'कार्तिक पोर्णिमा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार यात्रे करिता बीड एस.टी विभागाद्वारे ७५ बसेस चे नियोजन'
बिड / परळी / सोनपेठ (दर्शन) :-
कार्तिक पौर्णिमा निमित्त कपिलधार यात्रेकरिता बिड एसटी विभागाने 75 बस फेरीचे नियोजन केले असल्याची माहिती संतोष नागनाथ महाजन आगार प्रमुख परळी वैजनाथ यांनी दिली.
दि. २५ नोव्हेबर ते २७ नोव्हेबर या कालावधीत कार्तिक पोर्णिमा निमित्त श्री क्षेत्र कपीलधार ता. जि. बीड येथे यात्रा भरणार आहे. त्या अनुषंगाने मोठया प्रमाणात भावीक भक्त महाराष्ट्रातील विविध जिल्हयातुन तसेच इंतर राज्यातुन श्री क्षेत्र कपीलधार येथे असतात. त्या करीता बीड विभागाद्वारे ७५ बसेसचे आगार निहाय नियोजन खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे.
बिड 10, परळी 18, धारूर 10, माजलगाव 07, गेवराई 07, पाटोदा 07, आष्टी 07, अंबाजोगाई 11 अशा एकुण 75 वरील प्रमाणे 75 बसेस कपीलधार, मांजरसुंबा ते अंबाजोगाई-परळी, लातुर, अहमदपुर या मार्गावर धावणार असुन प्रवाशांनी / भावीकांनी रा.प. बसने प्रवास करावा.असे आवाहन संतोष नागनाथ महाजन आगार प्रमुख परळी वैजनाथ यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment