मराठी वाङ्मय मंडळ भाषा समृद्ध करते - प्रो.डॉ.एम.बी.धोंडगे
राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर व श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा सामंजस्य करारांतर्गत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ.एम.बी.धोंडगे हे होते. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे होते.याप्रसंगी बोलताना प्रोफेसर मुंजा धोंडगे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनापासून मराठी साहित्यातील विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे कारण एक पुस्तक हे शंभर मित्राप्रमाणे असते. मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होते.असे मत व्यक्त केले.
लातूर येथे राजश्री शाहू महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली.या ग्रंथ प्रदर्शनाचे व वाङ्मय यउद्घाटन प्रो.डॉ. एम.बी.धोंडगे( मराठी विभाग प्रमुख तथा आधिसभा सदस्य डॉ. बाबासाहेब विद्यापीठात विद्यापीठ औरंगाबाद) यावेळी शब्दवेध या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी भारताचे राष्ट्रपती ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला.कलाम यांचे कार्य आजच्या युवकासाठी प्रेरणादायी असून त्यांची संपत्ती म्हणजे फक्त दोन सुटकेस एवढीच होती असे मत व्यक्त करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय 24 तास उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी वाचनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री शाहू महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.संभाजी पाटील यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद करून महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी कवी स्वप्नाली भराटे, वैष्णवी खलसे, रीजा पटेल,मंथन सूर्यवंशी, प्रतीक्षा माने, दीक्षा जावळे,श्रावणी नागटिळक इ. विद्यार्थ्यांनी विविध कविता सादर केल्या.यावेळी व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ.सतीश शिंदे मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कु.विशाखा सोमवंशी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी यादव हिने केले.तर आभार प्रदर्शन डॉ.विजयकुमार करंजकर यांनी मांडले ऑनलाईन कार्यक्रमास पंडित गुरु पारडीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील, डॉ.आर. एम.अहिरे व पारडीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.संभाजी पाटील,डॉ गोविंद उफाडे, प्रा.बापूसाहेब जवळेकर डॉ.शिवराज काचे प्रा.भीम यादव डॉ.तुकाराम देवकर यांनी केले. यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर पंडितगुरु पारडीकर महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment