जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरीच साजरी करावी - परमेश्वर लांडगे
माजलगाव / सोनपेठ (दर्शन) :-
सध्या देशासह राज्यात तसेच मराठवाड्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती तमाम विरशैव समाज बांधवांनी घरीच साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे.
दि. १४ मे २०२१ अक्षय तृतीया दिनी महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती आहे. सध्या संपूर्ण देशासह राज्यात तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात कोरोना महामारी चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती तमाम विरशैव समाज बांधवांनी घरीच साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे व तसेच जयंती साजरी करताना शासनस्तरा वरून दिलेल्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मिरवणूक न काढता एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्सव साजरा करावी दरवर्षी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्रा सह माजलगाव तालुक्यात प्रसन्न व जोशमय वातावरणात तसेच धुमधडाक्यात साजरी होत असते तसेच जयंती निमित्त विवीध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येते परंतु मागील गेल्या जवळपास १५ महिन्यापासून जगा सह संपूर्ण भारत देशात व महाराष्ट्रात कोरोना महामारी सारख्या रोगाने हाहाकार माजला आहे. हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनस्तरावरून राज्यातील सर्व सन उत्सव, महामानव यांच्या जयंती, धार्मिक कार्यक्रम, तसेच विवाह सोहळे यावर निर्बंध घातले आहेत.आणि ह्या नियमांचे पालन करणे व स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य असून ह्या वर्षी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरीच साजरी करावी व स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment