सकल मानव कल्याणासाठी "सिंध्दातं शिखामणी" अथवा परमरहस्य ग्रंथ पाच दिवसीय पारायण
सोनपेठ (दर्शन) :-
प.पु.ष.ब्र. १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर वीरशैव सोनपेठ मठसंस्थान तर्फे प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी वीरशैव धर्म संस्थापका पैकी श्री श्री श्री १००८ एकोरामाराध्य महास्वामीजी तसेच श्री श्री श्री १००८ जगदगुरु दारुकाचार्य ( मरूळाराध्य) महास्वामीजी तसेच वीरशैव धर्म प्रचारक प्रसारक महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवाचे निमित्याने वीरशैव धर्म ग्रंथ "सिंध्दातं शिखामणी" अथवा संत मन्मथ स्वामी लिखित "परमरहस्य ग्रंथ" पाच दिवसीय पारायण सोहळा वीरशैव भाविकभक्तानी करावे.असे आवाहन सोनपेठकर महाराजांनी केले आहे.कोरोना या महामारीला भारतासह जगातून समाप्त होण्यासाठी प्रत्येक मनुष्याला या महामारी पासुन वाचविण्यासाठी,सकल मानव कल्याणासाठी, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपण आप आपल्या घरी प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरीच वरील ग्रंथाचे पारायण करून दिनांक १३-५-२०२१ आणि १७-५-२०२१ रोजी दुपारी ठिक १२ वा. वरील आराध्याचे प्रतिमापूजन करून आप आपल्या घरी जयंती साजरी करावी असे आवाहन प.पू. सद्गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी केले.
(नोट कृपया कोरोना महामारीमुळे मठात कोणीही न येता आप आपल्या घरीच सुरक्षित वरील पारायण सोहळा संपन्न करावे.)

No comments:
Post a Comment