Saturday, October 28, 2023

दुष्काळ जाहीर करण्यास त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे वेळ लागणार ! - वसंत मुंडे

दुष्काळ जाहीर करण्यास त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे वेळ लागणार ! - वसंत मुंडे 


परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसात खंड पडल्यामुळे गाव पातळीपासून शहरापर्यंत पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार असला तरी त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे शासकीय उपाययोजना करण्यासाठी शासन अपयशी ठरणार असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. त्रिमूर्ती सरकारकडून राज्यातील विभाग ,जिल्हा, तालुका निहाय सर्व स्तरावर गांभीर्याने अभ्यास समिती कडून उपाययोजना करण्यासंदर्भात चौकशी अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु शासनाकडून दुष्काळजन्य परिस्थिती संदर्भात हालचाली झालेल्या दिसत नाहीत, त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न राज्यात उपस्थित होणार आहेत. त्यापैकी पाणीटंचाई, जनावराचा चारा छावण्या, अन्नधान्य, भाजीपाला, दुधाची टंचाई, रोजगार हमीची कामे,शैक्षणिक सवलती, शासकीय योजनेचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. नैसर्गिक संकट हाताळण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. तरीही त्रिमूर्ती शासनाकडून कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. राज्यातील १६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यांपैकी १९४ तालुक्यात ६० टक्के कमी पाऊस झालेला आहे अशी शासकीय नोंद असून मराठवाडा, विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरात वरील समस्या दुष्काळा संदर्भात उपस्थित होणार आहेत ,मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश या ही परिसरात कमी पावसामुळे शेतकरी हातबल झालेला आहे. राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती व कारखानदार , अनधिकृतपणे पाणी चोरून उपसा करणारा वर्गामुळे पाणीटंचाई हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून शासनाकडून पाणी आरक्षित ठेवण्यासंदर्भात महसूल विभाग व पाटबंधारे विभागाने पथके नेमून कारवाई करण्याचे आदेश तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment