परभणी शहरातील परळी गेट येथे भुयारी रस्ता करण्याची मागणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की परभणी रेल्वेस्थानकातून परळी व औरंगाबादकडे जाणारा रेल्वे मार्ग हा परभणी शहरातील वस्तीतून जातो दिवसभरात अनेक रेल्वे याठिकाणाहून जात असल्याने या ठिकाणी वाहतूकीची नेहमीच कोंडी होत आहे या मार्गावर परभणी - परळी व परभणी - औरंगाबाद या मार्गावर साखला प्लॉट , भीम नगर , पारवा गेट जवळ असे तीन रेल्वे फाटका आहेत . येथील नागरीकांना रहदारीसाठी हा एकमेव रस्ता असल्याने या ठिकाणी रहदारी , वाहतुक बऱ्याच प्रमाणात असल्याने तसेच या तीन्ही फाटका जवळ भरगच्च वस्ती ( प्रत्येकी भागात 20-25 हजार लोकसंख्या ) आहे . मात्र या मार्गावरून सतत रेल्वे गाड्या जात असल्याने सदर तीन्ही रेल्वे फाटक बंद असते या ठिकाणाहून शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजे दवाखाना , रेल्वे स्टेशन , बस स्थानक , शाळा - कॉलेज तसेच बाजारपेठेत जाण्यास नेहमीच रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे एखादा सिरीयस पेशंट दवाखान्यात घेऊन जायचा असेल , विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयत जायचे असेल , या परिसरात कोणाचा मृत्यू झाला व त्यास अंत्यविधीसाठी घेऊन जायचे असेल किंवा कोणास इतर कुठे जायचे असेल तर त्यांच्यासाठी हे रेल्वे फाटक अतिशय अडचण निर्माण करणारा ठरत आहे बऱ्याचवेळी या ठिकाणी या समस्येमुळे अनेक वाद निर्माण झालेले आहेत या गंभीर समस्येचा सहानूभुतीपूर्वक विचार करून परभणी - परळी व परभणी - औरंगाबाद या मार्गावर साखला प्लॉट , भीम नगर , पारवा गेट या तीन्ही रेल्वे फाटकावर भूयारी पुल , लोखंडी पुल किंवा इतर पर्यायी व्यवस्था करून येथील हजारो लोकांची अडचण दूर करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर अब्दुल रहीम,के.बि.शिंदे,धाराजी भुसारे, सय्यद रफीक पेडगावकर,गोपाळ कच्छवे, विजय सोपानराव चट्टे , बाबासाहेब भोसले,लक्ष्मण पवार योगीराज वाकोडे, मुजीब खान,चंद्रकांत घाडगे यदि आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:
Post a Comment