कै.र.व.महाविद्यालयाचा जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शिवमल्हार वाघे यांची हॅट्रिक.....
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश शिवमल्हार वाघे याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे .क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, परभणी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील कल्याण मंडप येथे शनिवार दि. 15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथमेश वाघे याने विजयाची हॅट्रिक करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, सन 2019 ,22 23 मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करून तीन वेळा विजय प्राप्त केला आहे ,यापूर्वी सलग चार वेळा तालुकास्तरीय स्पर्धेत विजेता ठरला आहे.सोनपेठ तालुक्यातील कानाकोपऱ्यात बुद्धिबळ खेळाचे खेळाडू निर्माण करण्याचा त्याचा मानस असून तो असंख्य विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देत आहे, त्याच्या यशाबद्दल जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष प्रशिक्षक संभाजी बिल्पे, अंकुशराव चट्टे, प्रशिक्षक चंद्रशेखर पोटेकर, कमलनयन देशमुख, अभिजीत बिल्पे, नांदेड येथील प्रशिक्षक प्रा.डॉ.दिनकर हंबर्डे, ह.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य शेख शकीला, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी तळेकर, क्रीडा शिक्षक प्रा.कैलास आरबाड, प्रा.गोविंद वाकणकर, मंगेश तांबट,आकाश रोकडे,उमेश मुळे, मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या सर्व सदस्यांनी व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

No comments:
Post a Comment