परभणी जिल्ह्यात एसटीच्या बसेस लालपरी उद्या सोमवार पासून रस्त्यावर धावणार...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागा अंतर्गत सातही आगारातील जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरील बससेवा सोमवारपासून सुरु होणार, असे स्पष्ट संकेत आहेत.
परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. त्यातून जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरच्या बसेसना परवानगी बहाल करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेवू, असे स्पष्ट केले. या दरम्यान, अन्लॉकच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्हाही समाविष्ट असल्याने त्यातूनही बहुतांशी निर्बंध हटविले जाणार असल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, सोमवारपासून एसटीच्या बसेस धावू लागतील, अशी अपेक्षा विभाग नियंत्रण मुक्तेश्वर जोशी यांनी व्यक्त केली.
अन्य जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्यातीलही एसटी बस लाल परी रस्त्यावर सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा सुर सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत होती. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या सव्वा वर्षांत एसटीच्या बससेवेवर वारंवार निर्बंध घातले. विशेषतः लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाने तब्बल दीड-दोन महिने बस सेवा ठप्प केली. दुसर्या टप्प्यातही 15 मार्च पासून एसटी बससेवा पूर्णतः ठप्प आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी 15 दिवस आधी म्हणजे 1 मार्च पासून विदर्भातील बससेवा पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत व जिल्हा बाहेरच्याही एसटी बसेस आगारात जागेवरच उभ्या राहील्या.
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आधीच प्रवाशांच्या संख्येत प्रचंड अशी घट, त्यामुळे उत्पन्नातही घट एसटीचा परभणी विभाग सोसत असतांना जिल्हा प्रशासनाने दुसर्या टप्प्यातसुध्दा जिल्हाबाहेर व जिल्हांतर्गत बस सेवा पूर्णतः ठप्प ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाने एसटी महामंडळाच्या परभणी विभागास सरासरी दररोज 35 लाख रुपयांचा तडाखा बसला. जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या चार आगारांसह हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत असे तीन अशा एकूण सात आगाराच्या परभणी विभागास दररोज कोट्यवधी रुपयांचा तडाखा बसतो आहे. सोमवारपासून बसेस धावू लागल्यानंतरसुध्दा परिवहन महामंडळास यातून बाहेर निघण्याकरीता बराच कालावधी लागेल, असे संकेत आहेत.शेवटी एकदाचीच एसटीच्या बसेस लाल परी उद्या सोमवार पासून रस्त्यावर धावणार असे समजते.

No comments:
Post a Comment