ग्राहक वीज बील भरणा करण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा वाढविण्याबाबत
सोनपेठ (दर्शन) :-
महवितरण कार्यालयामध्ये ग्राहकांनी वीज बील भरण्यासाठी नगदी रू. 5000/- (पाच हजार रूपये) कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक ग्राहकांकडे चेकबुक देखील नाहीत. त्यामुळे त्यांना चेकद्वारे वीज बील भरणे हे शक्य नाही. तसेच वीज बील भरण्यासाठी वीज बील भरणा केंद्रावर गेल्यावर विनाकारण ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी वीज बील भरण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा ही 10,000/- (दहा हजार रूपये)
करण्यात यावी. यामुळे ग्राहकांची अडचण दूर होवून वीज बील भरणा करणे सोपे होईल. तरी में. साहेबांनी वरील विषयी लक्ष घालून सामान्य नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेवून नागरिकांच्या हितासाठी व आपल्या कार्यालयाच्या वसुलीसाठी वरील मुद्दा हा महत्वाचा आहे. करिता आपण स्वतः वरिष्ठ कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी या निषयी माहिती द्यावी. ही अडचण एका ग्राहकाची नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांची अचडण आहे. यावर आपण स्वतः व्यक्तिगतरित्या या विषयी दखल घेऊन सामान्य नागरिकांची अडचण दूर करावी. या मागणीचे निवेदन अध्यक्ष अभियंता महावितरण परभणी . तसेच माननीय सचिव ऊर्जामंत्री मंत्रालय मुंबई , मुख्य अभियंता परिमंडल कार्यालय महावितरण विद्युत भवन नांदेड,यांनाही पोस्टद्वारे पाठवण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत महानगर परभणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर परभणी शाखा महानगराध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल करीम, धाराजी भुसारे, भानुदास शिंदे ,के बी शिंदे, अमृतराव शिंदे ,एस के चव्हाण, बाबासाहेब भोसले, मुजीब खान , शंकर झाटे आदिचा निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:
Post a Comment