मुगळीकर यांच्या सेवानिवृत्त नंतरच आंचल गोयल पदभार स्विकारणार
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली;खरी परंतु त्या परभणी येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्त नंतर म्हणजे 31जूलै रोजी दुपारी पदभार स्विकारणार अशी माहिती सुत्रांनी दिली.
राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी बदल्या केल्या या यादीत परभणीच्या जिल्हाधिकारीपदी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे नमूद केले, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तसेच अन्य क्षेत्रात आश्चर्यव्यक्त केले गेले, कारण जिल्हाधिकारी मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्याआधीच नूतन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती संभ्रमावस्थेत टाकणारी ठरली, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरच नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल हा पदभार स्वीकारतील
दरम्यान नुतन जिल्हाधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती करण्यात आली , मंगळवारी सायंकाळी या संदर्भात आदेश लागू झाले आहेत श्रीमती गोयल या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत.


No comments:
Post a Comment