक्त करत, नगर परिषद साठी सुचना प्रमुख मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्य उचलून रस्ते मोकळे करावेत, रस्त्यावरील आडव्या नाल्याचे मध्यभागी उघडे असलेल्या खड्ड्यावर झाकण बसवावेत, प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांचे साहित्य उचलून कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत,वाहन धारकांना शिस्त लावावी, विद्युत महावितरण कंपनीने प्रमुख मिरवणूक मार्गावर लोंबकळत असलेल्या तारांना बांबू लावावेत, श्री गणेश भक्तांसाठी शहरातील मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने पारितोषिक वितरण करावे, निवड समिती मध्ये शांतता समितीचा एक सदस्य, पत्रकार प्रतिनिधी एक, प्रशासकीय महसूल अधिकारी एक, आरोग्य अधिकारी एक व वकील संघाचा एक प्रतिनिधी असावा, अध्यक्षीय समारोप तहसीलदार सुनील कावरखे यांनी केला तर आभार सपोनि सुनील अंधारे यांनी मानले.यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार बांधव, शहरातील व ग्रामीण विविध श्री गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, August 29, 2023

जिल्हा परिषद परभणी विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या सरपंचाचे अभिनंदन

जिल्हा परिषद परभणी विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या सरपंचाचे अभिनंदन 
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात जिल्हा परिषद परभणी च्या विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत कार्यालय तालुक्यातील 9 सरपंचांचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे, अनुक्रमांक,ग्रामपंचायत गावांचे नाव, सरपंचांचे नाव खालील प्रमाणे 1) उखळी सरपंच श्री राजेभाऊ अच्युतराव सावंत, 2) कोठाळा सरपंच श्री लक्ष्मण छत्रुघन भोसले, 3) नरवाडी सरपंच श्रीमती पुष्पाबाई रामभाऊ वाघमारे, 4) करम सरपंच श्री रामेश्वर दौलतराव पोते, 5) कोरटेक सरपंच श्री दशरथ बाळदेव सूर्यवंशी, 6)
शिर्शी सरपंच श्री भागवतराव उत्तमराव सोळंके, 7) विटा खुर्द सरपंच श्री मदन पंडितराव भोसले, 8) लासिना सरपंच श्रीमती संगीता शामसुंदर परांडे, 9) ऊकडगाव मक्ता सरपंच श्रीमती जयश्री भाऊराव मोरे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 5, शिवसेना शिंदे गटाच्या 2,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची 1व भारतीय जनता पक्षाची 1 ग्रामपंचायत दिसत आहेत,या सर्वांचे तहसीलदार सुनील कावरखे,गट विकास अधिकारी मधुकर कदम, सपोनि सुनील अंधारे तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Sunday, August 27, 2023

पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे - अतिशनाना गरड राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदणाद्वारे केली मागणी

पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे - अतिशनाना गरड
राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदणाद्वारे केली मागणी 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पंधरा जिल्हातील 5142 गावांतील लाखो शेतकरी बांधवाचे होत आहे नुकसान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा प्रकल्प राज्यभर राबविला जात असतो या प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक उदा. वृक्षारोपण,फळबाग लागवड,पॉली हाऊस,शेड नेट हाऊस ,पॉली हाऊस/शेड नेटसह फ्लॉवर/भाजीपाला लागवड ,रेशीम,मधमाशी पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,इतर कृषी आधारित उद्योग,गांडूळ खत युनिट,नाडेप कंपोस्ट,सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट ,शेततळे,फील्ड अस्तर,विहिरी ,ठिबक संच,फ्रॉस्ट संच,पंप संच,पाइपलाइन व गट कंपनीचे गोदाम ,औजार बँक  आदींसाठी तसेच ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्व संमती चे अर्ज वेब साईट वरून आँनलाईन करावे लागतात परंतु ही वेबसाईटच बंद असल्याने शेतकरी वर्ग सदरील पोकरा योजने पासून वंचित राहत असून त्यांना सदरील योजनेचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण मुख्य मंञी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत निवेदण सखोल चर्चा करून पोकरा योजनेची वेब साईट तात्काळ सुरू करून पूर्व संमती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती केली.यावेळी अतिशनाना गरड,संतोष गरड,अर्जुण अब्दागिरे,सतिश खोबे,सिध्देश्वर कदम,मुंजाजी भुसारे,गोपाळ कदम, संदीप कदम,उमेश देशमुख, आदी उपस्थित होते.

