Sunday, April 25, 2021

ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे कोरोनाला हरवतात - रानबा गायकवाड

ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे कोरोनाला हरवतात - रानबा गायकवाड


कोणताही आजार बरा होत असतो. विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरातच अत्याधुनिक रुग्णालये होती. ती सोय आणि त्याच गुणवत्तेचे डॉक्टर तालुका पातळीवर सुध्दा आहेत. त्यांची सुसज्ज रुग्णालये उभी राहिली आहेत. 
   जी  परिस्थिती किंवा आरोग्य यंञणावर पडलेला ताण आपणाला दिसत आहे. तो महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण चाचणी केल्यामुळे दिसत आहे. शासकीय रुग्णालयात जिल्हा,  उपजिल्हा रुग्णालयात अनेक डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. कोव्हिड काळात त्या भरून शासन प्रत्येक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावा लागतो आहे. रेमेडिसिवरचा काळाबाजार,भरमसाठ रुग्णांना दिले जाणारे बीले यावरही कडक धोरणाची गरज आहे. 
     सध्या कोरोनाची लाट आहे. या लाटेत ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच्यावर शासकीय,  खाजगी आणि विशेष कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या औषधांच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. 
       अनेक वयोवृद्ध ज्यांनी शंभरी पार केली आहे. परभणी,  बीड , उस्मानाबाद,  लातूर, औरंगाबाद आदी मराठवाडय़ातील तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरे व इतर ग्रामीण भागातील सत्तर, ऐंशी,  नव्वद वर्षांच्या आजी आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. तरूण आणि प्रौढासमोर एक आदर्श ठेवला आहे. 
      सुसज्ज दवाखाना,  दिमतीला चोवीस तास डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,  आवश्यक असणारे जेवण आणि इंजेक्शन,  गोळ्या सर्व काही उपलब्ध आहे. पण ते वेळच्यावेळी घेणे ही रुग्णाची जबाबदारी आहे. 
     कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने नातेवाईकांनी रुगणाजवळ मनात असेल तरीही थांबता येत नाही. अशा वेळी रुग्णाने आपली  (will power ) इच्छाशक्ती प्रबळ ठेवली पाहिजे. ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे अनेकजण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. आणि आता आनंदी जीवन जगत आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून रुग्ण लवकर ठीक होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे. त्यासाठी रुगणातही आत्मविश्वास पाहिजे. तो वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आत्मविश्वास हा निसर्गाने मानवाला दिलेला कोरा चेक आहे. 
  निगेटिव्ह विचार करणारे. उगीचच भितीच वातावरण निर्माण करणाऱ्या गोष्टींना थारा देऊ नये. आपणाला जे आवडते ते करावे. या काळात इतरांशी जवळ जाऊन बोलता येत नाही. पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मिञांशी, घरच्यांशी,  नातेवाईकांना बोलत जा. मन मोकळे झाले की श्वासही मोकळा होतो. दबावात तर चांगले  चांगले गुडगे टेकत असतात. उन जरी कडक आले तरी  काही वेळाने सावली पडतच असते. 

   संपादन, लेखक, विचारवंत. रानबा गायकवाड 
                मो.7020766674

No comments:

Post a Comment