Saturday, May 1, 2021

खासदार फौजिया खान यांच्याव्दारे कोरोना मदत केंद्राची सुरूवात

खासदार फौजिया खान यांच्याव्दारे कोरोना मदत केंद्राची सुरूवात


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यसभेच्या खासदार डॉ.फौजिया खान यांच्या पुढाकारातून कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या  माध्यमातून शनिवारी(दि.एक) कोरोना मदत केंद्राची सुरूवात करण्यात आली. 
या मदत केंद्राद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना संसर्गातून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी कशी करावी, संसर्ग झाल्यास काय करावे, लॅब टेस्टींग आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे. या सोबतच या कोरोना मदत केंद्राद्वारे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मोबाईलवर प्राप्त होणा-या संदेशावरून कोरोना रुग्णाची माहिती संगणकीय स्वरूपात ठेवून त्यास उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांचे मदतीकरिता पाठपुरावा करण्यात येणार आहे. 
कोरोना उपचारा दरम्यान काही अडचण येत असल्यास वेळेवर उपचार मिळत नसल्यास, ऑक्सीजन, रेमडीसीव्हीर इंजेक्शनची अडचण येत असल्यास तसेच रुग्णालयात बेड व अ‍ॅडमिशन बाबत समस्या येत असल्यास नागरिकांना संपर्क करता येईल. त्या नागरिकांना मदत केंद्राद्वारे सहकार्य केले जाईल. खासदार डॉ.फौजिया खान यांच्या नेतृत्वात कोरोनाशी संबंधीत सेवा,सुविधा तातडीने व योग्य रितीने मिळण्यासाठी केंद्राद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णाची हॉस्पीटलमधून सुट्टी होईपर्यंत  मदत केंद्राकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment