सोनपेठ येथे शनिवारी विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा
सोनपेठ (दर्शन) :-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आंतर महाविद्यालयीन मुले-मुली गटांची बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि. 19 रोजी शहरातील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय येथे होणार आहे.
या स्पर्धेमध्ये नांदेड, हिंगोली परभणी, लातूर A B C D या चार झोनमधील विजयी मुलाचे संघ स्पर्धासाठी सहभागी होणार आहेत, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील मुलींचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा दि. 19-20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.तर तायक्वांदो या स्पर्धेसाठी परभणी व हिंगोली जिल्यातील डी झोन अंतर्गत महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा संचालक प्रा गोविंद वाकणकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही स्पर्धचे यजमान पद कै रमेश वरपुडकर महाविद्यालय यांना मिळाले असल्यामुळे तालुका पातळीवरील व ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आपले कौशल्य दाखविण्यासाठी वाव मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून डॉ. मनोज रेड्डी क्रीडा संचालक स्वाराती म.वि. नांदेड, डॉ.मीनानाथ गोमाचाळे चेअरमन डी.झोन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे ,प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा आयोजना साठी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख शकीला, क्रीडा संचालक व संघ व्यवस्थापक डॉ.गोविंद वाकणकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्व्यक डॉ. मुकुंदराज पाटील,डॉ अनंत सरकाळे, क्री. स. सदस्य डॉ. अशोक जाधव, डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. संतोष रणखांब,सर्व प्राध्यापक, महाविद्यालय कर्मचारी सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाच्या वतीने या महाविद्यालयाला बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रथमच यजमान पद दिले आहे.


No comments:
Post a Comment