विटा खुर्द येथे कोरोना लसीकरणास प्रतिसाद ; सिईओ टाकसाळे यांचे मार्गदर्शन
सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायत विटा खुर्द येथे दिनांक 7 एप्रिल 2021 बुधवार रोजी कोव्हिड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याला गावातील पात्र (पंचेचाळीस वर्षावरील) ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. या लसीकरण कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर,जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे साहेब, तहसीलदार डॉक्टर आशिष बिरादार साहेब, गटविकास अधिकारी सचिन खुडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड, डॉक्टर मुंडे, डॉक्टर फंड, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री मदनराव भोसले तसेच पंचायत समितीचे विभाग प्रमुख, गावातील मान्यवर उपस्थित होते. कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्वांनी आपली, आपली कुटुंबाची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत, सर्वांनी नियमित मास्कचा वापर करावा सोबतच कोरोना संबंधाने काही लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वतःची तपासणी करून घेणे बाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सोबतच लसीकरणा संबंधी नागरिकात असणाऱ्या गैरसमजा बाबतही लोकांना समुपदेशन करत लसीकरण आणि त्यातून होणारे फायदे बाबत सकारात्मकतेने समजावून सांगितले. याप्रसंगी "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे माननीय राजेश दादा विटेकर यांनी स्वतः लसीकरण करून घेत उपस्थित ग्रामस्थांना लसीकरण करून घेणे सुरक्षित आहे ,तसेच अत्यावश्यक आहे सर्वांनी लसीकरण करून घेणे बाबत आवाहन केले.
No comments:
Post a Comment