Wednesday, April 21, 2021

*वाडी दमईच्या युवकांची 'माझा गाव, माझी जबाबदारी' मोहीम* • *संपूर्ण गावक-यांची तपासणी* • *कोविडमुक्त गावाचा संकल्प* • *डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन*

*वाडी दमईच्या युवकांची 'माझा गाव, माझी जबाबदारी' मोहीम* 
• *संपूर्ण गावक-यांची तपासणी*
• *कोविडमुक्त गावाचा संकल्प*
• *डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन*

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कोविड१९च्या दुस-या लाटेत वाडी दमई येथील काही नागरिकांना संसर्ग झाला. त्यामुळे येथील युवकांनी एकत्र येत त्याचा धैर्याने सामना करण्याची जबाबदारी उचलली असून, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गावक-यांचे शरीरातील तापमान आणि ऑक्सिजन पातळी आज तपासण्यात आली. मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे, स्वच्छता राखणे या अत्यावश्यक बाबींवर भर देण्यात आला आहे. 

  वर्षभरापासून सुरु असलेल्या कोविड युद्धात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन काम करत असून, कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वजण लढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' च्या संकल्पानुसार वाडी दमई येथील युवकांनी एकत्र येऊन गावातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यात  जनजागृती निर्माण करत आहेत.

 बाधितांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी युवकांनी गुगल मिटव्दारे चर्चा केली व दुस-या दिवशी गावक-यांचे तापमान मोजणी, त्यांच्या नोंदी घेणे, संशयास्पद बाधितांना कोविड तपासणी करण्यास सांगणे, बाधितांवर उपचार, त्यांचे विलगीकरण, त्यांना आहाराबाबत सजग करण्यात आले.

 बाधितांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येणे, कोविडबाबतची भिती दूर करणे, संशयितांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक महत्त्व पटवून देणे. तसेच गावातील सार्वजनिक नळावर कोविड प्रतिबंधक औषधींची फवारणी करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
शिवाय प्रार्थनास्थळावरून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येत आहे. 

  गावात पूर्वनियोजित विवाह असल्यास ते घरगुती पद्धतीने कमीत कमी उपस्थितीत पार पाडणे तसेच कोणतेही धार्मिक कार्यक्रम न करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोना केसेस पाहता जिल्हा व आरोग्य यंत्रणेवर अधिकचा भार पडणार नाही, याची खबरदारी येथील युवक घेत आहेत. 

  युवकांच्या पुढाकाराने कोविड१९च्या दुस-या लाटेचा गावकरी धैर्याने सामना करत आहे. आतापर्यंत गावात तीन जणांचा मृत्यू तर ५० जण बाधित झाले असून, अनेकांनी यावर मात केली आहे. यापुढे गावातील एकही व्यक्ती बाधित होणार नाही, यासाठी युवक प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. 
  
'माझा गाव, माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील लक्ष्मणराव बिडकर, सरपंच अमोल तरवटे, यांच्या मार्गदर्शनात शिक्षक सुधाकर गायकवाड यांच्या सक्रिय पुढाकाराने नागरिकांच्या टेंपरेचर गन व ऑक्सिमीटरच्या साह्याने सर्व नागरिकांची शरीराचे तपमान तपासणी आणि रक्तातील ऑक्सिजनची प्रमाण व पातळी तपासणी करण्यात आली. तसेच या सर्व नोंदी घेऊन संशयितांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.

कर निरीक्षक डॉ. उमाकांत विभुते, प्रभाकर बारहाते, विलास घोडके, विजयकुमार बिडकर, संतोष वाटोडे, महादु वाटोडे, अंबादास वाटोडे, राम भुरे, गजानन विभुते, नवनाथ बारहाते, पांडुरंग तरवटे, शरद तरवटे, सोमनाथ बोरामने, ञिशरण वाटोडे, बंडूनाना बिडकर, उद्धव गायकवाड, अच्युत तरवटे, संदिप बिडकर, आशिष बिडकर यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर गायकवाड, पुजा तरवटे, शिवराज बोरामणे, अमोल विनायक तरवटे, दीपक बिडकर, ओमकार तरवटे, वैभव कड, माऊली तरवटे, शरद तरवटे, संतोष बिडकर, सुनील तरवटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल तरवटे, अमोल तरवटे, सोमनाथ तरवटे, कृष्णा तरवटे सिस्टर व ब्रदर या कोरोनायोद्ध्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. वाडी दमई येथील अर्थ सहाय्य सह्याद्री महिला बचत गटाने अर्थसहाय्य केले तसेच मार्गदर्शन जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक शेख सर,अरुण चव्हाळ सर व सर्व वृंदांनी सहकार्य केले.
*****

No comments:

Post a Comment