राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन- 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी दि.1 जून 2021 पासून www.mhrd.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरु झाली असून इच्छुक शिक्षकांनी रविवार दि.20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक, पात्र मुख्यापक ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र असतील. मानव विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन 2017 पासून मार्गदर्शक सुचना सुधारित केल्या असून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी वेबपोर्टल विकसित केले आहे. असेही कळविण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment