Wednesday, September 20, 2023

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच! सोनपेठ शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित कदम घराण्यातील दुसऱ्या पिढीतील उभारतं व्यक्तिमत्व म्हणजे श्री परमेश्वर राजभाऊ कदम! माजी आमदार मा. व्यंकटराव कदम साहेब, सोनपेठ न.प.चे माजी उप-नगराध्यक्ष मा.दत्तराव कदम काका या दोन जेष्ठ कदम घराण्यातील धुरीणांच्या मार्गदर्शनात आणि वडील, माजी नगरसेवक कै.राजाभाऊ कदम साहेबांचा वारसा लाभलेले श्री परमेश्वर कदम यांनी मागील 15 वर्षात आपल्या संस्थेच्या अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे! विशेषत: वरिष्ठ महाविद्यालयाने NAAC यशस्वीपणे सामोरे जाऊन B दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणपत्र मिळवण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे!  श्री परमेश्वर कदम साहेबांनी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा हाती घेतल्यापासून संस्थेने कात टाकली असून संस्थेने KG ते PG अशी यशस्वी, दैदिप्यमान वाटचाल केली असून या संस्थेअंतर्गत जवळपास तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आजघडीला ज्ञानार्जन करत आहेत आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचारी अध्ययन-अध्यापन करत आहेत! अत्यंत कमी वयात खांद्यावर पडलेले संस्थेचे हे शिवधनुष्य श्री परमेश्वर कदम यांनी लीलया पेलले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय दमदारपणे वाटचाल करत आहे याचा मनस्वी अभिमान वाटतो! स्व.राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या रोपट्याला योग्य सिंचन करून या संस्थेचे छान संगोपन त्यांच्याकडून होत आहे! या संस्थेच्या माध्यमातून सोनपेठ सारख्या दुर्गम, शिक्षणापासून वंचित भागात खेड्यापाड्यात,  वाडी-तांड्यावर विशेषतः मुलींसाठी उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर जाऊन पोहोचली आहे, त्याद्वारे *ज्ञानात धर्म तत् सुखम* हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरते आहे ! संस्थेच्या खांद्याला खांदा लावून वरिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ, उच्च-विद्याभूषित, अनुभवी प्राचार्य-प्राध्यापक मंडळींच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळेतील शिक्षक इथे एकनिष्ठ भावनेने काम करत असून या सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन श्री कदम साहेब हे सर्वांना सोबत घेऊन संस्थेची ही नाव मोठ्या सन्मानाने पुढे नेत आहेत! याचाच परिपाक म्हणजे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी NET/SET/PhD सारख्या परीक्षा/पदव्या संपादन करत असून अनेक विद्यार्थी प्राचार्य-प्राध्यापक-शिक्षक-CA-बँकेत अधिकारी आदी सन्मानीय पदावर रुजू झाले आहेत! मागील काही वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी NEET/JEE/MH-CET आणि इतर परीक्षेच्या माध्यमातून MBBS/BAMS/BHMS/Pharmacy/Engineering सारख्या सन्मानाच्या कोर्सेसला प्रवेश नोंदवून संस्थेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे खोवले आहेत! नक्कीच ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे! तेंव्हा, आज मा.अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व शिक्षक-प्राध्यापक सोनपेठ पंचक्रोशीतील तमाम नागरिक-पालक यांना अभिवचन देतो की, आपण आपला पाल्य (मुलगा-मुलगी) बिनधास्त आमच्या कॅम्पस मध्ये शिक्षणासाठी प्रवेशित करा! त्याला आम्ही मनोभावे मार्गदर्शन करू, त्याबरोबरच आपणही आपल्या पाल्याचे दप्तर, नोटबुक आणि इतर गोष्टी तपासून त्याला अभ्यास करण्यास प्रवृत्त करून आमच्या ज्ञानार्जनाचे सार्थक करावे ही माफक अपेक्षा! तसेच, आम्ही इथे याहीपेक्षा जोमाने ज्ञानदानाचे काम करत राहू ही ग्वाही देतो आणि संस्था अध्यक्ष मा.श्री परमेश्वर कदम साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन तूर्तास हा शब्दप्रपंच इथे थांबवतो ! 
जय हिंद! जय भारत !
प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये सर यांच्या लेखणीतून...

No comments:

Post a Comment