मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- :
लहानमुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार दि. 23 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment