कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त......
आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं दि.25 मे 2021 मंगळवार रोजी 82 व्या वर्षी निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला होता.
मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकीक होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या व परिजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाला.

No comments:
Post a Comment