खोटा फेरफार प्रकरणी सेलू पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल ; मंडळ अधिकारी,तलाठी व सहायक चा प्रताप
सेलू / सोनपेठ (दर्शन) :-
खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खोटा फेरफार केल्या प्रकरणी तालुक्यातील रायपूर येथील मंडळ अधिकारी अमर जोरगेवार,तलाठी सचिन नवगिरे, व त्यांचा सहायक ऑपरेटर गटकळ यांच्या विरोधात भगवान कोंडीबा काकडे याच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास स पो नी संतोष माळगे करीत आहेत तालुक्यातील रायपूर येथे सर्व्हे नंबर २७७ मध्ये २ हेक्टर ९८ जमीन आहे .आपसातील भाऊवाटण्यानुसार भगवान कोंडीबा काकडे व प्रकाश कोंडीबा काकडे यांच्या हिश्यास आली आहे .परंतु ही जमीन भाऊसाहेब कोंडीबा काकडे यांच्या नांवे आहे .सदरील जमीन आपल्या नांवे करावी यासाठी प्रकाश कोंडीबा काकडे यांनी सेलू न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे . प्रकरण सेलू न्यायालयात दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दावा क्रमांक २०/२०१८ प्रलंबित आहे .व याची पूर्ण कल्पना मंडळ अधिकारी व तलाठी व सहायक यांना असतांना देखील त्यांनी संगनमताने भावा भावात वाद घडवून आणण्याच्या उद्देशाने साहेब कोंडीबा काकडे यांच्या ताब्यात नसलेल्या व फक्त नांवावर असलेल्या जमिनीचा फेरफार क्रमांक ५४७६ नुसार त्यांच्या दोन मुलांच्या नांवाने केला आहे .यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय सेलू येथील दस्त क्रमांक ६३५ दाखवला आहे .परंतु दुय्यम निबंधक कार्यलयात मात्र हा दस्त संतोष तातेराव काकडे यांच्या नांवे तारण मुक्त नोंद आहे .मंडळ अधिकारी,तलाठी व त्यांचा सहायक ऑपरेटर यांनी खोटे व बनावट कागदपत्रे दाखवून आपली फसवणूक केली अशी फिर्याद भगवान कोंडीबा काकडे यांनी सेलू पोलिसांत दिली आहे .या फिर्यादी नुसार सबधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता अधिनियम नुसार कलम ४२०,४६७,४६८,३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
No comments:
Post a Comment