पात्र शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
अन्नधान्याचे वाटप माहे जुन 2021 या महिन्यात एपीएल, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रथम मागणी करणाऱ्यास प्राथम्याने या तत्वानूसार करावयाचे असल्याने पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शासकीय गोदामांध्ये तसेच रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या गहु व तांदूळ या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ठ न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतीमाह, प्रती व्यक्ती 1 किलो गहु व 1 किलो तांदुळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य जुन 2021 करीता सवलतीने अनुक्रमे 8 रुपये व 12 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे. असेही कळविण्यात आले आहे

No comments:
Post a Comment