Monday, June 28, 2021

पात्र शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा

पात्र शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

अन्नधान्याचे वाटप माहे जुन 2021 या महिन्यात एपीएल, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रथम मागणी करणाऱ्यास प्राथम्याने या तत्वानूसार करावयाचे असल्याने पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा यांनी केले आहे.
            जिल्ह्यातील शासकीय गोदामांध्ये तसेच रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या गहु व तांदूळ या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत  तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ठ न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतीमाह, प्रती व्यक्ती 1 किलो गहु व 1 किलो तांदुळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य जुन 2021 करीता सवलतीने अनुक्रमे 8 रुपये व 12 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे. असेही कळविण्यात आले आहे

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            मंगळवार दि.29 जून 2021 रोजी नांदेड येथून सकाळी 10.30 वाजता त्रिधारा तिर्थक्षेत्र-उखळद पिंपरी देशमुख प्रजिमा 14 कि.मी.ची सुधारणा करणे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-त्रिधारा तिर्थक्षेत्र ता.जि.परभणी). सकाळी 11 वाजता सावली विश्रामगृहाच्या विस्तारीकरण या कामाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – सावली विश्रामगृह, परभणी). सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समवेत आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). दुपारी 12.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टाईप 1, 2, 3 आणि 4 निवासी इमारत बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (शनिवार बाजार, परभणी). दुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता परभणी व पाथरी मतदारसंघ कार्यकर्त्यांची आढावा बैठक (स्थळ- राजयोग मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी). सोयीनूसार परभणी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशात आज सोमवारपासून अटी व शर्तीवर शिथीलता जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशात आज सोमवारपासून अटी व शर्तीवर शिथीलता
जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश
   
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8 टक्के असुन ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी 16 टक्के इतकी आहे. या परिस्थितीचा विचार करून परभणी जिल्ह्याचा शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. यासंदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणांशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही.  जिल्ह्यात दि.7 जून 2021 रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे विविध आस्थापना/संस्था यांना अटी व शर्तीवर सूट राहील.

1) अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
2) अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा
सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.
3) मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील.
4) रेस्टॉरंटस- सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत 50 % क्षमतेवर आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा / घेवून जाणेसाठी आणि घरपोहोच सेवा सुरु राहतील.
5) सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 पर्यंत
6) खाजगी आस्थापना / कार्यालये
सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत आणि शनिवार व रविवार बंद राहतील.
7) कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.
8) खेळ- मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 05.00 वा. ते सकाळी 09.00 वा. व संध्‍याकाळी 06.00 ते 09.00 वाजे पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील.
9) सामाजिक/सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम 
50 % आसनक्षमतेवर सुरू राहतील.
10) लग्नसमारंभ -जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत (पूर्व परवानगीने) 
11) अंत्ययात्रा, अंतविधीला जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थिती.
12) बैठका / निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा
50 % क्षमतेसह.
13) बांधकाम- ज्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशी बांधकामे दुपारी 04.00 वाजे पर्यंत सुरु राहतील.
14) कृषि व कृषि पुरक सेवा
आठवडयाचे सर्व दिवस दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. 
15) ई कॉमर्स – वस्तू व सेवा
नियमितपणे पूर्व वेळ (कोविड नियमांचे पालन करुन)
16) जमावबंदी / संचारबंदी
सायंकाळी 05.00 ते सकाळी 06.00 वाजे पर्यंत 
17) व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स 
50% क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पुर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करणेच्या अटीवर सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील.
18) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)
50% क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.)
19) माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील.
20) खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास
नियमीत सुरु राहतील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. 
21) उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह.
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)
22) उत्पादक घटक –१. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे  घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणार घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)
23)उत्पादन  घटक - इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक या मध्ये अंतभूत नसणारे सर्व उत्पादन घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सर्व राहणेची ठिकाणी सोय असलेली किंवा कामाच्या ठिकाणा जवळच स्वतंत्र कॉलनी मध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी, बाहेरुन येणाऱ्या जास्तीत जास्त 50% व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्यासह राहतील.

*सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना*

     अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 5.00 वाजेनंतर हालचाल, प्रवास करण्यास परवानगी असणार नाही.
   जेव्हा जेव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.
*अत्यावश्यक सेवामध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल* – 
1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषांगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. 
2) शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप.
3) वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
4) विमानचलन आणि संबंधीत सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभालदुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
5) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने तसेच दिनांक 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सुन कालावधी मध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने. 
6) जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल.
7) शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.  
8) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
9)  विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा. 
10)  स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे. 
11)  स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . 
12)  रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था.
13)  दुरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी.
14)  मालाची / वस्तुंची वाहतुक. 
15) पाणीपुरवठा विषयक सेवा. 
16) शेती संबंधीत सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे की, बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज. 
17)  सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात. 
18)  ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत )
19)  मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. 
20) पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. 
21)  सर्व प्रकारच्या कार्गो सेवा.
22)  डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित.  
23) शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा.  
24(  विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा. 
25) एटीएम
26) पोस्टल सेवा. 
27)  बंदरे आणि त्या अनुषांगीक सेवा. 
28) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
29)  अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. 
30) पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तीक व संस्थांसाठी  वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.
31)  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.

