Monday, April 5, 2021

भाजपा ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर जिल्हा बँकेच्या निवड बैठकीपासून दूरच राहणार...

भाजपा ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर जिल्हा बँकेच्या निवड बैठकीपासून दूरच राहणार...




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून भाजपा ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना दूरच रहावे लागणार असे स्पष्ट चित्र आहे.
बँकेअंतर्गत विमा घोटाळ्याच्या प्रकरणात बोर्डीकर यांना जिल्हा बँकेत प्रवेश करावयास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापुर्वीच मनाई केली. त्याविरोधात बोर्डीकर यांनी एक एप्रिल रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करीत अध्यक्ष - उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेतील बैठकीस उपस्थित राहवयास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु बँकेचे तत्कालीन संचालक अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार यांच्या मार्फत अ‍ॅड. संतोष जाधवर यांनी त्यास विरोध केला. खंडपीठात सोमवारी या अनुषंगाने याचिका सुनावणीस व निर्णयाप्रत आल्यापाठोपाठ बोर्डीकर यांच्या वकीलांनी परवानगीच्या मागणीची याचिका मागे घेतली. 
दरम्यान, बोर्डीकर यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून दूर रहावे लागणार असे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे बोर्डीकर गटास मोठा धक्का बसला आहे.

No comments:

Post a Comment