Tuesday, September 12, 2023

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरात पोलीस स्टेशन येथे दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता विविध सण उत्सव पोळा, मराठवाडा मुक्ती संग्राम, श्री गणेश चतुर्थी, जेष्ठागौरी आवाहन, अनंत चतुर्दशी व ईद- ए- मिलाद आदि सन उत्सवा निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार माननीय सुनील कावरखे तर प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे, पीएसआय फड व म्हात्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती,याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे यांनी बोलताना सांगितले की सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा असे आवाहन त्यांनी केले, तसेच श्री गणेश उत्सव पट्टी वसुली समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार करावी,डी.जे.च्या खर्चा ऐवजी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शाळेला आवश्यक गोष्टी भेट स्वरूपात मदत करावी, विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात यावे, रक्तदान, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, सामाजिक संघटना, मित्र मंडळ आदिंनी मिरवणुकी दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी सुचना देण्यात आल्या, यावेळी मनोगत जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सिरसाट, जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार परिषद जिल्हा उपाध्यक्ष शिवमल्हार वाघे, अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे सचिव आश्रोबा खरात आदिंनी व्यक्त करत, नगर परिषद साठी सुचना प्रमुख मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्य उचलून रस्ते मोकळे करावेत, रस्त्यावरील आडव्या नाल्याचे मध्यभागी उघडे असलेल्या खड्ड्यावर झाकण बसवावेत, प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांचे साहित्य उचलून कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत,वाहन धारकांना शिस्त लावावी, विद्युत महावितरण कंपनीने प्रमुख मिरवणूक मार्गावर लोंबकळत असलेल्या तारांना बांबू लावावेत, श्री गणेश भक्तांसाठी शहरातील मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने पारितोषिक वितरण करावे, निवड समिती मध्ये शांतता समितीचा एक सदस्य, पत्रकार प्रतिनिधी एक, प्रशासकीय महसूल अधिकारी एक, आरोग्य अधिकारी एक व वकील संघाचा एक प्रतिनिधी असावा, अध्यक्षीय समारोप तहसीलदार सुनील कावरखे यांनी केला तर आभार सपोनि सुनील अंधारे यांनी मानले.यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार बांधव, शहरातील व ग्रामीण विविध श्री गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment