अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद, लातूर विभागातील प्रसिध्दी प्रमुखांच्या निवडी जाहीर
बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रचंड सोळंके यांची निवड
बीड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडयातील औरंगाबाद आणि लातूर अशा दोन्ही विभागातील जिल्हा प्रसिध्दी प़मुखांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून बीड जिल्हा प्रशिद्धी प्रमुख म्हणून बीडनेता चे संपादक प्रचंड सोळंके यांची निवड करण्यन्यात आली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद व लातूर विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या नेमणुका करण्यातआल्या कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी सदरच्या निवडी जाहीर केल्या आहेत.राज्य प्रशिध्दी प्रमुख अनिल महाजन, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, प्रमोद माने, विभागीय सचिव प्रकाश कांबळे आणि विशाल साळुंखे यांनी केलेल्या शिफारशीं नुसार ही नावं परिषदेनं नक्की केली आहेत. एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवनियुक्त प्रसिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रचंड सोळंके यांच्या निवडी चे जेष्ठ संपादक राजेंद्र आगवान, नरेंद्रजी कांकरिया,दिलीपराव खिस्ती, राजेंद्र होळकर शेख तय्यब,साहस अदोडे,परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, दत्तात्रय आंबेकर,विलास डोळसे, शेख मज्जीद, व मित्र परिवाराने निवडीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment