Thursday, April 29, 2021

पालकमंत्री मलिक ध्वजारोहनासाठी 1 मे रोजी परभणी दौर्‍यावर

पालकमंत्री मलिक ध्वजारोहनासाठी 1 मे रोजी परभणी दौर्‍यावर






परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे 30 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत.
शुक्रवारी (दि.30) औरंगाबाद येथून पाथरी येथे आगमन तसेच  पाथरी ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला सायंकाळी 7:30 वाजता भेट, सायंकाळी 8:00 वाजता पाथरी येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण. रात्री 8:30 वाजता सावली शासकीय विश्रामगृहात आगमन राखीव व मुक्काम करतील.
शनिवार (दि.1) मे रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र दिनाच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त 61 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8:15 वाजताँ अधिकार्‍यांसमवेत जिल्ह्यातील कोविड-19 संदर्भातील आढावा,  सकाळी 9:15 वाजता खरीप हंगामपूर्व आढावा बैठक, सकाळी 10:15 वाजता पत्रकार परिषद, सोयीनुसार परभणी येथून नागपूरकडे प्रयाण करतील, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने दिली.

Sunday, April 25, 2021

ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे कोरोनाला हरवतात - रानबा गायकवाड

ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे कोरोनाला हरवतात - रानबा गायकवाड


कोणताही आजार बरा होत असतो. विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरातच अत्याधुनिक रुग्णालये होती. ती सोय आणि त्याच गुणवत्तेचे डॉक्टर तालुका पातळीवर सुध्दा आहेत. त्यांची सुसज्ज रुग्णालये उभी राहिली आहेत. 
   जी  परिस्थिती किंवा आरोग्य यंञणावर पडलेला ताण आपणाला दिसत आहे. तो महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण चाचणी केल्यामुळे दिसत आहे. शासकीय रुग्णालयात जिल्हा,  उपजिल्हा रुग्णालयात अनेक डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. कोव्हिड काळात त्या भरून शासन प्रत्येक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावा लागतो आहे. रेमेडिसिवरचा काळाबाजार,भरमसाठ रुग्णांना दिले जाणारे बीले यावरही कडक धोरणाची गरज आहे. 
     सध्या कोरोनाची लाट आहे. या लाटेत ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच्यावर शासकीय,  खाजगी आणि विशेष कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या औषधांच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. 
       अनेक वयोवृद्ध ज्यांनी शंभरी पार केली आहे. परभणी,  बीड , उस्मानाबाद,  लातूर, औरंगाबाद आदी मराठवाडय़ातील तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरे व इतर ग्रामीण भागातील सत्तर, ऐंशी,  नव्वद वर्षांच्या आजी आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. तरूण आणि प्रौढासमोर एक आदर्श ठेवला आहे. 
      सुसज्ज दवाखाना,  दिमतीला चोवीस तास डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,  आवश्यक असणारे जेवण आणि इंजेक्शन,  गोळ्या सर्व काही उपलब्ध आहे. पण ते वेळच्यावेळी घेणे ही रुग्णाची जबाबदारी आहे. 
     कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने नातेवाईकांनी रुगणाजवळ मनात असेल तरीही थांबता येत नाही. अशा वेळी रुग्णाने आपली  (will power ) इच्छाशक्ती प्रबळ ठेवली पाहिजे. ज्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे असे अनेकजण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. आणि आता आनंदी जीवन जगत आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून रुग्ण लवकर ठीक होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे. त्यासाठी रुगणातही आत्मविश्वास पाहिजे. तो वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आत्मविश्वास हा निसर्गाने मानवाला दिलेला कोरा चेक आहे. 
  निगेटिव्ह विचार करणारे. उगीचच भितीच वातावरण निर्माण करणाऱ्या गोष्टींना थारा देऊ नये. आपणाला जे आवडते ते करावे. या काळात इतरांशी जवळ जाऊन बोलता येत नाही. पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मिञांशी, घरच्यांशी,  नातेवाईकांना बोलत जा. मन मोकळे झाले की श्वासही मोकळा होतो. दबावात तर चांगले  चांगले गुडगे टेकत असतात. उन जरी कडक आले तरी  काही वेळाने सावली पडतच असते. 

   संपादन, लेखक, विचारवंत. रानबा गायकवाड 
                मो.7020766674

Saturday, April 24, 2021

परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनाने निधन

परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनाने निधन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अत्यंत मनमिळावू म्हणून ओळखले जाणारे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज आज दि२४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता कोरोनाने दुःखद निधन झाले. १५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.  त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे. 

३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली.  
परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे कोषागार अधिकारी या पदी कार्यरत असलेले श्री सुनील कोंडीबा वायकर यांचा जन्म दि २एप्रिल १९६८चा.  ते २ मे १९९५ रोजी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले.  कालांतराने त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळालेली होती. 

त्यांच्या एकूण 26 वर्षांच्या सेवकाळामध्ये त्यांनी कोषागार कार्यालय उस्मानाबाद, बीड, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, स्थानिक निधी लेखा बुलढाणा, जिल्हा परिषद वाशीम, जिल्हा कोषागार कार्यालय परभणी इ ठिकाणी लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर सेवा बजावली. मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले श्री वायकर हे ९ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते. त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे.

Thursday, April 22, 2021

लातूरचे ऑक्सिजन संकट आणि दाखवलेली समयसूचकता ! ; देवदुतच पालकमंत्री अमित देशमुख

लातूरचे ऑक्सिजन संकट आणि दाखवलेली समयसूचकता ! ; देवदुतच पालकमंत्री अमित देशमुख      


          
लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

बुधवार : दि.21.04.2021 वेळ : स.11.15 
             
लक्ष्मीकांत कर्वा,उपाध्यक्ष,विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान , लातूर यांचा फोन खणखणला ! Covid positive होऊन विवेकानंद हॉस्पिटल मध्ये बेडवर पडलेलो . अशावेळी फोन घेणे जरा कठीणच ! 

मा.डॉ.कुकडे काकांचा फोन. घाईघाईत ते म्हणाले    
" विवेकानंद रुग्णालयात आज दु 5 पर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे. आपल्या रुग्णालयात 70 रुग्ण असून, त्यात 45 जण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजन वर आहेत. मला जाणीव आहे , तुम्ही बेडवर आहात पण या प्रकरणात तुम्ही लक्ष घालावे . संपुर्ण लातूर जिल्हा हाय अलर्ट वर आहे . पालकमंत्री श्री अमितजी देशमुख यांच्याशी संपर्क करा . मला खात्री आहे तुम्ही यातून मार्ग काढाल ."              

पायाखालची जमीन हादरली. 
विवेकानंद रुग्णालयातुनच, तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. माझ्या दवाखान्यातील खोलीला थोड्या वेळासाठी युद्धस्थळाचे War Room चे स्वरूप आले.                
ताबडतोब मा. श्री अमितजी यांना फोन केला. लातूरमधील गंभीर ऑक्सिजन संकटाबद्दल माहिती दिली. 

महाराष्ट्रच्या पुणे FDI विभागाने अगोदरच सर्व टँकर इतरत्र वळवले होते. अवघ्या 15 मिनिटात श्री अमितजींचा मला फोन आला . त्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे सांगत आम्हाला आश्वस्त केले. मला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला .                  

मी इतर दवाखान्यात फोन लावले . सर्वांची परिस्थिती गंभीरच होती. 

थोड्या वेळाने श्री अमितजींचा पुन्हा फोन आला . 
" एक ट्रक 12.15  वा. हैद्राबादहुन निघाला आहे .( जो दुपारी 5 वा. लातूरला पोहोचला ) दुसरा ट्रक रात्रीपर्यंत येईल .( जो नुकताच पोहोंचला आणि त्यातून विवेकानंद रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयाला पुरवठा झाला )"                       

चला , तूर्तास लढण्यासाठी बळ मिळाले होते. संपूर्ण रात्रभर विवेकानंद रुग्णालयाच्या स्टाफनी अपुऱ्या oxygen वर 45 रुग्णांचे प्राण वाचवले .मी, रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ रात्रभर जागेच होतो.

रात्रभर, मला गोळी घेऊन देखील झोप आली नाही.

लातूरच्या नाना गॅस प्लांटचे श्री फटाले सुद्धा रात्रभर जागे होते .                

पहाटे 2.00 वा . श्री अमितजींना पुन्हा फोन लावला व पुढील पुरवठ्यासंबंधी विचारणा केली . 

" मी सर्व व्यवस्था केली आहे , आज दुपारपर्यंत लातूरला सुरळीत पुरवठा होईल "                  

जीव भांडयात पडला !
मला खूप आनंद आहे की 400 ते 500 रुग्णाचे प्राण वाचवण्यात ईश्वराने मला छोटेसे साधन बनवले. मला होणारा आरोग्यविषयक त्रास यापुढे कांहीच नाही.मा. श्री अमितजी देशमुख यांच्या भगीरथ प्रयत्नाने लातूरवरचे मोठे संकट टळले, हे मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते . एकदा त्यांना परिस्थिती सांगितली की त्यांनी प्रयत्नात कोणतीही कसर ठेवली नाही.       


                      

 

Wednesday, April 21, 2021

*वाडी दमईच्या युवकांची 'माझा गाव, माझी जबाबदारी' मोहीम* • *संपूर्ण गावक-यांची तपासणी* • *कोविडमुक्त गावाचा संकल्प* • *डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन*

*वाडी दमईच्या युवकांची 'माझा गाव, माझी जबाबदारी' मोहीम* 
• *संपूर्ण गावक-यांची तपासणी*
• *कोविडमुक्त गावाचा संकल्प*
• *डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन*

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कोविड१९च्या दुस-या लाटेत वाडी दमई येथील काही नागरिकांना संसर्ग झाला. त्यामुळे येथील युवकांनी एकत्र येत त्याचा धैर्याने सामना करण्याची जबाबदारी उचलली असून, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गावक-यांचे शरीरातील तापमान आणि ऑक्सिजन पातळी आज तपासण्यात आली. मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे, स्वच्छता राखणे या अत्यावश्यक बाबींवर भर देण्यात आला आहे. 

  वर्षभरापासून सुरु असलेल्या कोविड युद्धात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन काम करत असून, कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वजण लढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' च्या संकल्पानुसार वाडी दमई येथील युवकांनी एकत्र येऊन गावातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यात  जनजागृती निर्माण करत आहेत.

 बाधितांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी युवकांनी गुगल मिटव्दारे चर्चा केली व दुस-या दिवशी गावक-यांचे तापमान मोजणी, त्यांच्या नोंदी घेणे, संशयास्पद बाधितांना कोविड तपासणी करण्यास सांगणे, बाधितांवर उपचार, त्यांचे विलगीकरण, त्यांना आहाराबाबत सजग करण्यात आले.

 बाधितांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येणे, कोविडबाबतची भिती दूर करणे, संशयितांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक महत्त्व पटवून देणे. तसेच गावातील सार्वजनिक नळावर कोविड प्रतिबंधक औषधींची फवारणी करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
शिवाय प्रार्थनास्थळावरून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येत आहे. 

  गावात पूर्वनियोजित विवाह असल्यास ते घरगुती पद्धतीने कमीत कमी उपस्थितीत पार पाडणे तसेच कोणतेही धार्मिक कार्यक्रम न करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढत्या कोरोना केसेस पाहता जिल्हा व आरोग्य यंत्रणेवर अधिकचा भार पडणार नाही, याची खबरदारी येथील युवक घेत आहेत. 

  युवकांच्या पुढाकाराने कोविड१९च्या दुस-या लाटेचा गावकरी धैर्याने सामना करत आहे. आतापर्यंत गावात तीन जणांचा मृत्यू तर ५० जण बाधित झाले असून, अनेकांनी यावर मात केली आहे. यापुढे गावातील एकही व्यक्ती बाधित होणार नाही, यासाठी युवक प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. 
  
'माझा गाव, माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील लक्ष्मणराव बिडकर, सरपंच अमोल तरवटे, यांच्या मार्गदर्शनात शिक्षक सुधाकर गायकवाड यांच्या सक्रिय पुढाकाराने नागरिकांच्या टेंपरेचर गन व ऑक्सिमीटरच्या साह्याने सर्व नागरिकांची शरीराचे तपमान तपासणी आणि रक्तातील ऑक्सिजनची प्रमाण व पातळी तपासणी करण्यात आली. तसेच या सर्व नोंदी घेऊन संशयितांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.

कर निरीक्षक डॉ. उमाकांत विभुते, प्रभाकर बारहाते, विलास घोडके, विजयकुमार बिडकर, संतोष वाटोडे, महादु वाटोडे, अंबादास वाटोडे, राम भुरे, गजानन विभुते, नवनाथ बारहाते, पांडुरंग तरवटे, शरद तरवटे, सोमनाथ बोरामने, ञिशरण वाटोडे, बंडूनाना बिडकर, उद्धव गायकवाड, अच्युत तरवटे, संदिप बिडकर, आशिष बिडकर यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर गायकवाड, पुजा तरवटे, शिवराज बोरामणे, अमोल विनायक तरवटे, दीपक बिडकर, ओमकार तरवटे, वैभव कड, माऊली तरवटे, शरद तरवटे, संतोष बिडकर, सुनील तरवटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल तरवटे, अमोल तरवटे, सोमनाथ तरवटे, कृष्णा तरवटे सिस्टर व ब्रदर या कोरोनायोद्ध्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. वाडी दमई येथील अर्थ सहाय्य सह्याद्री महिला बचत गटाने अर्थसहाय्य केले तसेच मार्गदर्शन जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक शेख सर,अरुण चव्हाळ सर व सर्व वृंदांनी सहकार्य केले.
*****

श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील वरकड गल्लीतील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरा मध्ये प्रातः कालीन सत्रात 
श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भागवताचार्य श्रीकृष्ण महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विधिवत केले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह 
येथे श्रीराम प्रतिमेच्या पूजनाने भव्य रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला श्रीराम प्रतिष्ठान
आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये 
एकूण 48 रामभक्तांनी रक्तदान केले.यावेळी मेट्रो रक्तपेढी जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी यांच्या कडून श्रीराम प्रतिष्ठानला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला,सर्व स्तरातून या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल श्रीराम प्रतिष्ठान च्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी चोरमले, उपाध्यक्ष नितुल दहिवाळ, सचिव गोविंद भुसारे,सहसचिव रणजित देशमुख, कोषाध्यक्ष नागेश जोशी, बालाजी वांकर, दिपक टाक, आकाश सटाले, महेश अंबुरे, नितेश लष्करे, सतप्रीत सिंग शाहु, अमोल दहिवाळ, अक्षय कदम, शेख मोहसीन, गणेश सोडगीर, गणेश जोशी, देवानंद चोरमले व श्रीराम प्रतिष्ठानच्यासर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Tuesday, April 20, 2021

चैत्र श्रीराम नवमी श्रीराम मंदिरामध्ये घरच्या घरी साजरी........

चैत्र श्रीराम नवमी श्रीराम मंदिरामध्ये घरच्या घरी साजरी........


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र श्री राम नवमी श्रीराम मंदिरांमध्ये मोठ्या थाटात उत्साहात साजरी करण्यात येते परंतु कोरोणा महामारी च्या दुसऱ्या लाटेत दि.21 एप्रिल 2021 बुधवार रोजी मुख्य पुजारी संजय रामदासी, अमोल रामदासी व सुमंत रामदासी यांच्या विचारातून शासनाला सर्वतोपरी सहकार्य म्हणून घरच्या घरी रुद्र अभिषेक, महापूजा, आरती व प्रसाद गुरु विलास देव जोशी यांच्या हस्ते महापूजा करून साजरी करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे 30 एप्रिलपर्यंत बंद

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे 30 एप्रिलपर्यंत बंद 


 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोकडी असल्याने कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत नवीन वाहनांची नोंदणी, वाहनविषयक कामे, वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे व उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना विषयक कामे, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीविषयक कामे, दुय्यमीकरण, नुतनीकरण ही कामे कार्यालयात गर्दी होवू नये म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.

           केंद्र शासनाने वाहन विषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता दि.30 जून 2021 पर्यंत वाढविलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत ज्या उमेदवारांनी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहेत अशाच लोकांनी  अपॉईंटमेंट रद्द करुन पुन्हा नवीन अपॉईंटमेंट सोयी प्रमाणे घ्याव्यात. तसेच त्या पुननिर्गमित करण्यात येतील. याबाबत प्रत्येक अर्जदाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे अथवा पुन्हा नवीन घेणे ही प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दि.1 मे 2021 नंतर कार्याललय तत्कालीन शासन निर्णयाप्रमाणे कार्यरत राहील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात 5905 रुग्णांवर उपचार सुरू, 1211 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 5905 रुग्णांवर उपचार सुरू, 1211 रुग्णांची वाढ



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  


जिल्ह्यातील 1211 रुग्णांचे अहवाल मंगळवार दि.20 एप्रिल 2021 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27298 एवढी झाली आहे. त्यापैकी  20704 बरे झाले तर 689  जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 5905 जणांवर उपचार सुरु असून आज एकुण 842 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. तसेच आज 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 6  हजार 199 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 5 हजार 905 तर व्हॅकन्ट बेड 294 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, April 19, 2021

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा सुधारीत दौरा

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा सुधारीत दौरा


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.21 एप्रिल 2021 रोजी औरंगाबाद येथून परभणी येथे रात्री 8:15 वाजता आगमन व सावली विश्रामगृहात राखीव.
गुरूवार दि.22 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. परभणी., महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्यासमवेत परभणी जिल्ह्यातील कोविड-19 संदर्भातील उपाययोजना व जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती ( स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 12:30 वाजता परभणी येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

Saturday, April 17, 2021

सभापतीपदी म.विआ.च्या सौ.आशाताई अरविंद बदाले यांची बिनविरोध निवड.....

सभापतीपदी म.विआ.च्या सौ.आशाताई अरविंद बदाले यांची बिनविरोध निवड.....

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ पंचायत समिती सभापती पदाचा मिराबाई बाबुराव जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती दिनांक 17 एप्रिल 2021 शनिवार रोजी सभापती पदाची निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिराजदार यांनी सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी महाविकासआघाडीच्या सौ.आशाताई अरविंद बदाले यांची एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषणा केली.याप्रसंगी सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य सदस्या यांची उपस्थिती होती.यावेळी सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी काम पाहिले.महाविकासआघाडीच्या सौ.आशाताई अरविंद बदाले यांच्या निवडीचे स्वागत मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर, लक्ष्मीकांत देशमुख,दशरथ सुर्यवंशी, मधुकरराव निरपणे, रंगनाथ रोडे, कुमार चव्हाण तसेच महा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले.

Friday, April 16, 2021

संचारबंदीत शहरी भरारी पथक येताच नागरिक झाले सैरभैर सर्वांनी लावले मास्क.......

संचारबंदीत शहरी भरारी पथक येताच नागरिक झाले सैरभैर सर्वांनी लावले मास्क.......


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात शहरांमध्ये माननीय डॉ.आशिषकुमार बिरादार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात संचारबंदी भरारी पथक दाखल होताच विना मास्क वावर करणारी मंडळी यांना पायबंद घालण्यासाठी यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक दाखल होताच नागरिक सैरभैर झाले तर खिशातले मास्क तोंडावर तसेच हनुवटीवरील मास्क नाकावर घेताना दिसत होते. यावेळी मेडिकल, भाजीपाला विक्रेते, कृषी साहित्य विक्रेते व बैल बाजार आदींना कोरोना विषाणूबद्दल माहिती सांगून मास्क वापरण्याचे महत्त्व सांगण्यात आले.पथक प्रमुख अनिल घनसावंत ना. तह,सहाय्यक गंगाधर विरमले,सचिन साबळे,शिवाजी शिंदे,विश्वनाथ कणके,साहेबराव जाधव,प्रवीण होणाळे आदींनी मस्क वापरा सॅनिटायझर वापरा व सामाजिक अंतर राखा अशा नागरिकांना सूचना केल्या.

Thursday, April 15, 2021

संचारबंदी काळात सोनपेठ ग्रामीण व शहरी पथकाची निवड ; नियंत्रण कक्षाची स्थापना....

संचारबंदी काळात सोनपेठ ग्रामीण व शहरी पथकाची निवड ; नियंत्रण कक्षाची स्थापना....

ज्या अर्थी मा. जिल्हादंडाधिकारी यांनी संदर्भ क्र. १ नुसार कोरोना विषाणुच्या (कोव्हिड १९)
रोखण्यासाठी परभणी जिल्हामध्ये साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरसुदीच्या अवजावणीसा अधिकसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी है त्याचे कार्यक्षेत्रांत कोव्हिड १९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखणसाठी ज्या उपाययोजना कर आवश्यक आहे.परभणी जिल्हयात दि. १४/८/२०२१ रोजी रात्री ०८.०० वा. पासुन ते ०१/५/२०२१ रोजीचे ७.० आखेर संचारबंदिच्या मुदतीत कोविड १९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रमाणे सुचना निर्गमीत करण्यात येत आहे
१. सोनपेठ तालुक्यात दि. १४/४/२०२१ रोजी रात्री ०८.०० वा. पासुन ते ०१/५/२०२१ रोजी सकाळी ७.० वाजेपर्यंत कलम १४४ लागु करण्यात आले आहे. २. नमुद केलेल्या व सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा / आस्थाना यांच्या व्यतिरिक्त सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणी सेवा बंद राहतील.नियमाचे उल्लंघन करण्यास दंड आकारावा ३. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणा-या सर्व नागरीकांनी काटेकोरपणे योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल या नियमाचे उघन करणारे प्रवासी रक्कम ५००/-दंडास पात्र राहती
त्या अनुषंगाने सोनपेठ तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात खालील प्रमाणे संचारबंदी भरारी पथक गठीत करण्यात येत आहे.तालुका स्तरीय पथक प्रमुख अधिकारी यांचे नाव सोनपेठ तालुका संचारबंदी नियंत्रण कक्ष श्रीमती ऐश्वर्या गिरी अपर तहसिलदार सोनपेठ,ग्रामीण पथक प्रमुख
श्री सचिन खुडे गटविकास अधिकारी सोनपेठ,शहर पथक प्रमुख श्री जयंत सोनवणे मुख्याधिकारी न.प. सोनपेठ,
संदीपान शेळके पो.नि सोनपेट,अचानकपणे ग्रामिण व शहरी भागात भेटी देवुन नियमाचे अनुपालन होत असल्याचे खात्री करणे व दंड साव खालील प्रमाणे भरारी पथक नियुक्त करण्यात येत आहे.
संचारबंदी भरारी पथक (शहरी) पथक प्रमुख अधिकारी / कर्मचारी यांचे नाव श्री अनिल घनसावंत ना. तह,श्री. भिकाणे स. पो. नि. सोनपेट,श्री चिकटे आर. आर. तलाठी,श्री सचिन सावळे तलाठी,श्री सागर मस्के तलाठी,श्री पंडीत कदम न.प. सोनपेठ,श्री धुमाळ न.प. सोनपेठ,श्री परळकर न.प. सोनपेठ

संचारबंदी भरारी पथक (ग्रामीण) पथक प्रमुख अधिकारी / कर्मचारी यांचे नाव श्री साहेबराव घोडके ना.तह,श्री अविनाश माळी वि.अ. सोनपेठ, एकलिंगे तलाठी,श्री एस. टी.,श्री सचिन तादळे तलाठी.,श्री चंद्रकांत शेवढे तलाठी,श्री अनिकेत कचरे तलाठी,श्री एम. डी. भालेकर ग्रामसेवक,श्री आर.एम. सोळंके ग्रामसेवक ग्रामसेक,श्री एम. के. सयद उखळी,पोलीस अधिकारी व कर्मचारी
उक्त संचारबंदी पथकाने दररोज सांयकाळी ५.०० वाजता अहवाल नियंत्रण कक्षात सादर कराया सदरील कामात आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भा.द.वि. १८६० (४५) याच्या कलम १८८ प्रमाणे व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायदयातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

Wednesday, April 14, 2021

पोलिस दलातील 112 अधिकारी- कर्मचार्‍यांवर उपचार सुरू... काही होमकॉरंटाईन, तर अनेक जण कोविड सेंटरमध्ये दाखल.....

पोलिस दलातील 112 अधिकारी- कर्मचार्‍यांवर उपचार सुरू...
काही होमकॉरंटाईन, तर अनेक जण कोविड सेंटरमध्ये दाखल.....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोनाविरूध्दच्या या लढाईत अहोरात्र परिश्रम करणार्‍या पोलिस दलातील अधिकारी - कर्मचार्‍यांना कोरोनाच्या विळख्याने अक्षरशः हैराण केले आहे. सद्यस्थितीत थोडे थोडके नव्हे तर 112 अधिकारी - कर्मचारी कोरोनायोध्दे उपचार घेत आहेत. त्यात 16 अधिकारी, 86 पोलिस कर्मचारीव दहा होमगार्डचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचार्‍यांचा बुधवारी (दि. 14) कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दल अक्षरशः हादरले आहे. एकीकडे अधिकारी - कर्मचारी योध्दे एकापाठोपाठ एक घायाळ होत आहेत. त्यातच ही संख्यासुध्दा चिंता करणारी ठरली आहे. कारण वैद्यकीय अधिकारी - कर्मचार्‍यांप्रमाणे पोलिस दलातील अधिकारी - कर्मचारीसुध्दा कोरोनायोद्ध्याप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात अक्षरशः अहोरात्र कर्तव्यावर आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवरून येणारे आदेश, बंदोबस्त, त्यातच या वार्ता ताण देणार्‍या ठरल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, असा एक दृष्टीकोन त्यातच सततचे लॉकडाऊन त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी होणारी होरपळ त्यामुळे माणूसकीचेही दर्शन घडविण्याची दुहेरी भूमिका पोलिस यंत्रणा बजावत आहे. त्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
शहरासह जिल्ह्यात बुधवारपासून म्हणजे जमावबंदी व संचारबंदीचा आदेश लागू झाल्यापासून जिल्हा पोलिस प्रशासनावरील जबाबदार्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना प्रतिबंध करणे त्यापाठोपाठ विना मास्क फिरणारांविरूध्द दंडात्मक कारवाई करणे या गोष्टी अनिवार्य ठरल्या आहेत. त्यावरच ब्रेक द चेन या मोहीमेचे यशापयश अवलंबून आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासनाकडे योग्य त्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या नियोजनातच पोलिस दल व्यस्त आहे. एकीकडे एकापाठोपाठ एक अधिकारी - कर्मचारी कोरोनाने घायाळ होत असताना, ते उपचारासाठी किमान 15 दिवस सुट्टीवर असताना कर्तव्यसुध्दा पार पाडण्याची महत्वपूर्ण भूमिका कसरत हे एक आव्हानच ठरत आहे.
आतापर्यंत 258 जण बाधित, सहा जणांचा मृत्यू....
सद्यस्थितीत 112 पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण होमकॉरंटाईन असून काही जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यात एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह तीन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, नऊ फौजदारांचा समावेश आहे. तर 86 पोलिस कर्मचारी असून दहा होमगार्डचा समावेश आहे.
दरम्यान, मागील वर्षीपासून मंगळवारपर्यंत (दि.13) 258 अधिकारी - कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यात 41 अधिकारी, 203 कर्मचारी, 11 होमगार्ड, लिपीक दोन व एका शिपायाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Tuesday, April 13, 2021

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संबंधी मार्गदर्शक सूचना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संबंधी मार्गदर्शक सूचना



मुंबई /परभणी/सोनपेठ (दर्शन):- 

दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या वर्षी दि. 14 एप्रिल, 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अति संसर्गजन्य परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
      *मार्गदर्शक सूचना*
१) दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमतात तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.
२)  या वर्षी कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रँली, मिरवणुका यावेळी जयंती निमित्ताने काढण्यात येऊ नयेत. परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एका वेळी पाच पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सँनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. तथापि, चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी  मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहाणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच दिक्षाभूमी नागपूर येथील कार्यक्रमासाठी 50 पर्यंत व्यक्ती उपस्थित राहु शकतील.
कोविड-१९ विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त चैत्यभुमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
३) दरवर्षी डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविङ-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कदारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
४) जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
५) राज्यातील कोविड-189 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. 
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५०४०९१२१७१३००२९आहे.
................................

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी
कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार
कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.   

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

 याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

Sunday, April 11, 2021

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ कोरोणा काळातही मनोभावे सेवा..

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ कोरोणा काळातही मनोभावे सेवा..


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र येथील भक्तनिवास शेजारी श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ श्री वैद्यनाथ मंदिर येथे बाहेरगावचे दर्शनासाठी आलेल्या व्यक्तींसाठी अन्नदान करणारी ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात गेली आठ वर्ष झाले सतत अन्नदान त्यातच 2020 पासून कोरोना काळात रस्त्याच्या कडेला शेकडो लोकं अण्णा विना उपाशी मरत होती त्यावेळेस देखील श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सर्वांना अन्नाची सोय जागेवर केली तशीच यावर्षीही कोरोना माहामारी ची दुसरी लाट परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्री झपाट्याने वाढत आहे याचाच विचार मनात आला व या परळी नगरीतील कोरोना बाधित महिला त्यांची मुलं त्यांची वडीलधारी मंडळी उपाशी मरत असताना पाहावत नाही म्हणून श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट सदस्यांनी जी लोकं कोरोना बाधित घरी त्यांच्या सदस्यांना दहा दिवस दोन टाईम डब्बा घरपोहच देत आहेत. त्यासाठी ट्रस्टचे कॉर्डिनेटर राकेश भाऊ चांडक यांच्या नियोजनात हे कार्य चालू आहे.या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक निराधार महिलांना एक महिन्याचे रेशन तसेच अनेक निराधार बालकांना शैक्षणिक जबाबदारी अशा विविध माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात या कोरोना काळात श्री अन्नपूर्णा चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जे कोरोना बाधित परळी वैजनाथ येथील कानाकोपऱ्यातील व्यक्ती मनापासून आभार व्यक्त करतांना दिसत आहेत तसेच आम्हालाही सेवेची संधी द्या अशी मागणी करताना दिसत आहेत परंतु श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट कॉर्डिनेटर राकेश भाऊ चांडक हे सांगतात प्रथम तुम्ही आजारातून मुक्त व्हा पुन्हा पाहू आपली सेवा तसेच परळी वैजनाथ येथील सर्व जनतेला श्री अन्नपूर्णा चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आवाहन करते परळी नगरी पूर्णपणे कोरोना मुक्त करायचे असेल प्रत्येकांनी मास्क वापरा सॅनिटायझर वापरा सतत हात धुवा व सामाजिक अंतर राखा एवढेच नाही तर प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करावी व आपला परळी तालुका परळी वैजनाथ पूर्ण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हेही सांगितले.

Friday, April 9, 2021

सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदा साठी सौ.आशाताई अरविंद बदाले नाव निश्चित......

सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदा साठी
सौ.आशाताई अरविंद बदाले नाव निश्चित......


सोनपेठ पंचायत समिती सभापती पदाचा मिराबाई बाबुराव जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती नुकतेच माननीय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सभापती पदाची निवड होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून माननीय तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिराजदार हे काम पाहतील.सोनपेठ पंचायत समिती महा विकास आघाडीच्या वतीने सौ.आशाताई अरविंद बदाले
यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित मानल्या जात आहे अधिकृत सूत्रांकडून माहिती कळते.
सोनपेठ पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे - 2017
1) मीराबाई बाबुराव जाधव (शेळगाव ओबीसी महिला),
2) राजेभाऊ गोपाळराव कांदे (शिर्शी बु. नागरीकांचा मागास प्रवर्ग),
3) नंदाबाई कांतराव यादव (नरवाडी सर्वसाधारण महिला),
4) शंकर एकनाथ बचाटे (वडगाव सर्व सधारण),
5) रंगनाथ ग्यानबा प्रधान (उकळी बु अनुसूचित जाती),
6) आशा अरविंद बदाले (डिगोळ ई सर्वसाधारण महिला).


Thursday, April 8, 2021

महाराष्ट्राला बौध्दिकतेचे अधिष्ठान - ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर

महाराष्ट्राला बौध्दिकतेचे अधिष्ठान - ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर 



नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये बुध्दिनिष्ठतेचा उदय झाला.बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या या बुध्दिमान लोकांच्या परंपरेने महाराष्ट्राला बौध्दिकतेचे महत्वपूर्ण अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आज मांडले. 
             महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २१वे पुष्प गुंफताना“महाराष्ट्राचा तर्कवाद ”या विषयावर श्री कुबेर  बोलत होते.
भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडून आधुनिक व विज्ञानवादी विचारांची कास धरण्याचा आग्रह करणा-या महाराष्ट्रातील बुध्दिनिष्ठ विचारकांनी राज्याला व देशालाही महत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे श्री कुबेर म्हणाले. 
राजाराममोहन रॉय यांचा धर्म सुधारणेचा प्रयत्न हा भारातातील सुधारणेचा पहिला अध्याय मानला जातो. पुढे या सुधारणांचा मोठा प्रवाह महाराष्ट्रात सुरु झाला व आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे प्रणेते ठरले. १२ भाषांचा त्यांचा अभ्यास होता व विविध विषयांमध्ये त्यांना गती होती. पारतंत्र्यातील भारत देशाला जांभेकरांनी बौध्दिकतेचा आधार दिला.इंग्रज भारतीयांची कशी लुट करीत आहेत हे सांगणारे जांभेकर पहिले द्रष्टे होते. त्यांनी‘रिव्हर्स ड्रेन’ हा सैध्दांतिक विचार मांडला आणि येथून महाराष्ट्राच्या बौध्दीक परंपरेला सुरुवात झाली असे श्री कुबेर म्हणाले. 
           १८१६ ते १८४७ या कालावधीत पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग यांनी वेग-वेगळया पातळीवर समाजसुधारणेचे काम केले त्यांच्याच काळात प्रार्थना समाजाची निर्मिती झाली व पुढे यामाध्यमातून महाराष्ट्रात बौध्दीकतेचे मोठे कार्य उभे राहिले. भाऊ दाजी लाड यांनी  ही पंरंपरा पुढे नेली या बुध्दिवादी मंडळींनी मुंबईत प्रबोधनाचे बीज रोवले पुढे त्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे श्री  कुबेर यांनी सांगितले.
      याच कालखंडात गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी  ‘प्रभाकर’ वर्तमानपत्रातून तेजस्वी लिखाण करून सतत विज्ञान व आधुनिकतेची कास धराण्याचा विचार मांडला. पुढे  १८२७ ते १८४० या कालखंडात महात्मा फुले हा दैदिप्यमान तारा उदयाला आला. ज्या वातावरणातून फुले आले तेथूनच सुसंगत ज्ञान मिळवून  त्यांनी व्यवस्थेला आव्हान देण्याची बौध्दिकता दाखवली. 
       १८५७ हे वर्ष महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाचे ठरले याच वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठातून तेजपुंज तारे उदयाला आले यात पंडित विष्णू परशुराम शास्त्री,रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नारायण महादेव परमानंद,महादेव गोविंद रानडे,विष्णुशास्त्री चिपळूणकर,काशिनाथ त्र्यंबक तेलंग,गणेश वासुदेव जोशी, नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडे केशव कर्वे यांचा समावेश आहे. या सर्वबुध्दिमान लोकांनी भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.आधुनिक व विज्ञानवादी विचारांचा आग्रह धरून त्यांनी राज्यात सुधारणांचे पर्व राबविले.
 महाराष्ट्र हे बुध्दीगम्यतेला महत्व देणारे राज्य आहे अशी मांडणी करून श्री कुबेर म्हणाले, ‘नितिमत्तेसाठी धर्माची गरज नाहीव धर्म ही अनावश्यक गोष्ट आहे’ असा आधुनिक विचार गोपाळ गणेश आगरक यांनी मांडला व त्याचा परिपोष  पुढच्या अनेक पिढींमध्ये झिरपला. ‘माझ्या देहावर माझा अधिकार’ ही भूमिका मांडत इंग्लडच्या राणीला या संदर्भात पत्र लिहीणा-या मुंबई येथील रक्माबाईमुळे भारतात मुलींच्या विवाहाचा कायदा बदलला गेला व संमतीवयाचे प्रकरण म्हणून इतिहासात याची नोंद झाली. 
          आगरकरांचे सहकारी गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना घडविले हा महाराष्ट्राच्या तर्कवादाचा महत्वाचा टप्पा असल्याचे श्री कुबेर म्हणाले. महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील तर्कवादाच्या परंपरेतील शेवटचे नेते होते व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणात ‘महादेव रानडे यांच्या प्रमाणे बुध्दीमान महाराष्ट्रात निपजला नाही व निपजणार नाही’ असे  गौरवोद्गार काढले होते, असे श्री कुबेर यांनी सांगितले. 
           धर्माची चिकित्सा करणारे प्रबोधनकार ठाकरे, स्वदेशीची संकल्पना देशात सर्वप्रथम मांडणारे लोकमान्य टिळक, विमान उडवण्याचा प्रयत्न करणारे तळपदे , इंग्लडमधील वर्तमानपत्रांनी  भारताचा एडिसन असा  गौरव केलेले शंकर आबाजी  भिसे, विचंवाच्या विषावर संशोधन करणारे बावीस्कर, देशातील विज्ञानाच्या प्रगतीतील केंद्र बिंदू ठरलेली टाटा मूलभूत संशोधन संस्था व तिची उभारणी,  धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी देशात पहिल्यांदा उभारलेली सहकाराही गुढी आणि  विमा या संकल्पनेचा प्रसार करणारे  अण्णा  साहेब चिरमुले  या व्यक्तीमत्वांच्या कार्यावरही श्री कुबेर यांनी यावेळी प्रकाश टाकला.
      महाराष्ट्राच्या या बुध्दीमान परंपरेचा अभ्यास व्हावा आणि ही परंपरा पुढच्या पिढीकडे देण्याचे  प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षाही श्री कुबेर यांनी व्यक्त केली.

             

मोतीराम पौळ यांचे 'सेट' परीक्षेत यश

मोतीराम पौळ यांचे 'सेट' परीक्षेत यश



पालम/सोनपेठ (दर्शन):-

तालुक्यातील फरकंडा येथील मोतीराम देवराव पौळ हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण होत पदासाठी पात्र ठरले आहेत. २७ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला आहे. 

फरकंडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पौळ यांनी माधवराव पाटील महाविद्यालय, पालम येथे पदवी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पदव्युत्तर पदवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांवर पीएचडी करीत आहेत.

पौळ हे सध्या पुणे येथील भारतीय जैन संघटना आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेत लेखक म्हणून कार्यरत आहेत.