Wednesday, May 5, 2021

कोव्हीशिल्डचा दुसरा डोस लसीकरण केंद्रावर दिला जाणारः जिल्हाधिकारी

कोव्हीशिल्डचा दुसरा डोस लसीकरण केंद्रावर दिला जाणारः जिल्हाधिकारी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

45 वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व मनपाच्या आरोग्य केंद्रावर कोव्हीशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 
जिल्हाकरिता कोव्हीशिल्ड लसीचे 22 हजार डोस केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. या लसीचा वापर प्राधान्याने दि.22 मार्च 2021 च्या अगोदर ज्या नागरिकांनी या लसीचा प्रथम डोस घेतला. त्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे. त्या मध्ये  45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी या लसीचा दुसरा डोस तात्काळ घ्यावा. लसीकरण केंद्रावर आल्यावर प्रथम डोस घेतल्यानंतर आलेला मोबाईलवरील संदेश दाखवून सोबत ओळखपत्र व प्रथम डोसच्या वेळी दिलेला मोबाईल क्रमांक ठेवावा, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment