नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा - जन सेवा मित्र मंडळ सोनपेठ
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात सदैव जनतेच्या सेवेत...जन सेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी (संचलित) जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष साजेद कुरेशी यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया (ऑपरेशन) शिबीर,सोनपेठ व परिसरातील सर्व रूग्णांना कळविण्यात येते की,सोनपेठ शहरातील जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष साजेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसा निमित्त नेत्र तपासणी मोफत शिबीराचे आयोजन केले आहे, तरी सर्व गरजु रूग्णांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.दिनांक 19 जानेवारी 2021 वार मंगळवार वेळ सकाळी 10 ते 3 पर्यंत (टिप)
1.शिवारामध्ये मोतीबिंदु आढळलेल्या रूग्णांचे लायन्स नेत्र रूग्णालय उदगीर, जि.लातुर येथे मोफत शस्त्रक्रिया (ऑपरेशन) केले जाईल.2.शस्त्रक्रिया (ऑपरेशन) झालेल्या रूग्णांची राहण्याची, जेवण्याची, जाण्या-येण्याची व काळया चष्माची मोफत व्यवस्था करण्यात येईल,3. रूग्णांनी आधार कार्ड व नातेवाईकांचा मोबाईल नंबर सोबत अत्यंत आवश्यक आहे.आयोजन स्थळ जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळा,सोनपेठ,संपर्क मो.9975003608 7020002886 9309105586.जन सेवा मित्र मंडळ पदाधीकारी कार्यकर्ते यांनी आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment