Monday, May 31, 2021

वेद फाऊंडेशन चित्रकला स्पर्धा समितीत पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांची नियुक्ती

वेद फाऊंडेशन चित्रकला स्पर्धा समितीत पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांची नियुक्ती



मुंबई/ परभणी / सोनपेठ(दर्शन) :-

वैद फाउंडेशन या नोंदणीकृत संस्था द्वारा आयोजित माझे आवडते चित्र या स्पर्धेच्या आयोजन समिती सदस्यांची नुकतीच मुंबईमध्ये घोषणा करण्यात आली. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी उत्तम तरकसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये सचिव सौ माधुरी कुलकर्णी, सदस्य उत्तम तरकसे, यांसमवेत सौ मंजू सराठे, विलास देवळेकर, मंगेश रासम, सौ नम्रता मटकर, सौ सोनल गांधी या निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माझे आवडते चित्र या उपक्रमामध्ये 3 देशातील दोनशेहून अधिक बालके, तरुणी दिव्यांग तथा विशेष व्याधीग्रस्त बालकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. संस्था अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी सदर समितीची घोषणा करताना या उपक्रमाद्वारे अनेक नवोदित कलाकारांना तथा चित्रकारांना प्रोत्साहन मिळेल व विविध शहरातील खेड्यातील चित्रकारांना परदेशात आपली कला दाखविण्याची संधी उपलब्ध होईल असे मत व्यक्त केले.

Sunday, May 30, 2021

लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी - काशी जगद्गुरु

लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी - काशी जगद्गुरु



वाराणसी / परभणी सोनपेठ (दर्शन) : -

सनातन वीरशैव धर्माच्या पंचपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आज  प्रधानमंत्री केअर्स फंडला पाच लाख रुपये देणगी दिली. वाराणसीचे आयुक्त श्री दीपक अग्रवाल यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. 
       यासंदर्भात जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, संपूर्ण देश कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले होते.  जनता भयग्रस्त आहे. या स्थितीमध्ये सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. या क्षेत्रातील संशोधक आणि डॉक्टरांनी जनतेला लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत असे महास्वामीजी म्हणाले. महास्वामीजी पुढे म्हणाले, लसीकरणाविषयी गैरसमज करून घेऊ नये. संशोधक आणि डॉक्टर यांच्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवावा. आपले रक्षण करणारे लसीकरणरुपी सुरक्षाकवच सर्वांनी अवश्य घ्यावे.      
       याप्रसंगी काशी पीठाकडून महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये कोविड उपचार केंद्र स्थापन केल्याबद्दल तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनाथ मुलांची शिक्षण, निवास व महाप्रसादाची जबाबदारी काशी पीठाने घेतल्याबद्दल वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. महास्वामीजींची देणगी अत्यंत श्रद्धेने स्वीकारून प्रधानमंत्री केअर्स फंडला हा निधी सुपूर्द करण्याचे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले. यावेळी महास्वामीजींनी आयुक्त तसेच माध्यम प्रतिनिधींना शाल व श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.
       यानिमित्ताने काशी पीठात आयोजित केलेल्या समारंभामध्ये काशी वीरशैव विद्वत संघाचे विद्यार्थी, पीठाच्या व्यवस्थापिका श्रीमती नलिनी चिरमे, पीठाचे वकील उदयभान सिंग आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू
कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 
२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील
  २०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी : - वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. 
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील 
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील 
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल. 
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  .
पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :- वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.
अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. 
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी
1) कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
2) यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.
3) मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
4) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
5) दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
6) कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
7)  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

Saturday, May 29, 2021

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

शहीद जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर आज शनिवार रोजी रात्री 10:15 वाजता परभणी जिल्ह्यातील महागाव ता.पूर्णा येथे साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.  
     शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कार प्रसंगी प्रारंभी  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी शहीद जिजाभाऊ यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे श्री. पाटील तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी शोकाकूल वातावरणात पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.
      शहीद जवान जिजाभाऊ यांच्या कुटुंबियांनी धार्मिक रितीनूसार अंत्यविधी पूर्ण केला. तत्पुर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच हवाई दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी बँड पथकांने शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद  जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
    हवाई दलात पठाणकोट येथे तैनात असलेले भारतीय जवान जिजाभाऊ मोहिते शहीद झाले होते. दि.29 मे रोजी रात्री 9 वाजता पार्थिव महागाव या गावी आणण्यात आले. तेथून शोकाकूल वातावरणात मिरवणूकीने गावकऱ्यांनी महागाव येथे पार्थिव आणले त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.

-*-*-*-*-

Wednesday, May 26, 2021

🌷२७ मे १९३५ रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन 🌷 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌷२७ मे १९३५ रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन 🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टोपणनाव: रमाई, रामू, रमा
मृत्यू: २७ मे १९३५
वडील: भिकू धुत्रे (वलंगकर)
आई: रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर उपाख्य रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.

बालपण

रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. . भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.

विवाह

सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणार्‍या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये इ.स. १९०८ या वर्षी झाले.

कष्टमय जीवन

१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू (?) यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान (?) म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. १९१४_१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरली. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई. बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपास करत असे

निर्वाण 

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.                                    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹🌼जय✺भीम..जय✺रमाई 🌼🌹

Tuesday, May 25, 2021

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त......

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त......


आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या  तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं दि.25 मे 2021 मंगळवार रोजी  82 व्या वर्षी निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला होता.
मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकीक होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या व परिजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाला.

काशीपीठ देणार अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण : श्री काशी जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी

काशीपीठ देणार अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण : श्री काशी जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी



कोल्हापुर / परभणी/ सोनपेठ (दर्शन) :-

तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. आई वडिलांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. या अनाथ मुलांना कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये काशीपीठाकडून दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होणार आहे असे काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यातील बिसनळ्ळी, तालुका शिग्गांव, जिल्हा हावेरी आणि गदगनगर येथे काशी पीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. येथे वेद, संस्कृत, योग, संगीताबरोबरच आधुनिक शिक्षणसुद्धा दिले जाते. तसेच महाराष्ट्रातील लातूर, तेलंगणामध्ये शादनगर या ठिकाणीसुद्धा काशी पीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. याही ठिकाणी आधुनिक शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. श्री काशी पीठाच्या सर्व गुरुकुलांमध्ये महाप्रसाद व उत्तम राहण्याची व्यवस्था आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा येथील अनाथ मुलांसाठी उत्तम निवास, महाप्रसाद व शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अपेक्षित पालकांनी गुरुकुलच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा असे श्री काशी जगद्गुरु महास्वामीजी यांनी सर्वांना सूचित केले आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे कोविड सेंटरची स्थापना केली असून यामध्ये तीनशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ही संतोषाची बाब आहे. ज्यांना गुरुकुलात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी पुढील व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
1. श्री गदिग्यप्पा मामले पट्टनशट्टर, बिसनळ्ळी गुरुकुल, मो.नं. 9113824678.
2. मंजुनाथ बेलेरी गदग गुरुकुल, 9448027291.
3. मन्मथप्पा पंचाक्षरी, लातूर गुरुकुल, 9403542221.
4. श्री. जगदेव हिरेमठ, शादनगर गुरुकुल 9246581653.

Saturday, May 22, 2021

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही - डाॅ.तात्याराव लहाने

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही  - डाॅ.तात्याराव लहाने 



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कोरोना संकटासह राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचे थैमान वाढत आहे. राज्यात विविध भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे राज्यात 90 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीये. कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी या आजाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असे डॉ. लहाने यांनी सांगितले. 

म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. तो हवेतून पसरतो असे म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश केलेला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात या आजारावरील औषधे सध्या कमी आहे. आधी याची गरज नसल्याने कंपन्यांनी त्याचे उत्पादन केले नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने म्युकर मायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलेय. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचे वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या उद्योगांचा ऑक्सिजन रुग्णालयांकडे वळवलाय. मात्र, या इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो, अशी चर्चा सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो असे नाही, अशी माहिती डॉ. लहान यांनी स्पष्ट केलेय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. मातीशी संपर्क येऊ देऊ नका. म्युकरची लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरकडे जा, असे आवाहन डॉ. लहाने यांनी केलेय.

लहानमुलांमधील कोरोना कसा रोखावा ? बालरोग तज्ञांचा टास्कफोर्स करणार मार्गदर्शन

लहानमुलांमधील कोरोना कसा रोखावा ? बालरोग तज्ञांचा टास्कफोर्स करणार मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांचा ससहभाग



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- :

लहानमुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार दि. 23 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे.

Wednesday, May 19, 2021

पाथरीतील एका दुकानदारास प्रसासनाद्वारे 50 हजार रुपयांचा दंड ...

पाथरीतील  एका दुकानदारास प्रसासनाद्वारे 50 हजार रुपयांचा दंड ...



पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 31 मे पर्यंत लाँकडाऊन जाहीर केला असतानासुद्धा पाथरी येथील न्यू बॉम्बे कलेक्शन नामक दुकानदाराने बुधवारी व्यवहार सुरू ठेवल्याबद्दल स्थानिक नगरपालिका व पोलीस प्रशासनाने बुधवारी (19) संयुक्तपणे कार्यवाही करीत संबंधित दुकानदारास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला.या प्रकाराने व्यापारीवर्गात मोठी खळबळ उडाली. पाथरीसह मानवत आदी भागात काही दुकानदारांनी लॉकडाउन जाहीर असतानासुद्धा हेतुतः आपले व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या व्यापाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घ्यावयाचे ठरवले आहे.

Tuesday, May 18, 2021

खत विक्रेत्यांनी जुना खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

खत विक्रेत्यांनी जुना खताचा साठा जुन्या दरानेच  विक्री करावा - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताच्या बॅगची खरेदी करतांना बॅगवरील किंमत व खत विक्रेत्याने बिलावर लावलेली किंमत,दर यांची पडताळणी करुनच बॅगवरील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने खताची खरेदी करु नये.खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला जुन्या दरातील रासायनिक खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
            सद्या खरीप हंगाम 2021 सुरू होत असून पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी शेतकरी खत खरेदी करत आहेत. सध्या डीएपी 10:26:26, 20:20:00:13,  16:16:16, 12:32:16, 24:24:00, MOP इत्यादी रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परंतु विक्रेत्यांनी  जुन्या खताचा साठा जुन्या दरानेच विकणे बंधनकारक आहे. असेही कळविले आहे.

अंबाजोगाई चा देवदुत नंदुसेठ मुंदडा मानुसकी ही एकच जात - शेख वाजेद

अंबाजोगाई चा देवदुत नंदुसेठ मुंदडा मानुसकी ही एकच जात - शेख वाजेद

देवदुत नंदुसेठ मुंदडा 

पत्रकार शेख वाजेद

केज / सोनपेठ (दर्शन) :-

सकाळी सात वाजले आमचे मित्र आर्षद शेख यांचा फोन आला वाजेद कुठ आहेस मी म्हटल आहे घरी बोल का रे अरे म्हटला बीड चे एक पाहुणे आहेत आणि त्यांना बीड हून अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ दवाखान्यात पाठवले आहे सध्या त्या गरोधर आहेत. आणि त्या कोरोणा बाधित आहेत त्यामुळे त्यांना डॉकटर जास्त लक्ष देत नाहीत. तिथे दवाखान्यात  कोणी ओळखीचं असतील तर फोन कर कारण तिच्या घरचे खूप भयभीत झाले आहेत. मी म्हटल मला त्या महिलेच नाव आणि सध्या ती किती नंबर ला आहे हे सांग त्याने पाच मिनिटांत सांगितलं आणि मी लगेच काकाजी यांना कॉल केला आणि सर्व माहिती सांगितली काकाजिनी फोन ताबडतोब केला आणि त्या महीले जवळ दोन डॉकटर सिस्टर अशे गेले आणि महिलेची डिलीव्हरी झाली आणि तिचा त्रास कमी झाला लगेच आम्हाला नातेवाईकांचा फोन येण्या अगोदर काकाजीनी फोन केला वाजेद भाई त्या महिलेला मुलगी झाली आणि सध्या ती महिला ठीक आहे. हे सर्व सात तासा पासून न होणार काम काकाजी मुळे आर्ध्या तासात झालं.
दुसरी घटना :- तसेच दिवस मावळतीला जात होता दैनिक लोकप्रभा चे कार्यकारी संपादक जितेंद्र सिरसट यांचा कॉल आला वाजेद भाई कुठ आहात मी म्हटल आहे साहेब केज मध्ये आणि मी डॉकटर दिनकर राऊत यांच्या दवाखान्यात होतो म्हटल बोला साहेब भिसे नामक माझे एक मित्र आहेत आणि त्यांची मुलगी कोरोणा ग्रस्त आहे तिचा सकोर 19 आहे. आणि तीच ऑक्सीजन 55 आहे. आणि सध्या तिच्यावर जास्त लक्ष देत नाहीत तिचे नातेवाईक भय भित आहेत दवाखान्यात कोणी ओळखीचं असेल तर तेवढं बघा.. त्यांना पण म्हटल सर मला त्यांचं नाव वय आणि किती नंबर ला आहेत ते सांगा त्यांनी लगेच मला पाच मिनिटांत सगळी माहिती दिली मी सर्व माहिती काकाजी यांना सांगितली त्यांनी लगेच मला   पाच मिनिटांत सांगितलं वाजेद काळजी करू नको त्यांना ऑक्सीजन सुरू आहेत आणि डॉकटर यांना मी बोललो आहे काळजी करायची गरज नाही. अर्धा तास गेला आणि मला नातेवाईकांचा कॉल आला सध्या खूप लक्ष देत आहेत आणि काही गरज वाटली तर अजून फोन करतो... त्यामुळे इधर सिर्फ नंदू सेठ नाम ही काफी हैं.अंबाजोगाई चा देवदुत नंदुसेठ मुंदडा मानुसकी ही एकच जात असे बोलल्या जात आहे.

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर



औरंगाबाद / परभणी/ सोनपेठ (दर्शन) :- 

मान्सुन काळात उद्भवणाऱ्या  नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. 
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मान्सुनपूर्व तयारी बाबत श्री.केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता दिलीप तवार, विभागीय कृषी सहसंचालक डॉ.जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता श्री.खंदारे, आर्मीचे कर्नल  श्री.सिंग आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, हवामान खाते, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, व संबंधित यंत्रणेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 
पावसाळ्याच्या काळात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. याशिवाय महानगर पालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाने अधिक दक्ष राहावे. पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गोदावरी काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. विशेषत: याबाबत बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांनी सतर्क राहावे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. 
सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या रेषेखालील गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत. 
हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. 
श्री.केंद्रेकर पुढे म्हणाले की, आपत्तीजन्य परिस्थितीत सर्व जिल्हाधिकारी यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे. याशिवाय नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी पात्रात पडणाऱ्या पावसाची अद्यावत माहिती नियमितपणे घ्यावी. दैनंदिन पावसाची आकडेवारीवर विशेषत्वाने लक्ष ठेवावे. गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या स्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यांनी विशेष दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नद्यांवरील धरणे व बंधाऱ्यावरील गेट सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करुन तसा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक, पाणीपातळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे संनियंत्रण करावे. पाणीसाठा, धरण सुरक्षा, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजना याबाबत आराखडा निश्चित करावा.
वीज पडून मनुष्य हानी होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. सर्व गावांमध्ये पोहोचणारे रस्ते किंवा पर्यायी रस्ते ज्यामध्ये पुल, रेल्वे क्रॉसिंग इत्यादी अंतर्भूत आहे त्याची स्थिती तपासून घ्यावी.  महावितरणने लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपी, ट्रान्सफॉर्मर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. 
साथ रोगांबाबत विशेष काळजी घेण्याची सूचना करताना श्री.केंद्रेकर म्हणाले की, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुरेसा औषधीसाठा, वैद्यकीय पथक उपलब्ध ठेवावेत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.
जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना करावी. महानगर पालिका/नगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या, जीर्ण झालेल्या इमारतींची पाहणी करुन संबंधितांना नोटीस देण्यात यावी. जीर्ण इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्याची खबरदारी महानगर पालिका/नगर परिषदा यांनी घ्यावी. तसेच नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत. 
बचाव पथकांबाबत सूचना करतांना ते म्हणाले की, आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शोध व बचाव पथके सज्ज ठेवावीत, त्यांना लागणाऱ्या बोटी, इंधन, लाईफ जॅकेट यांची व्यवस्था करावी. आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी लागणारी साधानसामुग्री व संसाधनाची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. 
*****

Monday, May 17, 2021

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घ्यावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घ्यावा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना  निवेदनाद्वारे मागणी



 गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) : -

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार च्या मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा. याबाबतच्या उपसमीतीने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील 33 आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण देणारा निर्णय त्वरित घ्यावा. महाराष्ट्रातील आघाडी सरकार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांवर गदा आणण्याचे काम करत आहे.पदोन्नती मधील आरक्षण रद्द केल्याने लाखो कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय तत्काळ दूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन आज दिनांक 17 मे रोजी नायब तहसीलदार डी. डी. धोंगडे यांना देण्यात आले यावेळी  पिराजी कांबळे,ॲड.मिलिंद क्षिरसागर, ॲड अनिल सावंत, ॲड. आर आर गायकवाड, सुनिल खंदारे, बालासाहेब कदम आदी उपस्थित होते.

Saturday, May 15, 2021

डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून केराची टोपली ; मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर

डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून केराची टोपली ; मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

 "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिली असली तरी या सर्व पत्रांना मुख्यमंत्र्यांनी केराची टोपलीच दाखविली असल्याचे समोर आले आहे..त्यांच्या पत्रावर मुख्यमंत्री कोणताच निर्णय घेत नसल्याने या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.. 
देशातील बारा राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करून त्यांना लस उपलब्ध करून तर दिलीच आहे त्याचबरोबर मोफत उपचार, आणि दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकाना पाच लाख रूपयांची मदत देखील सुरू केली आहे.. मराठी पत्रकार परिषद जानेवारीपासून या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा तर करीत आहेच पण त्यासाठी मेल पाठवा, एसएमएस आंदोलन आणि शेवटी आत्मक्लेष आंदोलन देखील परिषदेने केले.. मात्र पत्रकारांच्या या न्याय्य मागण्याची सरकारने दखल घेतली नाही.. त्यानंतर राज्यातील दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील अशा ज्येष्ठ 12  कॅबिनेट मंत्र्यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिली आहेत.. मात्र त्याला आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रयांच्या पत्राची देखील दखल घेतली नाही..एखादया विषयावर जाहीर भूमिका घेत मंत्री मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहितात हे पहिल्यांदाच घडले आहे.. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.. परंतू त्यांच्या पत्राची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही..ज्या मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी पत्रकारांच्या बाजुने मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिली आहेत अशा सर्व मान्यवरांचे एस.एम.देशमुख यांनी आभार मानले आहेत.. 
मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठविणारया मंत्र्यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये उपस्थित करून त्यावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्र्यांना भाग पाडावे अशी मागणी मराठी परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे..

मानव सेवा हीच ईश्वर सेवा - मा.बाळासाहेब जाधव भाजपा जनसेवक पाथरी विधानसभा

मानव सेवा हीच ईश्वर सेवा -  मा.बाळासाहेब जाधव भाजपा जनसेवक पाथरी विधानसभा



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

      भारतीय जनता पार्टी परभणीच्या वतीने 24 तास 365 दिवस अखंड रूग्नसेवा सुरू आहे..

जिल्हा शासकिय रूग्णालय परभणी. आय टी आय कोरोणा सेंटर. नवीन जिल्हा परिषद बिल्डिंग परभणी..

महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे प्रेरणास्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आमच्या मार्गदर्शक आमदार सौ मेघनादिदी साकोरे-बोर्ङीकर..

यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकिय रूग्णालय परभणी येथे आम्ही कोरोणा वार्ड सहीत सर्वच पेंशटला व नातेवाईकांना आम्ही जेवनाची तसेच राहण्याची मोफत सोय केलेली आहे..

असंख्य रूग्णांना बेड तसेच व्हेंटीलेटर मशीन डॉक्टरांना विनंती करून आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आसतो..

कुठल्याही रूग्णांना काही आडचन आसेल तर हरीओम मदत केंद्रात आमच्या टीमशी संपर्क साधू शकता शक्य तेवढी मदत करण्यात येईल..

पाथरी विधानसभेतील पाथरी मानवत तसेच अनेक सोनपेठकरांना हरी ओम मदत केंद्राचाच आधार.........

     भाजपा जनसेवक पाथरी विधानसभा.
             मो.9422925500.

Friday, May 14, 2021

आम्ही लढलो- आम्ही घडलो एक दृष्टिक्षेप - राम शिनगारे

आम्ही लढलो- आम्ही घडलो एक दृष्टिक्षेप - राम शिनगारे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आंबेडकरी, डाव्या आघाडीच्या चळवळीचे केंद्र आहे. याठिकाणी अनेक आंदोलने जन्म घेतात आणि राज्य व्यापून काढतात. हा या विद्यापीठाच्या स्थायी भाव आहे. राज्यातील अनेक विद्यापीठात गैरप्रकार  राजरोसपणे होतात. परंतु त्याठिकाणी चळवळी नसल्यामुळे तो मुद्दा उचलण्यात येत नाही. औरंगाबादेत तसे नाही. कोणतीही घटना घडली (मग ती भ्रष्टाचार असेल की प्रवेश प्रक्रियेतील.) त्याला उचलले जाते. त्यामुळे विद्यार्थी संघटनापासून विविध प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक संघटनांच्या आंदोलन, निवेदनांची दखल विद्यापीठ प्रशासनाला घ्यावीच लागते.

याच विद्यापीठाच्या मातीत उद्यास आलेली आणि राज्यभर पसरलेली विद्यार्थी संघटना म्हणजेच ‘एसएफआय’. या संघटनेची महाराष्ट्रात स्थापना केली ती दिवंगत डॉ. विठ्ठल मोरे सर आणि काॅ. उद्धव भवलकर यांनी. एसएफआयचे राज्य अधिवेशन कळंब येथे  यशस्वीपणे घेण्यात डॉ.अरुण शेळके यांचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारी ही संघटना अनेक अर्थांनी महत्वाची आहे. विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये खेड्यापाड्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम एसएफआय संघटनेने केले आहे. या संघटनेला मी २००९ पासून ओळखतो. विद्यापीठात शिक्षण घेण्यास आलो त्याच वर्षी पत्रकारीता विभागाचा डीआर होता. तेव्हा संघटनेच्या नेत्यांनी प्रचंड आग्रह करीत जीएसची उमेदवारी घेण्याची मागणी केली होती. मात्र ती मी नाकारली असो.

विषय हा आहे की, या चळवळीत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हक्क मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्याचे महत्वाचे कार्य काॅम्रेड डॉ. Maroti Tegampure यांनी ‘आम्ही लढलो- आम्ही घडलो’ या ग्रंथाच्या माध्यमातून केले आहे.  या ग्रंथात डॉ. विठ्ठल मोरे सरांपासून अगदी सध्या कार्यरत असलेल्याही कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा समावेश आहे. एखादी विद्यार्थी संघटनेची बांधणी कशा पद्धतीने होत असते. याचा उत्तम नमुना हा ग्रंथ आहे.

 ग्रंथाची सुरुवातच संस्थापक असलेले डॉ. विठ्ठल मोरे सरांच्या मुलाखतीपासून होते. यानंतर काॅ. उद्धव भवलकर डॉ. डी.एल. कराड, कॉ. रामकृष्ण शेरे, डॉ. आदिनाथ इंगोले, राजानंद सुरडकर, डॉ. उमाकांत राठोड, विलास बाबर, डॉ.भाऊसाहेब झिरपे, डॉ. अतुल चौरपगार, ॲड. सुनिल राठोड, ॲड. अमोल गिराम, डॉ. राम बरकुले यांच्यासह अनेकांनी अनुभव मांडले आहेत. यातील प्रत्येकाला लढण्याचे बळ एसएफआय संघटनेेने कसे दिले? आंदोलनांनी जन्म कसा घेतला. त्यासाठी जुळवाजुळव कशी केली. या संघटनेच्या माध्यमातुन मित्रपरिवार कसा जमवला, वाढवला आणि आयुष्यात परिवर्तन कसे घडले आदी अनुभवांचा समावेश आहे.

एसएफआय संघटनेच्या उदयापासून ते अनेक आंदोलनांचा इतिहासाची मांडणीच या ग्रंथातून झालेली आहे. हे अतिशय महत्वाचे आहे. या संघर्ष लढ्यातील तीन योद्धे सध्या आपल्यात नाहीत. त्यांचेही अनुभव यात आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा हा ग्रंथच एसएफआयचा इतिहास असणार आहे. हा इतिहास अनेकांना लिहिते करून तयार करण्याचे महत्वाचे कार्य काॅ. मारोती तेगमपुरे यांनी केले आहे. हे अतिशय अभिनंदीय असे पाऊल आहे. 

हा ग्रंथ वाचताना प्रत्यक्षात आपणच त्याठिकाणी आहोत, असा फिल येत राहतो.  एकाचा संघर्ष वाचला की, दुसऱ्याने काय मांडले असेल याची उत्सुकता लागलेली असते. प्रत्येकाचे अनुभव महत्वाचे आहेत. मी तर म्हणेल, एसएफआय संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. आता संघटनेचाही इतिहास लिहायला घेतला पाहिजे. त्यातुन आणखी एक दस्तऐवज तयार होईल. तो आजच्या काळाला दिशादर्शक ठरेल.

- राम शिनगारे

Thursday, May 13, 2021

सकल मानव कल्याणासाठी "सिंध्दातं शिखामणी" अथवा परमरहस्य ग्रंथ पाच दिवसीय पारायण

सकल मानव कल्याणासाठी "सिंध्दातं शिखामणी" अथवा परमरहस्य ग्रंथ पाच दिवसीय पारायण


सोनपेठ (दर्शन) :-

प.पु.ष.ब्र. १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर वीरशैव सोनपेठ मठसंस्थान तर्फे प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी वीरशैव धर्म संस्थापका पैकी श्री श्री श्री १००८ एकोरामाराध्य महास्वामीजी तसेच श्री श्री श्री १००८ जगदगुरु दारुकाचार्य ( मरूळाराध्य)  महास्वामीजी तसेच वीरशैव धर्म प्रचारक प्रसारक महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवाचे निमित्याने वीरशैव धर्म ग्रंथ "सिंध्दातं शिखामणी" अथवा संत मन्मथ स्वामी लिखित "परमरहस्य ग्रंथ" पाच दिवसीय पारायण सोहळा वीरशैव भाविकभक्तानी करावे.असे आवाहन सोनपेठकर महाराजांनी केले आहे.कोरोना या महामारीला भारतासह जगातून समाप्त होण्यासाठी प्रत्येक मनुष्याला या महामारी पासुन वाचविण्यासाठी,सकल मानव कल्याणासाठी, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपण आप आपल्या घरी प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरीच वरील ग्रंथाचे पारायण करून  दिनांक १३-५-२०२१ आणि १७-५-२०२१ रोजी दुपारी ठिक १२ वा. वरील आराध्याचे प्रतिमापूजन करून आप आपल्या घरी जयंती साजरी करावी असे आवाहन प.पू. सद्गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी केले.
(नोट कृपया कोरोना महामारीमुळे मठात कोणीही न येता आप आपल्या घरीच सुरक्षित वरील पारायण सोहळा संपन्न करावे.)

Wednesday, May 12, 2021

जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरीच साजरी करावी - परमेश्वर लांडगे

जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरीच साजरी करावी - परमेश्वर लांडगे


माजलगाव / सोनपेठ (दर्शन) :-

सध्या देशासह राज्यात तसेच मराठवाड्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती तमाम विरशैव समाज बांधवांनी घरीच साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे.
दि. १४ मे २०२१ अक्षय तृतीया दिनी महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती आहे. सध्या संपूर्ण देशासह राज्यात तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात कोरोना महामारी चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती तमाम विरशैव समाज बांधवांनी घरीच साजरी करावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे व तसेच जयंती साजरी करताना शासनस्तरा वरून दिलेल्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मिरवणूक न काढता एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्सव साजरा करावी दरवर्षी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्रा सह माजलगाव तालुक्यात प्रसन्न व जोशमय वातावरणात तसेच धुमधडाक्यात साजरी होत असते तसेच जयंती निमित्त विवीध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येते परंतु मागील गेल्या जवळपास १५ महिन्यापासून जगा सह संपूर्ण भारत देशात व महाराष्ट्रात कोरोना महामारी सारख्या रोगाने हाहाकार माजला आहे. हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनस्तरावरून राज्यातील सर्व सन उत्सव, महामानव यांच्या जयंती, धार्मिक कार्यक्रम, तसेच विवाह सोहळे यावर निर्बंध घातले आहेत.आणि ह्या नियमांचे पालन करणे व स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य असून ह्या वर्षी जगद्गुरु एकोरामाध्याय व महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरीच साजरी करावी व स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघ प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार परमेश्वर लांडगे यांनी केले आहे.

Tuesday, May 11, 2021

प्रत्येक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका - अब्दुल सत्तार

प्रत्येक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका - अब्दुल सत्तार



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका निश्‍चितपणे दिली जाईल, आरोग्य विभागाने या संदर्भात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
तालुक्यातील झरी येथील आरोग्य केंद्रातील 50 खाटांच्या कोविड सेंटरचा शुभारंभ राज्यमंत्री सत्तार यांच्याहस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जून खोतकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, शिवसेनेचे नेते डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव,   जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना देशमुख,  गजाननराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अतूल सरोदे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे, सरपंच दादाराव देशमुख, उपसरपंच महेश मठपती, पंचायत समिती सदस्य डॉ. प्रमोदराव देशमुख, सतीश बनसोडे, तानाजीराव भोसले, किशोर देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह अन्य उपस्थित होते.
याप्रसंगी सत्तार यांनी 50 खाटांच्या या आरोग्य केंद्रात आठ ऑक्सीजनचे बेड्स उपलब्ध केल्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. हे रुग्णालय निश्‍चितच कोरोनाबाधित रुग्णांना दिलासादायी ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. त्या दृष्टीने सरकार कटीबध्द आहे, असे ते म्हणाले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे हे मूळ गाव असल्याने या केंद्रावर प्रशासनाद्वारे निश्‍चितच सर्वतोपरी सुविधा पुरविल्या जातीलच, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली.

Monday, May 10, 2021

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कोव्हिड उपचाराची बिले मिळणार परत न्यायालयीन निर्देश ; शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कोव्हिड उपचाराची बिले मिळणार परत
 न्यायालयीन निर्देश ; शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका.




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतून कोव्हिड वरील उपचार घेतल्यानंतर ज्या खासगी रुग्णालयांनी बिले आकारली, ती परत मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित रुग्णालयांवर काय कारवाई केली? याचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिलेआहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले आहे, की राज्य शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोव्हिड रुग्णांनाच देण्यात येत आहे. वास्तविक कोव्हिड च्या सर्व रुग्णांना त्याचा लाभ द्यायला हवा. या याचिकेवर सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने न्यायालयात शपथपत्र सादर करून सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारांसहित 20 अन्य उपचार कोव्हिड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल. परंतु तसे झालेले नाही. खासगी रुग्णालयांनी लाखो रुपयांची बिले वसूल केली.
श्री. शेटे यांनी न्यायालयात उदाहरणादाखल 20 ते 25 रुग्णांचे दाखले दिले. ज्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार घेतला. परंतु त्यांना बिल भरावे लागले. ही बाब न्यायालयाने शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून कारवाई करणार असल्याचे शासनाने सांगितले. न्यायालयाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. 22 जून 2021 रोजी संबंधित खासगी रुग्णालयांवर काय कारवाई केली ? याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोणताही रुग्ण आर्थिक कारणामुळे उपचारांपासून वंचित राहू नये, तातडीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करावी, ज्या रुग्णांनी लाभार्थी असूनही पैसे भरून उपचार घेतले, त्यांनी आपले अर्ज त्या समितीकडे लेखी स्वरूपात द्यावेत. त्यावर त्या समिती तातडीने निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने सांगितले.
रुग्णांची लूट झाली, झालेला खर्च द्यावा लागेल
गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा आणि सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. कोव्हिड चा त्यात समावेश झाला. त्यासाठी स्वतंत्र खाटांची निर्मिती झाली. परंतु बिलांची आकारणी काही थांबली नाही. ही बाब उच्च न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले. सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याची लढाई असताना, खासगी रुग्णालयांनी त्यांना वेठीस धरले. योजनेतील तरतुदींचा विचारच केलेला नाही. ही केवळ लूट आहे. झालेला खर्च परत द्यावाच लागेल.ओमप्रकाश शेटे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख (याचिकाकर्ते).

जिल्हाधिकार्‍यांकडे असा करा खर्च मागणीचा अर्ज
ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतला, त्या रुग्णालयाचे बिल, मेडिकलच्या पावत्या, रुग्णाचे अधारकार्ड, रेशनकार्ड आदींच्या झेरॉक्स प्रती जोडून विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडे करावा. त्यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुनादेखील न्यायालयाने निश्रि्चत केलेला आहे. त्यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करावेत.

Saturday, May 8, 2021

मानवत बाजार समितीने उभारले 80 बेडचे कोविड केअर सेंटर ; 8 मे रोजी बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते झाले उद्घाटन राज्याती कोविड केअर सेंटर सुरू करणारी पहिली बाजार समिती

मानवत बाजार समितीने उभारले 80 बेडचे कोविड केअर सेंटर ; 8 मे रोजी बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
राज्याती कोविड केअर सेंटर सुरू करणारी पहिली बाजार समिती





मानवत / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आव्हान राज्य सरकारने केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने  राज्यातील पहिले 80 बेडचे सर्व सुविधायुक्त केअर सेंटर उभारले आहे.8 मे रोजी हे कोविड केअर सेंटर सुरु झाले असून  यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत असून अतिरिक्त तान या यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. याला  प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात या कोविड केअर सेंटर च्या उदघाटन आ बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर,  जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार डीडी फुपाटे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे, डॉ अंकुश लाड, पो नी रमेश स्वामी बाजार, सहाय्यक निबंधक पाठक, समितीचे संचालक महादेव नाणेकर, नारायण भिसे. ज्ञानेश्वर मोरे पाटील. बाबासाहेब आवचार, आसाराम निर्मळ. अंबादास तूपसमुद्रे, माणिकराव काळे, गिरिष कत्रुवार सचिव बालासाहेब कदम आदी उपस्थित होते. बाजार समितीने सुरू केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 80 बेडची व्यवस्था केली आहे.सर्व वीज, शौचालय,   सुविधा उपलब्ध केले असून रुग्णासाठी भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्थाही बाजार समितीने केली आहे. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ही बाजार समिती पुढाकार घेणार आहे. 9 मे पासून प्रत्यक्ष रुग्णांना या कोविड केअर सेंटर मध्ये दखल करता येणार आहे.प्रास्ताविक संचालक माधव नाणेकर यांनी  सूत्रसंचालन सत्यशील धबडगे यांनी केले तर आभार बाबासाहेब अवचार यांनी मानले.
सहकार मंत्री पाटील यांच्या कडून कौतुक 
या कोविड केअर सेंटर च्या उदघाटन कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालक मंत्री नवाब मलिक, पणन सचिव अनुप कुमार, पणन संचालक सतीश सोनी, सहकार मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश देशपांडे, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जि प चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हा बँकेच्या संचालक प्रेरणा वरपुडकर ऑनलाइन सहभागी झाले होते बाजार समितीने सुरू केलेल्या, कोविड केअर सेंटर सुरू करणारी मानवत कृ उ बा ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे.राज्यभरातील इतर बाजार समित्यात मानवत कृ उ बा  पॅटर्न राबविण्यात येईल अशी माहिती उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झालेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी देत या उपक्रमाचे कौतुक केले.
पालक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रशासनाला सूचना
 जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हेसुद्धा कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाइन हजर होते.यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी बाजार समितीने सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून प्रशासनाच्या वतीने आवश्यक मदत करण्यासाठी सर्व सूचना देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगितले.जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर साठी पुढाकार घ्यावा असे आव्हान पालक मंत्री नवाब मलिक यांनी केले.





 
वांगी घाटावरुन नियम डावलत पाच ते सहा मशिन व्दारे दर दिवशी हजारो ब्रास रेतीचा ऊपसा...!
जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाची ही डोळे झाक.....





परभणी / मानवत / सोनपेठ (दर्शन) : -

एकीकडे सद्यस्थितीत कोव्हीड-१९ चा प्रादर्भाव जिल्हाभरात वाढत आहे.याचेच कारण देत गोदा पात्रातील गौनखनिजा कडे मानवत महसुल प्रशासन जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत असून तालुक्यातील वांगी येथील रेती घाट फेब्रुवारी महिण्या पासुन सुरू असुन या ठिकाणी नियमांची पायमल्ली करत हसल विभागातील झारीतील शक्राचार्यांना हाताशी धरून दर दिवशी पाच ते सहा पोकलेन, जेसबी मशिन च्या साह्याने बेसुमार वाळूऊपसा होत असून यात महसुल चे अधिकारी स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या वषयी मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी निवेदन देऊन ही या वर कर्यवाही झाली नसल्याने वांगी घाटावरुन दर दिवशी हजारो ब्रास रेतीचा अवेद्य पण दिवस रात्र उपसा होतांना दिसून येत आहे. यात शासनाच्या करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.मानवत तालुक्यातील वांगी घाटाचा लिलाव जानेवारी महिण्यात संपन्न झाला होता. या वेळी सहा हजार शंभर ब्रास वाळूचा लिलाव करून संबंधित रेती घाट उपसण्यास महसुल प्रशासनाने परवानगी दिली होती. सरुवाती पासुनच या रेती घाटावरुन नियम डावलत रेती उपसा सुरू होता. मजुरां व्दारे रेती उपसा करून दोन ब्रास वाळू ला एक पावती देण्यात येणे गरजेचे असतांना या ठिकाणा वरुन पाच ते सहा पोकलेन आणि जेसीबी मशीन च्या साह्याने राजरोस दिवस रात्र रेती उपसा आजही सुरू आहे. दर दिवशी तीनशे ते चारशे हायवा ट्रक व्दारे तीन ते सहा ब्रास रेती ऊपसा सरु असून दर दिवशी दिड दोन हजार ब्रॉस वळूचा ऊपसा होतांना दिसत आहे. सुर्योदया पसून सूर्यास्ता पर्यंतच नदी पात्रातून रेती उचलन्यास परवानगी असते इथे मात्र दिवस रात्र रेती उपसा सुरू आहे.
शुक्रवारी याठिकाणा हुन भरधाव वेगात रेती नेणा-या टिप्परने मोटार सायकल लाधडक दिली त्यात मोटार सायकल चालक जाधव नामक व्यक्ती जागिच ठार झाला असून त्यांची पत्नी दवाखाण्यात मृत्यूशी झुंज देत आहे. या ठकाणचे सीसीटव्ही बंद आहेत. चार मे रोजी पाथरीचे उपविभागिय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी पाथरी तालुक्यातील गौडगाव शिवारात नदी पात्रात वाळू माफीयां वर कार्यवाही करत पाच जनांवर पाथरी पोलीसात गुन्हा दाखल केला मात्र, इकडे वांगी घाटावर वैद्य ठेक्याच्या नावा खाली सर्रास पणे नियम डावलून ठरऊन दिल्या पेक्षा किती तरी पटीने वाळूचा उपसा झालेला असतांना ही या गंभिर बाबी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी २३ मार्च रोजीच जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देऊन या ठिकाणी कार्यवाही करण्या साठी निवेदन दिले होते मात्र या निवेदनाकडे महसुल परशासनाने जानिव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या ठिकाणचा वाळू धक्का त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे.