श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावणमास तपोणुष्ठान चिंचोली येथे सुरू
सोनपेठ (दर्शन):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास तपोणुष्ठान श्री नंदिकेश्वर मठ संस्थान मठाधिपती श्री ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांची श्रावणमास तपोणुष्ठान लातूर जिल्ह्यातील मौजे चिंचोली बुद्रुक येथील स्वयंभू गौरी शंकर महादेव मंदिर येथे सुरुवात दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी करण्यात आली असून यांची सांगता दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार रोजी संपूर्ण महिनाभर दैनंदिन कार्यक्रम महादेव रुद्राभिषेक सकाळी 7 ते 9,इंष्टलिंग पूजा व दांपत्य पूजा सकाळी 9 ते 12, प्रसाद 12 ते 2, महिला भजनी मंडळ दुपारी 2 ते 5, महाराजांचे आशीर्वचन सायंकाळी 5 ते 6 आणि महादेव मंदिर नित्य आरती रात्री 8 ते 9 तसेच भजन रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत होईल, सप्ताहात शिवदिक्षा सोहळा दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता तर भव्य शोभा यात्रा व महाप्रसाद दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी समारोप सकाळी 8 वाजता सुरुवात होईल, सोनपेठ श्री नंदिकेश्वर मठ संस्थान वार्षिक सप्ताह मीटिंग दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होईल,याप्रसंगी कै.कमलाकर आप्पाराव नागपुरे यांच्या स्मरणार्थ संगीतमय शिवमहापुरात कथा शिव भक्त पंडित रुक्मिणीताई हावरे रोहनवाडीकर यांच्या अमृतवाणीतून दिनांक 6 सप्टेंबर 2023 बुधवार ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार पर्यंत दुपारी 2 ते 5 संपन्न होणार आहे , कार्यक्रमात वेळे नुसार थोडाफार बदल केला जाईल असे आवाहन श्रावणमास तपोणुष्ठान कार्यक्रम समिती समस्त ग्रामस्थ चिंचोली बुद्रुक यांनी केले आहे, तरी भक्तगणांनी व शिष्यगणांनी संपर्कासाठी 9420326341, 9730277161, 9975347395 व 9130514856 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment