आयसर परभणीच्या ऊर्जित भावसार यास सुवर्णपदक
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा निकाल जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे, जी. एम. आर.टी. पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात आयसर परभणीच्या ऊर्जित प्रसन्न भावसार याने सादर केलेल्या ‘स्मार्ट सोलर वॉटर सेविंग वॉल’ या मॉडेलने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात सात राज्यातील 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञांनी या सर्व मॉडेल्सचे ऑनलाईन परीक्षण करून नुकताच निकाल जाहीर केला आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटांमध्ये ऊर्जित प्रसन्न भावसार याने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या या संशोधनाचे पेटंट देखील रजिस्टर झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment