Friday, June 25, 2021

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न नागरिकांनी शांततेने व सलोख्याने रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नागरिकांनी शांततेने व सलोख्याने रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर




परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराची प्रकरणे वर्गीकृत करुन दाखल झालेल्या प्रकरणांचे  विश्लेषण करणे आवश्यक आहे.  तसेच यासाठी तज्ञ व नामवंत मंडळीच्या मार्गदर्शनाखाली याबाबत ऑनलाईन शिबीराचे आयोजन करुन नागरिकांनी शांततेने व सलोख्याने  रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.25 जून 2021 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाट, प्रल्हाद अवचार यांच्यासह समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, समाज कल्याण निरीक्षक आर.पी.काळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की,जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच या कामात हयगय करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखली मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत एकुण 41 गुन्हे दाखल झाले असून सद्या 34 गुन्हे पोलीस तपासावर आहेत तरी या 34 प्रकरणात तात्काळ चार्जशिट दाखल करुन घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे आदिचा आढावा घेवून योग्य त्या सुचना करण्यात आल्या.  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत एकुण 41 गुन्हे दाखल  झाले असून त्यापैकी 34 गुन्हे पोलिस तपासावर आहेत. पोलीस तपासावर असलेल्या एकुण 76 प्रकरणात मा.उच्च न्यायालयाची स्थगिती 3, जात प्रमाणपत्र हस्तगत करणे 7, वैद्यकिय प्रमाणपत्र हस्तगत करणे 7 आणि इतर अधिक पुरावा घेणे कामी व आरोपी अटक करणे 59 अशी संख्या आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी यावेळी दिली. 
बैठकीत अशासकीय समिती सदस्य श्रिधर देशमुख, प्रल्हाद अवचार व प्रभाकर सिरसाट यांनी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांचा शाल व श्रीफळ देवून समितीतर्फे सत्कार करण्यात आला.


No comments:

Post a Comment