एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीने दिले जिल्हा रुग्णालयास एक हजार लिटरचे आरओ प्लॅन्ट
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चुडावा गावचे भुमी पुत्र श्री. कैलास देसाई यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास एक हजार लिटर क्षमतेचे आरओ प्लॅन्ट भेट दिले आहे.त्याचे सोमवार दि.7 जून 2021 रोजी उदघाटन करण्यात आले.
चुडावा येथील कैलास देसाई हे औरंगाबाद येथील एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी कोरोना काळात सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर विविध ग्रामीण भागात व शासकीय रूग्णालयात दिले असून, विविध ठिकाणी बाय पॅप व्हेंटिलेटर देखील दिले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शुध्द पाण्यासाठी जलशुध्दीकरण यंत्र देण्याची बाब पुढे आली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ एक हजार लिटर पाणी क्षमतेचे आरओ प्लॅन्ट उपलब्ध केले. सोमवारी रितसर उदघाटन करण्यात आले. यावेळी श्री कैलास देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.प्रकाश डाके, डॉ पवन चांडक, राजेश्वर वासलवार, विनोद शेंडगे, डॉ यादव, गोविंद देसाई, अरुण पवळे, इश्वर मठमती उपस्थित होते.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment