शाहू महाराज- डॉ बाबासाहेबांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक "माणगाव परिषद पहा लघुपटातुन
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे आॕनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.*
या आॕनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, श्री श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य वित्त आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऊर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विधीमंडळ सदस्य आदी आॕनलाईन सहभागी झाले होते.
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षपूर्ती निमित्ताने हा लघुपट प्रतिकात्मक स्वरुपात तयार केला आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी या लघूपटाच्या निर्मितीत पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती बनविण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास तज्ज्ञ डाॕ जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डाॕ अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागप्रमुख डाॕ निशा मुडे, शिवाजी विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डाॕ आलोक जत्राटकर यांचा समावेश आहे. पुण्याच्या रिडिफाईन काॕन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी याची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे.
या लोकार्पण प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रशासन गणेश रामदासी आणि माहिती संचालक गोविंद अहंकारी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सचिव तथा महासंचालक डाॕ दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
या लोकार्पण सोहळ्यानंतर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या https://twitter.com/MahaGovtMic मराठी ट्वीटर हँडलवर, https://twitter.com/MahaMicHindi या हिंदी ट्विटर हँडलवर, https://twitter.com/micnewdelhi इंग्रजी ट्विटर हँडलवर, https://www.facebook.com/MICNEWDELHI या फेसबुक प्रोफाईलवर, https://www.facebook.com/micnewdelhiPR/ या फेसबुक पेजवर, https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=shareफेसबुक मीडिया ग्रुपवर, https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या यू ट्यूब चॕनेलवरुन प्रसारित करण्यात आला
*"माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाविषयी*
माणगाव परिषद ही देशाच्या राजकीय, सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. परिषदेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रारंभीच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे माणगाव परिषद.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने कागल संस्थानातील माणगाव येथे दोन दिवस ही परिषद पार पडली.
शाहू महाराज यांनी जाहीररीत्या डॉ आंबेडकर यांना नेता म्हणून संबोधणे, ही मोठी सामाजिक घटना होती.
या परिषदेच्या संपूर्ण आयोजनासाठी जो खर्च आला, तो अप्पा दादागोंडा पाटील यांनी केला. त्यांच्या या पुढाकारामुळे चिडून जाऊन जातपंचायतीने त्यांना सात वर्षे वाळीत टाकले होते. शिवाय ही परिषद होऊ नये, यासाठी सनातन्यांनी प्रयत्न केले. हा निव्वळ सभा-समारंभ नसून, एका व्यापक लढ्याची सुरुवात होती.
माणगाव परिषदेला उपस्थित राहून शाहू महाराजांनी सविस्तर भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी शोधून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी देऊन अज्ञानी लोकांना फसवतात.’’
बाबासाहेबांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
‘आंबेडकर पर्वा’चा प्रारंभ कशा रीतीने होत होता, याची चुणूक माणगाव परिषदेने दाखविली.

No comments:
Post a Comment