*सुट देण्यात आलेल्या बाबी, आस्थापना पुढीलप्रमाणे आहेत.*
a)  केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था.  
b)     सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम. 
c)     अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये. 
d)     विमा आणि मेडीक्लेम कार्यालये. 
e)     औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. 
f)     रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार 
i)      सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
j)      सर्व मायक्रो फायनान्स संस्था
k)      मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता, वकिल यांची  कार्यालये सुरु राहतील.

     हा आदेश दि. 7 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. उपरोक्त प्रमाणे सुट देण्यात आलेल्या बाबी / आस्थापना / नागरिक यांनी शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले कोविड-19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती, आस्थापना, घटक या कोविड-19 वर्तणुकीचे, शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापुर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोविड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल.
 उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Saturday, June 26, 2021

शाहू महाराज- डॉ बाबासाहेबांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक "माणगाव परिषद पहा लघुपटातुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

शाहू महाराज- डॉ बाबासाहेबांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक "माणगाव परिषद पहा लघुपटातुन
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे आॕनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.*
      या आॕनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार,  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, श्री श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य वित्त आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऊर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विधीमंडळ सदस्य आदी आॕनलाईन सहभागी झाले होते.

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षपूर्ती निमित्ताने हा लघुपट प्रतिकात्मक स्वरुपात तयार केला आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी या लघूपटाच्या निर्मितीत पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती बनविण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास तज्ज्ञ डाॕ जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डाॕ अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागप्रमुख डाॕ निशा मुडे, शिवाजी विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डाॕ आलोक जत्राटकर यांचा समावेश आहे. पुण्याच्या रिडिफाईन काॕन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी याची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे.

या लोकार्पण प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रशासन गणेश रामदासी आणि माहिती संचालक गोविंद अहंकारी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सचिव तथा महासंचालक डाॕ दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री  कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
या लोकार्पण सोहळ्यानंतर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीच्या https://twitter.com/MahaGovtMic मराठी ट्वीटर हँडलवर, https://twitter.com/MahaMicHindi या हिंदी ट्विटर हँडलवर, https://twitter.com/micnewdelhi इंग्रजी ट्विटर हँडलवर,  https://www.facebook.com/MICNEWDELHI या फेसबुक प्रोफाईलवर,  https://www.facebook.com/micnewdelhiPR/ या फेसबुक पेजवर, https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=shareफेसबुक मीडिया ग्रुपवर,  https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या यू ट्यूब चॕनेलवरुन प्रसारित करण्यात आला

*"माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाविषयी*
 
माणगाव परिषद ही देशाच्या राजकीय, सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. परिषदेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रारंभीच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे माणगाव परिषद. 
राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने कागल संस्थानातील माणगाव येथे दोन दिवस ही परिषद पार पडली. 
शाहू महाराज यांनी जाहीररीत्या डॉ आंबेडकर यांना नेता म्हणून संबोधणे, ही मोठी सामाजिक घटना होती. 
या परिषदेच्या संपूर्ण आयोजनासाठी जो खर्च आला, तो अप्पा दादागोंडा पाटील यांनी केला. त्यांच्या या पुढाकारामुळे चिडून जाऊन जातपंचायतीने त्यांना सात वर्षे वाळीत टाकले होते. शिवाय ही परिषद होऊ नये, यासाठी सनातन्यांनी प्रयत्न केले. हा निव्वळ सभा-समारंभ नसून, एका व्यापक लढ्याची सुरुवात होती.
माणगाव परिषदेला उपस्थित राहून शाहू महाराजांनी सविस्तर भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी शोधून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी देऊन अज्ञानी लोकांना फसवतात.’’ 
बाबासाहेबांबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले.
‘आंबेडकर पर्वा’चा प्रारंभ कशा रीतीने होत होता, याची चुणूक माणगाव परिषदेने दाखविली.

Friday, June 25, 2021

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न नागरिकांनी शांततेने व सलोख्याने रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नागरिकांनी शांततेने व सलोख्याने रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराची प्रकरणे वर्गीकृत करुन दाखल झालेल्या प्रकरणांचे  विश्लेषण करणे आवश्यक आहे.  तसेच यासाठी तज्ञ व नामवंत मंडळीच्या मार्गदर्शनाखाली याबाबत ऑनलाईन शिबीराचे आयोजन करुन नागरिकांनी शांततेने व सलोख्याने  रहावे यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.25 जून 2021 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाट, प्रल्हाद अवचार यांच्यासह समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, समाज कल्याण निरीक्षक आर.पी.काळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की,जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच या कामात हयगय करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखली मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत एकुण 41 गुन्हे दाखल झाले असून सद्या 34 गुन्हे पोलीस तपासावर आहेत तरी या 34 प्रकरणात तात्काळ चार्जशिट दाखल करुन घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे आदिचा आढावा घेवून योग्य त्या सुचना करण्यात आल्या.  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत एकुण 41 गुन्हे दाखल  झाले असून त्यापैकी 34 गुन्हे पोलिस तपासावर आहेत. पोलीस तपासावर असलेल्या एकुण 76 प्रकरणात मा.उच्च न्यायालयाची स्थगिती 3, जात प्रमाणपत्र हस्तगत करणे 7, वैद्यकिय प्रमाणपत्र हस्तगत करणे 7 आणि इतर अधिक पुरावा घेणे कामी व आरोपी अटक करणे 59 अशी संख्या आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी यावेळी दिली. 
बैठकीत अशासकीय समिती सदस्य श्रिधर देशमुख, प्रल्हाद अवचार व प्रभाकर सिरसाट यांनी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांचा शाल व श्रीफळ देवून समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी जेव्हा बुद्ध विहारात मुक्काम करतात !

जिल्हाधिकारी जेव्हा बुद्ध विहारात मुक्काम करतात !

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्ह्यातील पाथरी हा बीड जिल्ह्याच्या काठावर असलेला तालुका. या तालुक्यात अवघी 1650 लोकसंख्या असलेली खेर्डा हे खेडे. पिढ्यानपिढ्यापासून या गावात असलेल्या सामाजिक एकोप्याला, एकात्मतेला आणि सामाजिक शांततेला छोटीशी अडचण निर्माण झाली.कारण तसे साधे होते.येथील अनुसूचित जाती वसतीत असलेल्या सांडपाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोअरच्या विद्युत जोडणीबाबत निवडक दोघात मतमतांतरे झाली. दोघांतील हा तणाव चारचौघात झाला.वादाची ठिणगी पडली.तसे पाहिले तर हा वाद 1650 लोकसंख्या असलेल्या शांतताप्रिय एका छोट्याशा गावातील गल्ली पर्यंतच मर्यादित होता. या वादात तोल सुटलेल्या एका व्यक्तीने मारहाण करण्यापर्यंतचा विषय मोबाईल वरून चित्रीकरणाद्वारे सोशल मीडियावर आला.सोशल मीडियाद्वारे या विषयाला वेगळे वळण लागल्याने पिढ्यानपिढ्या जपलेल्या गावातील सामाजिक सलोख्याला धक्का बसला. हा वाद फार मोठा नव्हता, परंतु ज्या विषयावरून वाद झाला तो विषय गंभीर होता.स्वाभाविकच जिल्हा प्रशासनापुढे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाला. हा विषय अत्यंत कुशलतेने हाताळून वाद जास्त वाढू न देण्याची जबाबदारी प्रशासनावर आली. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आपले सर्व प्रशासकिय अनुभव पणाला लावत प्रकरणाला हाताळले.
गावातील दुभंगलेली मने कायदेशीर बळाचा अधिक वापर न करता परस्पर सौहार्दातून कशी सांधली जातील यावर त्यांनी भर दिला. एका बाजूला कोरोनाचे आव्हान, ऑक्सीजन पूर्ततेबाबत आव्हान, बाधित रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याचे आव्हान ही सारी प्रशासनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी खेर्डा गावातील कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली.25 एप्रिलपासून अवघ्या 2 हजार लिटर टाकी असलेल्या बोअरच्या वादातून सुरू झालेला विषय तसा गंभीर होता. 16 मेपर्यंत गावातील तणाव कोणत्याही क्षणी अधिक ताणून तुटू शकेल अशीच परिस्थिती होती. परंतु प्रत्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी हे गावातील अन्यायग्रस्त कुटुंबाच्या लोकांना विश्वास देतात त्यांना न्यायाची हमी देतात ही कृती अनुसूचित जाती वसतीतील लोकांसाठी अधिक महत्त्वाची होती.हे प्रकरण हाताळताना आश्वासनाच्या पलीकडे व्यक्ती म्हणून भावना व संवेदना जपत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना खेर्डा गावच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचालायला वेळ लागला नाही.
अनुसूचित जाती वसतीतील लोकांनी आपली जबाबदारी व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक सहभाग दिला. दुसऱ्या बाजूला इतर वर्गातील बांधवांनाही विश्वासात घेऊन ज्यांच्याकडून चूक झाली आहे त्याविरुद्ध त्यांनी कायद्याचा बडगा उगारला. ज्याच्या कृतीने गावातील सामाजिक शांततेला आव्हान निर्माण झाले आहे, त्याला पाठीशी न घालण्याचा निर्णय व विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. गावातील लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद लक्षात घेऊन दि. 12 व 14 जून रोजी सलग शांतता समितीच्या बैठका घेऊन यात तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या बाजूला विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनी गावातील शांतता व सुव्यवस्थेला प्राधान्य देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. एव्हाना या सर्व प्रयत्नातून दोन्ही समाजातील लोकांना सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे महत्त्व पटल्याने लोकांनी गावात घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष करून जबाबदार नागरिकाची भूमिका बजावली.21 जूनला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सामाजिक एकोपा अधिक भक्कम करण्यासाठी खेर्डा गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावात गेल्यावर संपूर्ण गाव प्रत्यक्ष पायी फिरून त्यांनी गावातील सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता याचा आढावा घेत अनुसूचित जाती वसतीतील समाज मंदिर गाठले. दोन्ही समाजातील लोकांना त्यांनी एकत्र बोलावून संवाद साधला, हा संवाद रात्री उशिरापर्यंत चालला.1650 लोकसंख्या असलेल्या गावातील जवळपास 250 लोक कोरोनाच्या मर्यादा पाळत एकमेकांशी बोलत राहिले, हे बोलणे पुन्हा परस्परात विश्वास निर्माण करणारे होते. हा परस्पर विश्वास सामूहिक स्नेह भोजनापर्यंत कसा गेला हे कुणाच्या लक्षातही आले नाही.एका छोट्याशा गावातील दोन समाजात कटुता निर्माण होऊन फूट पाडणारा वनवा हा इतर गावागावात पोहोचण्याआधी गावकऱ्यांनी शांत करून इतर गावांना आपल्या चुका मान्य करत शांतीचा संदेश दिला.गावातील एकोप्यासाठी 25 एप्रिलपासून दक्षता घेणाऱ्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिनांक 21 जूनच्या बुद्धविहारात मुक्काम करून प्रशासनातील संवेदनेची एक वेगळीच प्रचिती दिली.बिनविरोध ग्रामपंचायत असलेल्या या गावातील विकासासाठी सर्व गावकऱ्यांनी कटिबद्ध होत जिल्हाधिकाऱ्यांना पुढे काही मागण्या ठेवल्या. यात सिमेंट नाला बांध, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, आरो प्लांट, नादुरुस्त सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती, पाणी पुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, शाळा गावातील महसूल व प्रलंबित व्यवहार या सर्व विषयावर गावकऱ्यांशी चर्चा करीत विकासाचा एक नवा मार्ग ठेवत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर समाज मंदिरातून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता परतीला निघाले. अर्थात त्यांना निरोप देण्यासाठी सारे गाव एकोप्याने एकत्र झाले होते.