Monday, August 21, 2023

ग्राहक वीज बील भरणा करण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा वाढविण्याबाबत

ग्राहक वीज बील भरणा करण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा वाढविण्याबाबत


सोनपेठ (दर्शन) :-

महवितरण कार्यालयामध्ये ग्राहकांनी वीज बील भरण्यासाठी नगदी रू. 5000/- (पाच हजार रूपये) कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक ग्राहकांकडे चेकबुक देखील नाहीत. त्यामुळे त्यांना चेकद्वारे वीज बील भरणे हे शक्य नाही. तसेच वीज बील भरण्यासाठी वीज बील भरणा केंद्रावर गेल्यावर विनाकारण ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी वीज बील भरण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा ही 10,000/- (दहा हजार रूपये)
करण्यात यावी. यामुळे ग्राहकांची अडचण दूर होवून वीज बील भरणा करणे सोपे होईल. तरी में. साहेबांनी वरील विषयी लक्ष घालून सामान्य नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेवून नागरिकांच्या हितासाठी व आपल्या कार्यालयाच्या वसुलीसाठी वरील मुद्दा हा महत्वाचा आहे. करिता आपण स्वतः वरिष्ठ कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी या निषयी माहिती द्यावी. ही अडचण एका ग्राहकाची नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांची अचडण आहे. यावर आपण स्वतः व्यक्तिगतरित्या या विषयी दखल घेऊन सामान्य नागरिकांची अडचण दूर करावी. या मागणीचे निवेदन अध्यक्ष अभियंता महावितरण परभणी . तसेच माननीय सचिव ऊर्जामंत्री मंत्रालय मुंबई , मुख्य अभियंता परिमंडल कार्यालय महावितरण विद्युत भवन नांदेड,यांनाही पोस्टद्वारे पाठवण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत महानगर परभणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर परभणी शाखा महानगराध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल करीम, धाराजी भुसारे, भानुदास शिंदे ,के बी शिंदे, अमृतराव शिंदे ,एस के चव्हाण, बाबासाहेब भोसले, मुजीब खान , शंकर झाटे आदिचा निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Sunday, August 20, 2023

कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन......

कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन......


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा सोनपेठ सारख्या ग्रामीण भागात पोचवून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणारे दूरदृष्टी नेतृत्व दिवंगत राजाभाऊ कदम साहेबांचा आज स्मृतिदिन आहे. साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन.
उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबवून उभारण्यात येणाऱ्या उद्योगांना आज मोठ्या प्रमाणावर आपण स्टार्टअप (उद्यमारंभ) म्हणून संबोधतो. एका लहानशा गरजेतून तुम्ही एखाद्या नवीन उद्योगाची केलेली सुरुवात म्हणजे उद्यमारंभ होय. गरज हि शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. नव्वदीच्या दशकात अशाच एका सामाजिक गरजेतून आणी सेवाभावी वृतीतून उच्चशिक्षणाची सुरुवात सोनपेठ सारख्या अडवळणाच्या ठिकाणी करावी या संकल्पनेतून कै. राजाभाऊ कदम साहेबांनी उद्दात्त हेतूने हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात १९९३ मध्ये करून कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय या नावाने नवीन स्टार्टअप सुरू केले. सोनपेठ सारख्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेल्या  छोट्या शहरात उच्च शिक्षणाची गंगा पोचवून अनेक पिढ्या घडवण्याचा उद्देश त्यामागे होता. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाने ‘ज्ञानात धर्म ततः सुखम’  हे ब्रीद घेऊन सोनपेठ तालुक्यातील युवकांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे हाती घेतलेले कार्य आजतागायत सुरू आहे. संस्थेच्या कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाने नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण केलेली असून महाविद्यालयाची आजपर्यंतची वाटचाल उतरोत्तर प्रगतीकडे घेऊन जाणारी ठरलेली आहे. सुरुवातीच्या काळात भाड्याचा इमारतीमध्ये सुरू झालेले महाविद्यालय आज स्वतःच्या जागेत डौलाने उभे असून सोनपेठ तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मैलाचा दगड ठरत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. परमेश्वर कदम साहेबांनी मागील अकरा वर्षांपासून संस्थेअंतर्गत विविध शैक्षणीक घटक संस्था सुरू केलेल्या  आहेत. सोनपेठ पंचक्रोशीतील युवकांना आणि विशेष करून मुलींना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजाभाऊ कदम यांचे होते. १९९० च्या दशकामध्ये मुलींना शिक्षणासाठी परगावी ठेवण्याची मानसिकता रुजलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत आपल्याच भागात महाविद्यालय असावे अशा खंबीर भूमिकेतून संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या या सेवाभावी कार्याला तत्कालीन सचिव श्री रमेशराव खरवडे, ऊपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत परळकर, कोषाध्यक्ष श्री व्यंकटरावजी कदम साहेब, संचालक श्री बालासाहेब नखाते, श्री अंकुशराव वाकणकर, डॉ .संतोष नायबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सोनपेठ शहरातील परळी रोडवरील राजाभाऊ कदम नगर परिसरात आज संस्थेच्या सर्व घटकसंस्था कार्यरत आहेत.यामध्ये प्रामुख्याने कै.रमेश वरपूडकर वरिष्ठ महाविद्यालय,  कै.रमेश वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालय (मराठी माध्यम) ई.चा समावेश होतो. प्राथमिक शिक्षणातील इंग्रजी माध्यमाकडे असलेला पालकांचा ओढा लक्षात घेऊन  एल. आर. के. नावाने  इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. याशिवाय शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे तसेच पदव्युत्तर शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने महाविद्यालयास एम.ए. / एम.कॉम.चे वर्ग चालवण्यास परवानगी दिली असून आता सोनपेठ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना के.जी.पासून पी.जी.पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली पूर्ण करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांनी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उपलब्ध करून दिलेली आहे. संस्थेचे मिशन ‘Reaching to the Unreached’ असून सोनपेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व घटक बांधील आहेत, त्याचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये महाविद्यालयाने आपली गुणवत्ता NAAC द्वारे प्रमाणित करून घेऊन ‘ब’ दर्जा प्राप्त केलेला आहे तसेच  स्वा.रा.ती.म. विद्यापिठाने महाविद्यालयास शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जा दिलेला आहे. क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरविद्यापीठ पातळीपर्यंत मजल मारली आहे.  महाविदयालयाच्या ‘प्रज्ञा’ वार्षिक अंकास विद्यापिठाने सलग ४ वेळा उत्क्रुष्ट अंक म्हणून पुरस्कारीत केलेले आहे. महाविद्यालयातील बहुतांश शिक्षक पत्रकारिता, कला, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून स्वा.रा.ती.म. विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणावर नियुक्त आहेत.  १९९४ मध्ये ५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात आज जवळपास २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविदयालयाचे अनेक माजी विद्यार्थी अंकेक्षक, शिक्षण, कला, भारतीय सैन्य, शिक्षण क्षेत्र  आणी व्यवसायात आपले करिअर करत आहेत. महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरत आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी  नेट/सेट सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवत असून २०२१ च्या परीक्षेत ४ विद्यार्थी सेट पास झालेले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक विषयांचे शिक्षण देत असताना आज बदलत्या काळानुसार कालसुसंगत शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले महाविद्यालय कसे बहुविद्याशाखीय राहील यासाठी संस्थेची वाटचाल सुरू आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व्यवसाईक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून येत्या काळात अशा प्रकारचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतील असा आशावाद आम्ही बाळगून आहोत. स्वर्गीय राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या शैक्षणिक संस्थेच्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झालेले असुन पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांना याचा लाभ होत आहे. साहेबांच्या स्मृतीस पुनश्च विनम्र अभिवादन.🙏🙏🙏
         श्री.डाॕ.प्राचार्य वसंत सातपुते
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ.

Friday, August 18, 2023

सोनपेठ येथे शनिवारी विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा

सोनपेठ येथे शनिवारी विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा



सोनपेठ (दर्शन) :-

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आंतर महाविद्यालयीन  मुले-मुली गटांची बुद्धिबळ  स्पर्धा  शनिवार  दि. 19  रोजी शहरातील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय येथे होणार आहे.
 या स्पर्धेमध्ये नांदेड, हिंगोली परभणी, लातूर A B C D या चार झोनमधील विजयी मुलाचे संघ   स्पर्धासाठी सहभागी होणार आहेत, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील मुलींचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत.
 ही स्पर्धा दि. 19-20 ऑगस्ट  दरम्यान होणार आहे.तर तायक्वांदो या स्पर्धेसाठी परभणी व हिंगोली जिल्यातील डी झोन अंतर्गत महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत.  क्रीडा संचालक  प्रा गोविंद वाकणकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे  दोन्ही स्पर्धचे यजमान पद कै रमेश वरपुडकर महाविद्यालय यांना मिळाले असल्यामुळे तालुका पातळीवरील व ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये  आपले कौशल्य दाखविण्यासाठी वाव मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून डॉ. मनोज रेड्डी क्रीडा संचालक स्वाराती म.वि. नांदेड, डॉ.मीनानाथ गोमाचाळे चेअरमन डी.झोन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे ,प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.
 स्पर्धा आयोजना साठी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख शकीला, क्रीडा संचालक व संघ व्यवस्थापक डॉ.गोविंद वाकणकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्व्यक डॉ. मुकुंदराज पाटील,डॉ अनंत सरकाळे, क्री. स. सदस्य डॉ. अशोक जाधव, डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. संतोष रणखांब,सर्व प्राध्यापक, महाविद्यालय कर्मचारी सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. विशेष  बाब म्हणजे विद्यापीठाच्या वतीने या महाविद्यालयाला  बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रथमच यजमान पद दिले आहे.

Wednesday, August 16, 2023

श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावणमास तपोणुष्ठान चिंचोली येथे सुरू

श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावणमास तपोणुष्ठान चिंचोली येथे सुरू


सोनपेठ (दर्शन):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास तपोणुष्ठान श्री नंदिकेश्वर मठ संस्थान मठाधिपती श्री ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांची श्रावणमास तपोणुष्ठान लातूर जिल्ह्यातील मौजे चिंचोली बुद्रुक येथील स्वयंभू गौरी शंकर महादेव मंदिर येथे सुरुवात दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी करण्यात आली असून यांची सांगता दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार रोजी संपूर्ण महिनाभर दैनंदिन कार्यक्रम महादेव रुद्राभिषेक सकाळी 7 ते 9,इंष्टलिंग पूजा व दांपत्य पूजा सकाळी 9 ते 12, प्रसाद 12 ते 2, महिला भजनी मंडळ दुपारी 2 ते 5, महाराजांचे आशीर्वचन सायंकाळी 5 ते 6 आणि महादेव मंदिर नित्य आरती रात्री 8 ते 9 तसेच भजन रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत होईल, सप्ताहात शिवदिक्षा सोहळा दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता तर भव्य शोभा यात्रा व महाप्रसाद दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी समारोप सकाळी 8 वाजता सुरुवात होईल, सोनपेठ श्री नंदिकेश्वर मठ संस्थान वार्षिक सप्ताह मीटिंग दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होईल,याप्रसंगी कै.कमलाकर आप्पाराव नागपुरे यांच्या स्मरणार्थ संगीतमय शिवमहापुरात कथा शिव भक्त पंडित रुक्मिणीताई हावरे रोहनवाडीकर यांच्या अमृतवाणीतून दिनांक 6 सप्टेंबर 2023 बुधवार ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार पर्यंत दुपारी 2 ते 5 संपन्न होणार आहे , कार्यक्रमात वेळे नुसार थोडाफार बदल केला जाईल असे आवाहन श्रावणमास तपोणुष्ठान कार्यक्रम समिती समस्त ग्रामस्थ चिंचोली बुद्रुक यांनी केले आहे, तरी भक्तगणांनी व शिष्यगणांनी संपर्कासाठी 9420326341, 9730277161, 9975347395 व 9130514856 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.