प्राचार्य सुरेश नाईकवाडे 6 जानेवारी 2021 रोजी आकाशवाणीवर
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
परभणी येथील परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांचा 6 जानेवारी 2021 रोजी दर्पण दिनानिमित्त "मराठी पत्रकारितेचा इतिहास आणि पत्रकारितेचे बदलते स्वरूप'या विषयावर वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
दि.6 जानेवारी 2021 हा दिवस संपूर्ण राज्यात दर्पण दिन तथा पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या निमित्तानेच परभणी आकाशवाणी केंद्रावर सायंकाळी 18.35 वाजता मराठी पत्रकारितेचा इतिहास आणि पत्रकारितेचे बदलते स्वरूप या विषयावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या वार्तालाप प्रसारीत होणार आहे. प्राचार्य नाईकवाडे हे गेल्या 26 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्हयातील पत्रकारांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी परभणी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment