पत्रकार म्हणजे चांगुलपण शोधणारी दृष्टी-सीईओ शिवानंद टाकसाळे ; दर्पण दिनानिमित्त परभणीत पत्रकारांची आरोग्य तपासणी संपन्न
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पत्रकार म्हणजे समाजातील चांगुलपणा शोधण्याची दृष्टी होय. लोकशाहीतील जे स्तंभ आहेत त्यात ते महत्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाच्या निमित्ताने 6 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन सूर्या आयसीयु हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आसाराम लोमटे हे होते. याप्रसंगी परभणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ.अनिल कान्हे पाटील, सूर्या आयसीयू हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉ.संजय खिल्लारे, डॉ.प्रवीण संगवे, डॉ.संदीप काला, डॉ.इमरान हाश्मी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, प्रभू दिपके, राजकुमार हट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल मनपाचे स्वछता निरीक्षक करण गायकवाड यांचा पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी प्रास्ताविक करताना आरोग्य शिबिराचा उपक्रम 12 वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले. सीईओ टाकसाळे यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांचे विशेष कौतुक केले. पुढे ते म्हणाले, हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक महापुरुष होऊन गेले, परंतु त्यांच्या हयातीत हे मोठेपण लोकांना कळले नाही. अशा व्यक्ती जगातून गेल्यावर त्यांची महती गायिली जाते. त्यामुळे आपल्या समकालीन चांगल्या माणसांना शोधा, त्यांना जपा. समकालीन माणसांमध्ये असलेलं देवत्व त्याच कालावधीत कळलं तर त्याच्या इतकी मोठी गोष्ट दुसरी कुठलीही नाही. करोना काळातील अनुभव सांगून मनुष्यत्व शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करावा, असे आवाहन टाकसाळे यांनी केले.
डॉ.लोमटे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे. शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे.शरीर हे सदृढ असेल तर सर्व प्रकारच्या स्वप्नांची पूर्तता करता येईल. माध्यमांतील बदलत्या प्रवाहांचा आढावा घेताना छपाई तंत्र, वृत्तवाहिन्या ते समाज माध्यमे अशी स्थित्यंतरे घडली आहेत. समाज माध्यमांनी खऱ्या अर्थात माध्यमांत लोकशाही आणण्याचे काम केले आहे. मराठी पत्रकारितेला मोठा वारसा आहे. मराठी पत्रकारितेने सर्वसामान्याच्या बांधिलकीचा घेतलेला वसा व वारसा याचा पत्रकारांनी अजिबात विसर पडू देता कामा नये. तसेच चुकीच्या गोष्टीना खतपाणी मिळणार नाही याची खबरदारी घेऊन अनिष्ट गोष्टींवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार केला पाहिजे, असेही श्री.लोमटे यांनी सांगितले. डॉ.कान्हे, डॉ.खिल्लारे, डॉ.संगवे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजकुमार हट्टेकर तर आभार प्रदर्शन मंचक खंदारे यांनी केले या कार्यक्रमास सुरज कदम विनोद कापसीकर, हनुमंत चिटणीस,नंदू प्रभुणे, प्रवीण देशपांडे, प्रवीण चौधरी, विशाल माने, विठ्ठल वडकुते,अनिल दाभाडकर,लक्षमण मानोलीकर, बाळासाहेब काळे, सुदर्शन चापके, गजानन देशमुख, धाराजी भुसारे,रोहन पावडे,संजय भराडे,सुरेश मुळे, रमेश जोशी,प्रवीण कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोडे,भगीरथ बद्दर,मोईन खान,भूषण मोरे,विवेक मुंदडा,रमेश नाटकर,चंद्रकांत भुजबळ,शेख मुबारक,रमेश जोशी,नरहर चौधरी,अनिल लांडगे,सत्यजित गावंडे, विजय चट्टे,रवी घटे,गणेश चोपडे,सुधीर बोर्डे,सुनील सुतारे, अमर गालफाडे,विजय पाणबुडे, प्रवीण कुलकर्णी,अमोल कुलकर्णी,शिवशंकर स्वामी,दिलीप बोरूळ,श्रीकांत देशमुख,झियाउद्दीन रियाझ,गुणवंत सराफ, अश्रोबा केदारे,रामेश्वर जिरवणकर,बाळासाहेब घिके,संजय घनसावंत, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment