पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे - अतिशनाना गरड
राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदणाद्वारे केली मागणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पंधरा जिल्हातील 5142 गावांतील लाखो शेतकरी बांधवाचे होत आहे नुकसान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा प्रकल्प राज्यभर राबविला जात असतो या प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक उदा. वृक्षारोपण,फळबाग लागवड,पॉली हाऊस,शेड नेट हाऊस ,पॉली हाऊस/शेड नेटसह फ्लॉवर/भाजीपाला लागवड ,रेशीम,मधमाशी पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,इतर कृषी आधारित उद्योग,गांडूळ खत युनिट,नाडेप कंपोस्ट,सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट ,शेततळे,फील्ड अस्तर,विहिरी ,ठिबक संच,फ्रॉस्ट संच,पंप संच,पाइपलाइन व गट कंपनीचे गोदाम ,औजार बँक आदींसाठी तसेच ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्व संमती चे अर्ज वेब साईट वरून आँनलाईन करावे लागतात परंतु ही वेबसाईटच बंद असल्याने शेतकरी वर्ग सदरील पोकरा योजने पासून वंचित राहत असून त्यांना सदरील योजनेचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण मुख्य मंञी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत निवेदण सखोल चर्चा करून पोकरा योजनेची वेब साईट तात्काळ सुरू करून पूर्व संमती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती केली.यावेळी अतिशनाना गरड,संतोष गरड,अर्जुण अब्दागिरे,सतिश खोबे,सिध्देश्वर कदम,मुंजाजी भुसारे,गोपाळ कदम, संदीप कदम,उमेश देशमुख, आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment