अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्या समाविष्ट; जिल्हाधिकारी यांच्याआदेशाची प्रतिक्षा
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
अन्लॉकच्या पहिल्या टप्प्याबाबत राज्य सरकारने निर्धारीत केलेल्या निकषांत परभणी जिल्ह्याचाही समावेश होतो आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातूनच परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनचे बहुतांशी नियम शिथील होतील, असे संकेत आहेत.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घालण्यात आलेल्या निर्बंधात हळूहळू शिथिल होताना दिसत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवलेले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि.03) मुंबईतून दिली.
राज्य सरकारच्या नियमावलीत पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे बसतात. यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटणार आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेतला गेल्यास या नियमांची अंमलबजावणी शुक्रवार (दि.04) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हधिकार्यांच्या आदेशाकडे संपूर्ण जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु होतील असे अपेक्षित आहे. त्यात रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के, चित्रपट शुटींगला परवानगी, थिएटर सुरू होतील, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे, ई कॉमर्स सुरू राहिल, जिम, सलून सुरू राहणार, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही, बस 100 टक्के क्षमतेने, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, असे अपेक्षित आहे.

No comments:
Post a Comment