- विनोद रापतवार
जिल्हा माहिती अधिकारी,        

Wednesday, June 23, 2021

आयसर परभणीच्या ऊर्जित भावसार यास सुवर्णपदक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा निकाल जाहीर

आयसर परभणीच्या ऊर्जित भावसार यास सुवर्णपदक
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा निकाल जाहीर

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे, जी. एम. आर.टी. पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात आयसर परभणीच्या ऊर्जित प्रसन्न भावसार याने सादर केलेल्या ‘स्मार्ट सोलर वॉटर सेविंग वॉल’ या मॉडेलने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात सात राज्यातील 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञांनी या सर्व मॉडेल्सचे ऑनलाईन परीक्षण करून नुकताच निकाल जाहीर केला आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटांमध्ये ऊर्जित प्रसन्न भावसार याने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या या संशोधनाचे पेटंट देखील रजिस्टर झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल  सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

आयसर परभणीच्या ऊर्जित भावसार यास सुवर्णपदक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा निकाल जाहीर

आयसर परभणीच्या ऊर्जित भावसार यास सुवर्णपदक
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा निकाल जाहीर

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे, जी. एम. आर.टी. पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात आयसर परभणीच्या ऊर्जित प्रसन्न भावसार याने सादर केलेल्या ‘स्मार्ट सोलर वॉटर सेविंग वॉल’ या मॉडेलने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात सात राज्यातील 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञांनी या सर्व मॉडेल्सचे ऑनलाईन परीक्षण करून नुकताच निकाल जाहीर केला आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटांमध्ये ऊर्जित प्रसन्न भावसार याने प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या या संशोधनाचे पेटंट देखील रजिस्टर झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अडचणी सोडविण्याची मागणी

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अडचणी सोडविण्याची मागणी

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच या कार्यालयांतर्गत व पत्रकारांसंबंधित अडी-अडचणी तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
      जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना बुधवारी (दि.23जून) पत्रकारांनी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे जिल्हा माहिती कार्यालयात मागील काही दिवसापासून जिल्हयातील पत्रकारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, हे निदर्शनास आणून दिले. माहिती कार्यालयातून कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. कार्यालयात वारंवार तोंडी तक्रारी व सूचना देऊनही अडचणी दूर होत नाहीत. मुळात म्हणजे कार्यालयात गेल्या कित्येक दिवसापासून जबाबदार अधिकारी नसल्याने तथा प्रभारी अधिकारी नियमीत उपस्थित नसल्याने अडचणी सुटत तर नाहीत, उलट समस्या वाढत आहेत.
      या पार्श्‍वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा कार्यालयात माहिती अधिकारी वर्ग 2 नसल्याने दररोजच्या प्रेसनोट निघत नाहीत. त्यामुळे माहिती अधिकार्‍यांची पदे भरण्यात यावी.  जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 उपलब्ध न झाल्यास नेमणुक केलेल्या प्रभारी अधिकार्‍यास आठवडयातुन किमान तीन दिवस तरी कार्यालयात हजर राहण्यास अनिवार्य करावे. दैनंदिन प्रसिध्दीपत्रके काढण्यात यावेत. अनेक महत्त्वाचे अधिकारी, मंत्रीगण यांचे दौरे, त्यांच्या प्रेस नोट काढण्यात येत नाहीत त्याबद्दल नियमितपणे माहिती देण्यात यावी. प्रेसनोट दररोज काढणे सक्तीचे करावे. जिल्हयातील पत्रकारांचे अधिस्विकृती प्रकरण, पेंशन प्रस्ताव, आरोग्य विषयक प्रस्ताव नियमित अधिकारी उपस्थित नसल्याने ही प्रकरणे प्रलंबीत राहत असल्याने वेळेत त्रुटी पुर्तता होत नसल्याने पात्र असुनही पत्रकार लाभापासून वंचित राहत आहेत, असे स्पष्ट करीत वरील अडचणी व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी या नात्याने आपण लक्ष विशेष लक्ष घालुन तातडीने जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.
      यावेळी सुरेश नाईकवाडे, सुरज कदम, विठ्ठलराव वडकुते, प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, शेख इफ्तेकार, नजीब सिद्दीकी, सय्यद अझहर, मोईन खान, प्रवीण देशपांडे, महेमुद खान, सुधाकर श्रीखंडे, राजू कर्डीले, हरिभाऊ सुतारे, राहुल धबाले, बाळू घिके, श्रीकांत देशमुख, मंचक खंदारे, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.
      दरम्यान, जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी गुरुवारी (दि.24 जून) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक बोलावली आहे.

Saturday, June 19, 2021

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा गावात मुक्कामी ; ग्रामस्थांसोबत हितगूज

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा गावात मुक्कामी ; ग्रामस्थांसोबत हितगूज

पाथरी / सोनपेठ (दर्शन) : -

पाथरी तालुक्यातील खेर्डा या गावी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता भेट दिली. तेथील ग्रामस्थांबरोबर हितगूज केले. त्या गावच्या समस्या, अडीअडचणी ऐकल्या. संबंधितांना कठोर शब्दात सूचना दिल्या. पाठोपाठ त्या गावात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
      काही दिवसांपूर्वी खेर्डा या गावात हातपंपावरील पाण्यावरुन दोन समाजात वाद उद्भवला होता. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले होते. त्यानंतर तणाव निवळला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या गावास दुपारी चार वाजता भेट दिली. यावेळी  तहसीलदार श्रीकांत निळे, पंचायत समितीचे सभापती सदाशिव थोरात, गटशिक्षणाधिकारी सुहास कारेगावे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी महेश माळवदकर तसेच पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, मंडळ अधिकारी शिवाजी भरकड, उपसरपंच विष्णू सिताफळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी समावेत होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांबरोबर सुसंवाद साधला. एकोप्याने राहण्याचा, परस्परात सामंजस्य राखण्याच्या सूचना दिल्या. आजपर्यंत सर्व समाज एकमेकांच्या सुख-दुःखात, पाठीशी भक्कमपणे उभे राहीले आहेत. भविष्यातसुध्दा मिळूनमिसळून एकोप्याने राहीले पाहिजे. झालेले प्रकार चुकीचे आहे. संबंधितांना न्यायपालिका योग्य ते शासन करील. पोलिस यंत्रणा कारवाई करीत आहेत. परंतु, ग्रामस्थांनी सामाजिक एकता व शांताता राखली पाहिजे, हीच आपली संस्कृती आहे. ग्रामस्थ ती कायम ठेवतीलच, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनीही सकारात्मक असा प्रतिसाद, उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया नोंदविल्या. पाठोपाठ गावच्या समस्या मांडल्या. विशेषतः पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, पिककर्ज यासह अडीअडचणी मांडल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना संपर्क साधून दोन दिवसात वीजेचे पोल उभारुन पुरवठा सुरळीत करावा, असा आदेश दिला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निश्‍चितच सोडविला जाईल, असा विश्‍वास दिला. पीक कर्जासंदर्भात सर्व अर्जांची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच अन्य प्रश्‍नांबाबतही तपशीलवार चर्चा केली. प्रशासन आपल्या पाठीशी उभे राहील, असा विश्‍वासही दिला. यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी गावातच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला. व सायंकाळी उशीरापर्यंत ग्रामस्थांबरोबर हितगुज सुरु केले. त्यामुळे ग्रामस्था अक्षरशः भाराहून गेले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद, लातूर विभागातील प्रसिध्दी प्रमुखांच्या निवडी जाहीर बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रचंड सोळंके यांची निवड

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद, लातूर विभागातील प्रसिध्दी प्रमुखांच्या निवडी जाहीर
बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रचंड सोळंके यांची निवड 

बीड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  मराठवाडयातील औरंगाबाद आणि लातूर अशा दोन्ही विभागातील जिल्हा प्रसिध्दी प़मुखांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून बीड जिल्हा प्रशिद्धी प्रमुख म्हणून बीडनेता चे संपादक प्रचंड सोळंके यांची निवड करण्यन्यात आली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद व लातूर विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या नेमणुका करण्यातआल्या कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी सदरच्या निवडी जाहीर केल्या आहेत.राज्य प्रशिध्दी प्रमुख अनिल महाजन, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, प्रमोद माने, विभागीय सचिव प्रकाश कांबळे आणि विशाल साळुंखे यांनी केलेल्या शिफारशीं नुसार ही नावं परिषदेनं नक्की केली आहेत. एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवनियुक्त प्रसिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रचंड सोळंके यांच्या निवडी चे जेष्ठ संपादक राजेंद्र आगवान, नरेंद्रजी कांकरिया,दिलीपराव खिस्ती, राजेंद्र होळकर शेख तय्यब,साहस अदोडे,परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, दत्तात्रय आंबेकर,विलास डोळसे, शेख मज्जीद, व मित्र परिवाराने निवडीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Thursday, June 17, 2021

पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून मान्यता मिळावी;पत्रकारांचे शरद पवारांना साकडे.....

पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून मान्यता मिळावी;पत्रकारांचे शरद पवारांना साकडे.....

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन)

मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि.17 जुन 2021 गुरुवार रोजी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली.. राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखील सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.. पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्याची सुविधा आदि विषय देखील शिष्टमंडळाने पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली. "पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू" असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात एस.एम.देशमुख,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर,टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरजसिंह ठाकूर, आदि सहभागी झाले होते.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे दीपक कैतके उपस्थित होते.
पत्रकारांच्या वरील संघटनांनी यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे. अन्न
यावेळी एस एम देशमूख यांनी संघर्षाची पंच्याहत्तरी हे मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे तसेच कथा एका संघर्षाची ही दोन पुस्तके शरद पवार यांना भेट दिली.

Monday, June 14, 2021

नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सोनपेठ येथे उद्घाटन.....
सोनपेठ अपडेट.....
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्या.भारत सरकार (नाफेड) चे शासकीय खरेदी केंद्र स्वप्नभूमी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था राठोड ट्रेडिंग कंपनी बादुर शेळगाव रोड सोनपेठ येथे दि.14 जुन 2021 सोमवार रोजी नगरसेवक श्रीकांत विटेकर, युवा नेते सुमित पवार, सुशांत पवार, राजुभाई सौदागर, श्रीकांत देशमुख, 

Tuesday, June 8, 2021

एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीने दिले जिल्हा रुग्णालयास एक हजार लिटरचे आरओ प्लॅन्ट

एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीने दिले जिल्हा रुग्णालयास एक हजार लिटरचे आरओ प्लॅन्ट
 
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चुडावा गावचे भुमी पुत्र  श्री. कैलास देसाई यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास एक हजार लिटर क्षमतेचे आरओ प्लॅन्ट भेट दिले आहे.त्याचे सोमवार दि.7 जून 2021 रोजी उदघाटन करण्यात आले.

 चुडावा येथील  कैलास देसाई हे औरंगाबाद येथील एंड्रेस अँन्ड हाऊजर कंपनीचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी कोरोना काळात सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर विविध ग्रामीण भागात व शासकीय रूग्णालयात दिले असून, विविध ठिकाणी बाय पॅप व्हेंटिलेटर देखील दिले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शुध्द पाण्यासाठी जलशुध्दीकरण यंत्र देण्याची बाब पुढे आली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ एक हजार लिटर पाणी क्षमतेचे आरओ प्लॅन्ट उपलब्ध केले. सोमवारी रितसर उदघाटन करण्यात आले. यावेळी श्री कैलास देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.प्रकाश डाके,  डॉ पवन चांडक,  राजेश्वर वासलवार, विनोद शेंडगे, डॉ यादव, गोविंद देसाई, अरुण पवळे, इश्वर मठमती उपस्थित होते.

-*-*-*-*-

Monday, June 7, 2021

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन- 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी  ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी दि.1 जून 2021 पासून  www.mhrd.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरु झाली  असून इच्छुक शिक्षकांनी रविवार दि.20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले आहे.
         राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक, पात्र मुख्यापक ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र असतील. मानव विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन 2017 पासून मार्गदर्शक सुचना सुधारित केल्या असून ऑनलाईन अर्ज  स्विकारण्यासाठी वेबपोर्टल विकसित केले आहे. असेही कळविण्यात आले आहे.

Sunday, June 6, 2021

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्या जवळ विविध डाळी आणि कडधान्या द्वारे साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिव सिंहासन प्रबोधन परिषद तर्फे पहाटे सकाळी ०६.०० वाजता करण्यात आले.ही प्रतिमा डी सेवन आर्ट चे प्रमोद उबाळे, मिथुन आडे, ज्ञानेश्वर सांगळे, विठ्ल जगाडे व संपूर्ण टीम ने ८ तासाच्या अथक परिश्रमाने साकारली. या वेळी शिव सिंहासन प्रबोधन परिषद परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशात सोमवारपासून अटी व शर्तीवर शिथीलता जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशात सोमवारपासून अटी व शर्तीवर शिथीलता
जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश
     
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8 टक्के असुन ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी 16 टक्के इतकी आहे. या परिस्थितीचा विचार करून परभणी जिल्ह्याचा शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. यासंदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणांशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही.  जिल्ह्यात दि.7 जून 2021 रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे विविध आस्थापना/संस्था यांना अटी व शर्तीवर सूट राहील.

1) अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
2) अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा
सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.
3) मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील.
4) रेस्टॉरंटस- सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत 50 % क्षमतेवर आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा / घेवून जाणेसाठी आणि घरपोहोच सेवा सुरु राहतील.
5) सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 पर्यंत
6) खाजगी आस्थापना / कार्यालये
सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत आणि शनिवार व रविवार बंद राहतील.
7) कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.
8) खेळ- मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 05.00 वा. ते सकाळी 09.00 वा. व संध्‍याकाळी 06.00 ते 09.00 वाजे पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील.
9) सामाजिक/सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम 
50 % आसनक्षमतेवर सुरू राहतील.
10) लग्नसमारंभ -जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत (पूर्व परवानगीने) 
11) अंत्ययात्रा, अंतविधीला जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थिती.
12) बैठका / निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा
50 % क्षमतेसह.
13) बांधकाम- ज्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशी बांधकामे दुपारी 04.00 वाजे पर्यंत सुरु राहतील.
14) कृषि व कृषि पुरक सेवा
आठवडयाचे सर्व दिवस दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. 
15) ई कॉमर्स – वस्तू व सेवा
नियमितपणे पूर्व वेळ (कोविड नियमांचे पालन करुन)
16) जमावबंदी / संचारबंदी
सायंकाळी 05.00 ते सकाळी 06.00 वाजे पर्यंत 
17) व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स 
50% क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पुर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करणेच्या अटीवर सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील.
18) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)
50% क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.)
19) माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील.
20) खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास
नियमीत सुरु राहतील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. 
21) उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह.
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)
22) उत्पादक घटक –१. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे  घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणार घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)
23)उत्पादन  घटक - इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक या मध्ये अंतभूत नसणारे सर्व उत्पादन घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सर्व राहणेची ठिकाणी सोय असलेली किंवा कामाच्या ठिकाणा जवळच स्वतंत्र कॉलनी मध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी, बाहेरुन येणाऱ्या जास्तीत जास्त 50% व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्यासह राहतील.

*सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना*

     अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 5.00 वाजेनंतर हालचाल, प्रवास करण्यास परवानगी असणार नाही.
   जेव्हा जेव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.
*अत्यावश्यक सेवामध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल* – 
1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषांगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. 
2) शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप.
3) वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
4) विमानचलन आणि संबंधीत सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभालदुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
5) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने तसेच दिनांक 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सुन कालावधी मध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने. 
6) जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल.
7) शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.  
8) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
9) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा. 
10) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे. 
11) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . 
12) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था.
13) दुरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी.
14) मालाची / वस्तुंची वाहतुक. 
15) पाणीपुरवठा विषयक सेवा. 
16) शेती संबंधीत सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे की, बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज. 
17) सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात. 
18) ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत )
19) मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. 
20) पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. 
21) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा.
22) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित.  
23) शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा.  
24( विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा. 
25) एटीएम
26) पोस्टल सेवा. 
27) बंदरे आणि त्या अनुषांगीक सेवा. 
28) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
29) अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. 
30) पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तीक व संस्थांसाठी  वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.
31) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.

*सुट देण्यात आलेल्या बाबी, आस्थापना पुढीलप्रमाणे आहेत.*
a) केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था.  
b)     सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम. 
c)     अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये. 
d)     विमा आणि मेडीक्लेम कार्यालये. 
e)     औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. 
f)     रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार 
i)      सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
j)      सर्व मायक्रो फायनान्स संस्था
k)      मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता, वकिल यांची  कार्यालये सुरु राहतील.

    हा आदेश दि. 7 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. उपरोक्त प्रमाणे सुट देण्यात आलेल्या बाबी / आस्थापना / नागरिक यांनी शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले कोविड-19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती, आस्थापना, घटक या कोविड-19 वर्तणुकीचे, शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापुर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोविड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात एसटीच्या बसेस लालपरी उद्या सोमवार पासून रस्त्यावर धावणार...

परभणी जिल्ह्यात एसटीच्या बसेस लालपरी उद्या सोमवार पासून रस्त्यावर धावणार...

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागा अंतर्गत सातही आगारातील जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरील बससेवा सोमवारपासून सुरु होणार, असे स्पष्ट संकेत आहेत.
     परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. त्यातून जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरच्या बसेसना परवानगी बहाल करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेवू, असे स्पष्ट केले. या दरम्यान, अन्लॉकच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्हाही समाविष्ट असल्याने त्यातूनही बहुतांशी निर्बंध हटविले जाणार असल्याने परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. दरम्यान, सोमवारपासून एसटीच्या बसेस धावू लागतील, अशी अपेक्षा विभाग नियंत्रण मुक्तेश्‍वर जोशी यांनी व्यक्त केली.
     अन्य जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्यातीलही एसटी बस लाल परी रस्त्यावर सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा सुर सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत होती. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या सव्वा वर्षांत एसटीच्या बससेवेवर वारंवार निर्बंध घातले. विशेषतः लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाने तब्बल दीड-दोन महिने बस सेवा ठप्प केली. दुसर्‍या टप्प्यातही 15 मार्च पासून एसटी बससेवा पूर्णतः ठप्प आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी 15 दिवस आधी म्हणजे 1 मार्च पासून विदर्भातील बससेवा पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत व जिल्हा बाहेरच्याही एसटी बसेस आगारात जागेवरच उभ्या राहील्या.
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आधीच प्रवाशांच्या संख्येत प्रचंड अशी घट, त्यामुळे उत्पन्नातही घट एसटीचा परभणी विभाग सोसत असतांना जिल्हा प्रशासनाने दुसर्‍या टप्प्यातसुध्दा जिल्हाबाहेर व जिल्हांतर्गत बस सेवा पूर्णतः ठप्प ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाने एसटी महामंडळाच्या परभणी विभागास सरासरी दररोज 35 लाख रुपयांचा तडाखा बसला. जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या चार आगारांसह हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत असे तीन अशा एकूण सात आगाराच्या परभणी विभागास दररोज कोट्यवधी रुपयांचा तडाखा बसतो आहे. सोमवारपासून बसेस धावू लागल्यानंतरसुध्दा परिवहन महामंडळास यातून बाहेर निघण्याकरीता बराच कालावधी लागेल, असे संकेत आहेत.शेवटी एकदाचीच एसटीच्या बसेस लाल परी उद्या सोमवार पासून रस्त्यावर धावणार असे समजते.

Friday, June 4, 2021

मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार

मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार

औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज येथे (दि.04) रोजी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 
यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सुत्रे श्री.राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे दि.31 मे 2021 रोजी हे पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री.हेमराज बागुल यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव पाटील, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यभार स्वीकारल्या नंतर श्री.बागुल यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला.
श्री.बागुल यांनी यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच महासंचालनालयातील लोकराज्य, महान्यूज, वृत्त शाखा आदी विभागात विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे  संचालकपदी सरळ सेवेने थेट निवड करण्यात आलेले ते या विभागातील पहिलेच संचालक आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेतही लक्षणीय योगदान दिले असून त्यासोबत विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमातही ते सक्रीय असतात. 

Thursday, June 3, 2021

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्या समाविष्ट; जिल्हाधिकारी यांच्याआदेशाची प्रतिक्षा

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्या समाविष्ट; जिल्हाधिकारी यांच्याआदेशाची प्रतिक्षा

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -  

अन्लॉकच्या पहिल्या टप्प्याबाबत राज्य सरकारने निर्धारीत केलेल्या निकषांत परभणी जिल्ह्याचाही समावेश होतो आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातूनच परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनचे बहुतांशी नियम शिथील होतील, असे संकेत आहेत.
राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर  घालण्यात आलेल्या निर्बंधात हळूहळू शिथिल होताना दिसत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवलेले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि.03) मुंबईतून दिली.
      राज्य सरकारच्या नियमावलीत पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे बसतात. यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटणार आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेतला गेल्यास या नियमांची अंमलबजावणी शुक्रवार (दि.04) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हधिकार्‍यांच्या आदेशाकडे संपूर्ण जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.
      पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु होतील असे अपेक्षित आहे. त्यात रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के, चित्रपट शुटींगला परवानगी, थिएटर सुरू होतील, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे, ई कॉमर्स सुरू राहिल, जिम, सलून सुरू राहणार, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही, बस 100 टक्के क्षमतेने, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, असे अपेक्षित आहे.

Wednesday, June 2, 2021

देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा परिषद कोविड सेन्टरला भेट; रुग्णांशी साधला संवाद

देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा परिषद कोविड सेन्टरला भेट; रुग्णांशी साधला संवाद

परभणी / सोनपेठ (दर्शन):-

 राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बुधवार (दि.2) रोजी दुपारी सव्वा बारा वाजता जालन्याहून मोटारीने परभणीत दाखल झाले.  जिल्हा परिषद नूतन इमारतीतील कोविड सेंटरला भेट देवून त्यांनी सोयी सुविधांची पाहणी केली. कोविड रुग्णांशी संवादही साधला. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील  सेंटरमधील आयसीयू कक्षातील कोंरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली.  वैद्यकीय उपचार, औषधी तसेच अन्य सुविधाबाबत विचारपूस केली. यावेळी आमदार  मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, तहसीलदार संजय बिरादार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब जाधव आदीजन त्यांच्यासमवेत उपस्थित होते.